ट्राया हेल्थने भारतातील अंतर्गत आरोग्यविषयक असमानतेचा घेतला आढावा: विविध प्रदेशांतील महिलांच्या केसगळतीशी संबंधित अंतर्गत घटकांचा अभ्यास
POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 13/11/2026 [8850212023]
मुंबई [NHI24] – ट्राया हेल्थने आज भारतभरातील ३,८०,३६३ महिलांचा समावेश असलेल्या महिला केसांच्या आरोग्यविषयक अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले. या अभ्यासात केसगळतीच्या स्वरूपासोबतच महिलांमधील तणावाची पातळी, झोपेची गुणवत्ता आणि पचनसंस्थेचे आरोग्य यांचा अभ्यास करण्यात आला. केसगळतीचा अनुभव घेणाऱ्या महिलांमध्ये तणावाचे प्रमाण अधिक, झोपेची गुणवत्ता खराब आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या अधिक असल्याचे आढळले. विशेषतः डोक्याच्या बाजूच्या भागातील केस विरळ होणे किंवा भांग रुंदावणे अशा समस्या असलेल्या महिलांमध्ये हे तिन्ही घटक अधिक प्रमाणात दिसून आले. भारतभरातील ३,८०,३६३ महिलांचा समावेश असलेल्या या अभ्यासात केसगळतीच्या स्वरूपासोबतच तणाव, झोपेची गुणवत्ता आणि आतड्यांचे आरोग्य यांचा अभ्यास करण्यात आला असून, देशातील विविध प्रदेशांनुसार या घटकांमध्ये कसा फरक आढळतो, हेही तपासण्यात आले आहे.

ट्राया या निष्कर्षांकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहते. तणाव, झोप आणि पचनसंस्थेचे आरोग्य हे केसगळतीवर परिणाम करणारे महत्त्वाचे जैविक घटक आहेत. या प्रत्येक घटकाचा केसांच्या वाढीवर वेगवेगळ्या आणि वैद्यकीयदृष्ट्या नोंदवलेल्या प्रक्रियांद्वारे परिणाम होतो. दीर्घकाळच्या तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल या संप्रेरकाची पातळी वाढते आणि केसांच्या वाढीचा सक्रिय टप्पा कमी होतो. अपुऱ्या झोपेमुळे केसांच्या मुळांना आवश्यक असलेली रात्रीच्या वेळी होणारी दुरुस्ती प्रक्रिया बाधित होते. तसेच, पचनसंस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या लोह, व्हिटॅमिन डी आणि झिंक यांसारख्या पोषक घटकांचे शोषण कमी होऊ शकते.
तरीही, बहुतांश महिला केसगळतीवर उपाय म्हणून तेल, शाम्पू आणि केसांवर लावायच्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या अभ्यासातून केसगळतीमागे शरीराच्या अंतर्गत आरोग्याशी संबंधित घटकही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
अभ्यासातील महत्त्वाचे निष्कर्ष
- या अभ्यासात सहभागी झालेल्या ९५.८% महिलांमध्ये लक्षणीय केसगळती आढळली.
- केस विरळ होणे हा सर्वाधिक आढळणारा प्रकार असून त्याचे प्रमाण ५३.७% आहे. त्यानंतर भांग रुंदावणे (२२.१%) आणि डोक्याच्या बाजूच्या भागातील केस विरळ होणे (१९.१%) हे प्रकार आढळले.
- ५२% महिला मध्यम ते उच्च पातळीच्या तणावाखाली आहेत, ३८.१% महिलांची झोप चांगली होत नाही, तर ५१.७% महिलांना पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहेत.
- ४६.६% महिलांमध्ये या तीनपैकी दोन किंवा अधिक समस्या आहेत, तर प्रत्येक सहापैकी एका महिलेला (१६.४%) या तिन्ही समस्यांचा सामना करावा लागत आहे.
- डोक्याच्या बाजूच्या भागातील केस विरळ होणे किंवा भांग रुंदावणे अशा समस्या असलेल्या महिलांमध्ये केस विरळ होणाऱ्या महिलांच्या तुलनेत तणावाचे प्रमाण अधिक, झोपेची गुणवत्ता खराब आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या अधिक आढळल्या.
अंतर्गत आरोग्याची स्थिती
तणाव
या अभ्यासातील ५२% महिला मध्यम ते उच्च पातळीच्या तणावाखाली आहेत. तसेच, चारपैकी एकापेक्षा अधिक महिला (२५.३%) जवळजवळ दररोज तणाव किंवा मानसिक दडपण अनुभवतात.
