Business

प्रज्ञावन टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

कंपनीने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ)द्वारे इक्विटी समभाग भांडवलाच्या ऑफरच्या माध्यमातून निधी उभारण्याची योजना आखली आहे.

POSTED BY  : ANAGHA SAKPAL DATED ON 07/07/2026 (9004379946)

विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये व्यापक सेवा आणि वैविध्यपूर्ण उपाययोजना पुरवणारी आघाडीची कंपनी प्रज्ञावन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (“कंपनी”) ने एफ अँड एस अहवालानुसार भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे.

या सार्वजनिक समभाग विक्रीमध्ये  4,000.00 दशलक्ष रु. (400 कोटी रु.) पर्यंतच्या नव्या समभागांचा (फ्रेश इश्यू) आणि त्यासोबत प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 15,000,000 पर्यंतच्या इक्विटी समभागांची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे.

 

कंपनीला प्राप्त होणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर कंपनीच्या सुमारे अंदाजे 4,000.00 दशलक्ष रु. (400 कोटी रु.) इतक्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात येणार असून, उर्वरित निधीचा वापर सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाणार आहे.

 

एफ अँड एस अहवालानुसार, कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या व्यवसायात उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. कंपनी कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाशी संबंधित उत्पादने पुरवते तसेच विविध प्रकारचे युटिलिटी सोल्यूशन्स आणि त्यांचे संचालन व देखभाल (Operations & Maintenance – O&M) सेवा पुरविते.

 

सध्या कंपनी दोन प्रमुख व्यावसायिक विभागांद्वारे कार्यरत आहे. त्यामध्ये (i) कौशल्य विकास (Skill Development) – प्रशिक्षण उत्पादने आणि क्षमता विकास उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करणारा विभाग आणि (ii) युटिलिटी सोल्यूशन्स (Utility Solutions) – वीज, पाणी, अक्षय ऊर्जा तसेच संबंधित पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये अंमलबजावणी आणि संचालन व देखभाल (O&M) सेवा पुरवणारा विभाग यांचा समावेश आहे.

 

पॅन्टोमॅथ कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या ईश्युसाठीचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर (BRLM) म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!