दीर्घकाळचा तणाव हा केसगळतीस कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा जैविक घटक आहे. शरीरातील तणावाशी संबंधित प्रमुख संप्रेरक असलेल्या कॉर्टिसोलची पातळी वाढल्यामुळे केसांच्या वाढीचा सक्रिय टप्पा कमी होतो आणि केसांची मुळे अपेक्षेपेक्षा लवकर विश्रांतीच्या टप्प्यात जातात. सततच्या तणावामुळे केसांच्या वाढीचा टप्पा वाढवण्यास आणि केसांच्या मुळांचे आरोग्य टिकवण्यास मदत करणाऱ्या इस्ट्रोजेनसारख्या संप्रेरकांच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. या संप्रेरकांचे संतुलन बिघडल्यास केसांची मुळे केसगळतीस अधिक संवेदनशील होतात.
हा परिणाम हळूहळू दिसून येतो. तणावामुळे होणारी केसगळती अचानक सुरू होत नाही, तर अनेक महिन्यांच्या कालावधीत वाढत जाते. हा बदल हळूहळू होत असल्याने बहुतांश महिलांना आपण अनुभवत असलेला तणाव आणि केसगळती यांचा परस्परसंबंध लक्षात येत नाही.
झोप
या अभ्यासातील ३८.१% महिलांची झोप चांगली होत नाही. अपुरी झोप हा केसगळतीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा जैविक घटक आहे. गाढ झोपेत शरीरात ग्रोथ हार्मोन (वाढीसाठी आवश्यक संप्रेरक) स्रवतो. केसांच्या मुळांमधील पेशींच्या नूतनीकरणासाठी हा संप्रेरक महत्त्वाचा असतो. झोपेच्या वेळेत सातत्याने व्यत्यय आल्यास रात्रीच्या वेळी होणारी शरीराची दुरुस्ती प्रक्रिया अपूर्ण राहते. प्रत्येक वाढीच्या चक्रात पुरेशी दुरुस्ती न झाल्यामुळे केस अधिक पातळ आणि कमकुवत होऊ शकतात. कालांतराने केसांची घनता कमी होते.
यामुळे होणारी केसगळती हळूहळू आणि संपूर्ण डोक्यावर पसरलेल्या स्वरूपात दिसून येते. बहुतांश महिला याचे कारण तणाव किंवा वाढते वय मानतात. मात्र, अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेली अपुरी झोप हेही केसगळतीमागील एक कारण असू शकते, याकडे सहसा लक्ष दिले जात नाही.
पचनसंस्था
या अभ्यासातील ५१.७% महिलांना आम्लपित्त, पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहेत. केसांच्या मुळांना आवश्यक असलेल्या पोषक घटकांचे शोषण पचनसंस्थेमध्ये होते. पचनसंस्थेचे कार्य योग्य प्रकारे होत नसल्यास आहारातून पुरेसे पोषक घटक मिळत असले तरी त्यांचे शरीरातील शोषण कमी होऊ शकते. एखादी महिला योग्य आहार घेत असेल आणि पूरक पोषक घटकांचे सेवन करत असेल, तरीही पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित नसल्यास केसांच्या मुळांपर्यंत आवश्यक पोषण पोहोचण्यात अडचण येऊ शकते. विशेषतः लोहाची कमतरता हे महिलांमधील केसगळतीचे एक सामान्य कारण आहे. मात्र, पचनसंस्थेशी संबंधित घटकांचा विचार केला जात नसल्यामुळे अनेकदा या कमतरतेचे निदान होत नाही.
सलोनी आनंद, सह-संस्थापक, ट्राया हेल्थ म्हणाल्या,
“केसगळती ही शरीराच्या अंतर्गत स्थितीचे संकेत देत असते. मी अशा हजारो महिलांशी संवाद साधला आहे, ज्या सतत वेगवेगळी उत्पादने आणि पूरक पोषक घटक वापरून पाहतात. मात्र, त्यांच्या शरीरात नेमके काय घडत आहे, याचा विचार करण्याऐवजी एखादा चमत्कारिक उपाय मिळेल, अशी अपेक्षा ठेवतात. त्यांचा तणाव, झोप किंवा पचनसंस्थेचे आरोग्य यांचा केसगळतीशी संबंध असू शकतो, हे त्यांना क्वचितच सांगितले गेले आहे. भारतात या विषयावर पुरेशी चर्चा झालेली नाही. हा संवाद सुरू करण्याचा आमचा या अभ्यासामागील प्रयत्न आहे.”
तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम महत्त्वाचा का?
तणाव, झोप आणि पचनसंस्थेचे आरोग्य हे स्वतंत्रपणे काम करत नाहीत. उलट, हे घटक एकमेकांवर परिणाम करून समस्या अधिक वाढवू शकतात. तणावामुळे झोपेवर परिणाम होतो, तर अपुऱ्या झोपेमुळे कॉर्टिसोलची पातळी वाढलेली राहू शकते. यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम करणारे संप्रेरकांचे असंतुलन अधिक वाढू शकते. पचनसंस्था आणि मेंदू यांच्यातही परस्पर संदेशवहन होत असते. त्यामुळे पचनसंस्थेतील बिघाड आणि मानसिक तणाव एकमेकांना अधिक तीव्र करू शकतात. त्याच वेळी, पोषक घटकांचे योग्य शोषण न झाल्यास केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळण्यात अडथळा येतो. या अभ्यासात या तिन्ही समस्या अनेक महिलांमध्ये एकत्र आढळल्या. ४६.६% महिलांमध्ये या तीनपैकी दोन किंवा अधिक समस्या असल्याचे निष्पन्न झाले.
केसगळती अधिक स्पष्ट दिसणाऱ्या महिलांमध्ये अंतर्गत आरोग्याशी संबंधित समस्यांचे प्रमाण अधिक
या अभ्यासात महिलांच्या केसगळतीच्या स्वरूपासोबतच त्यांच्या अंतर्गत आरोग्याशी संबंधित घटकांचेही मूल्यांकन करण्यात आले. सर्वाधिक आढळणारा प्रकार असलेल्या केस विरळ होण्याची समस्या असलेल्या महिलांमध्ये तणाव, झोप आणि पचनसंस्थेशी संबंधित तिन्ही घटकांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा किंचित कमी होते. याउलट, डोक्याच्या बाजूच्या भागातील केस विरळ होणे किंवा भांग रुंदावणे अशा समस्या असलेल्या महिलांमध्ये हे तिन्ही घटक राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याचे आढळले.
केसगळतीचा प्रकार आणि अंतर्गत आरोग्याशी संबंधित घटक
| केसगळतीचा प्रकार | महिलांचे प्रमाण | तणाव | झोपेची गुणवत्ता | पचनसंस्थेच्या समस्या |
| केस विरळ होणे | ५३.७% | ५१.४% | ३७.५% | ५०.१% |
| डोक्याच्या बाजूचे केस विरळ होणे | १९.१% | ५४.२% | ३९.२% | ५४.६% |
| भांग रुंदावणे | २२.१% | ५३.६% | ३९.६% | ५४.१% |
| राष्ट्रीय सरासरी | — | ५२.०% | ३८.१% | ५१.७% |
डोक्याच्या बाजूचे केस विरळ होणे किंवा भांग रुंदावणे अशा समस्या असलेल्या महिलांमध्ये केस विरळ होणाऱ्या महिलांच्या तुलनेत तणावाचे प्रमाण अधिक, झोपेची गुणवत्ता खराब आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. या फरकाचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे २ ते ४ टक्के गुणांच्या दरम्यान असले, तरी प्रत्येक घटकामध्ये हा कल सातत्याने दिसून आला. ट्रायाच्या निरीक्षणानुसार, डोक्याच्या बाजूचे केस विरळ होणे किंवा भांग रुंदावणे अशा समस्या असलेल्या महिलांमध्ये अंतर्गत आरोग्याशी संबंधित ताण अधिक असतो.
भारतातील कोणत्या भागात परिस्थिती अधिक गंभीर आहे?
| प्रदेश | तणाव | झोपेची गुणवत्ता | पचनसंस्थेच्या समस्या |
| महाराष्ट्र | ५२.८% | ४१.१% | ५२.४% |
| कर्नाटक | ५१.५% | ४०.०% | ४९.४% |
| उत्तर प्रदेश | ५०.१% | ३४.७% | ५३.२% |
| तेलंगणा | ५३.७% | ४२.१% | ४४.१% |
| दिल्ली | ५१.७% | ३७.३% | ५६.०% |
| पश्चिम बंगाल | ५७.७% | ३९.३% | ५८.७% |
| गुजरात | ५१.५% | ३५.६% | ५०.१% |
| तामिळनाडू | ५५.६% | ४३.१% | ४५.४% |
| मध्य प्रदेश | ५०.४% | ३४.३% | ५०.०% |
| बिहार | ४७.५% | ३२.६% | ५१.९% |
| राजस्थान | ४८.९% | ३१.१% | ५०.८% |
| ओडिशा | ५२.५% | ३५.५% | ५४.९% |
| राष्ट्रीय सरासरी | ५२.०% | ३८.१% | ५१.७% |
पश्चिम बंगालमध्ये तणावाचे प्रमाण आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे तणावाचे प्रमाण ५७.७% असून ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा ५.७ टक्के गुणांनी अधिक आहे. पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचे प्रमाण ५८.७% आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा ७ टक्के गुणांनी अधिक आहे. म्हणजेच, येथे जवळपास प्रत्येक १० पैकी ६ महिलांना पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहेत. यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोषक घटक पोहोचण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तणावामुळे केसांच्या आरोग्याचे संरक्षण करणाऱ्या संप्रेरकांच्या कार्यातही अडथळा येतो. पश्चिम बंगालमध्ये हे दोन्ही घटक एकाच वेळी राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.
तामिळनाडूमध्ये झोपेची समस्या सर्वाधिक आहे. येथील ४३.१% महिलांची झोप चांगली होत नाही. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा ५ टक्के गुणांनी अधिक असून सर्व प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे. तणावाचे प्रमाणही ५५.६% असून ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा ३.६ टक्के गुणांनी अधिक आहे. अपुऱ्या झोपेमुळे केसांच्या मुळांना आवश्यक असलेली रात्रीच्या वेळी होणारी दुरुस्ती प्रक्रिया अपूर्ण राहते, तर तणावामुळे केसांच्या वाढीचा टप्पा टिकवून ठेवणाऱ्या संप्रेरकांच्या कार्यावर परिणाम होतो. तामिळनाडूमध्ये हे दोन्ही घटक राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहेत.
तेलंगणामध्ये तणाव आणि झोपेच्या समस्या या दोन्हींचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. येथे तणावाचे प्रमाण ५३.७% असून ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा १.७ टक्के गुणांनी अधिक आहे. अपुऱ्या झोपेचे प्रमाण ४२.१% असून सर्व प्रदेशांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. तणावामुळे झोपेवर परिणाम होतो आणि अपुऱ्या झोपेमुळे कॉर्टिसोलची पातळी वाढलेली राहू शकते. यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम करणारे संप्रेरकांचे असंतुलन अधिक वाढू शकते.
पश्चिम बंगालनंतर दिल्लीमध्ये पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचे प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील ५६% महिलांना पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहेत. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा ४.३ टक्के गुणांनी अधिक आहे. पचनसंस्थेतील समस्या लोह, व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांच्या शोषणावर परिणाम करू शकतात. एखादी महिला योग्य आहार घेत असेल आणि नियमितपणे पूरक पोषक घटकांचे सेवन करत असेल, तरीही पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित नसल्यास अपेक्षित परिणाम मिळण्यात अडचण येऊ शकते. दिल्लीमध्ये दोनपैकी एकापेक्षा अधिक महिलांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.
ट्रायाचे निरीक्षण
प्रत्येक चार महिलांपैकी एकापेक्षा अधिक महिला (२५.३%) जवळजवळ दररोज तणाव अनुभवतात. ३८.१% महिलांची झोप चांगली होत नाही, तर निम्म्याहून अधिक महिलांना पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहेत. जवळपास निम्म्या महिलांमध्ये या तीनपैकी दोन किंवा अधिक समस्या आढळतात. केसगळती डोक्याच्या बाजूच्या भागात किंवा भांगाच्या ठिकाणी अधिक स्पष्ट झालेल्या महिलांमध्ये या समस्यांचे प्रमाण अधिक आहे.
केसगळतीचा सामना करणाऱ्या बहुतांश भारतीय महिला आजवर बाह्य उपायांवर भर देत आल्या आहेत. मात्र, हा अभ्यास शरीराच्या अंतर्गत आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतो. तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे, झोपेची काळजी घेणे आणि पचनसंस्थेच्या आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. कारण, पोषक घटकांच्या शोषणातील अडथळे ओळखून दूर केल्याशिवाय केसांच्या मुळांना आवश्यक पोषण पुरेशा प्रमाणात मिळेलच असे नाही. ट्रायामध्ये आम्ही प्रथम शरीराच्या अंतर्गत आरोग्याचा आढावा घेतो आणि त्यासोबतच टाळूच्या आरोग्यावरही उपचार करतो.
ट्राया हेल्थविषयी
ट्राया हेल्थ हा भारतातील केसांच्या उपचारांसाठी कार्यरत असलेला एक प्रमुख ब्रँड आहे. केसगळतीची कारणे ओळखण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी आयुर्वेद, त्वचारोगशास्त्र आणि पोषणशास्त्र या तीन पद्धतींचा एकत्रित वापर केला जातो. केसगळती ही शरीरातील खोलवर असलेल्या अंतर्गत असंतुलनाची लक्षणे असू शकतात, या तत्त्वावर ट्रायाची स्थापना झाली आहे. आतापर्यंत ट्रायाने लाखो भारतीयांना उपचार दिले असून केसांचे आरोग्य, पचनसंस्थेचे कार्य आणि जीवनशैलीशी संबंधित घटक यांवरील देशातील सर्वात मोठ्या खासगी डेटासेटपैकी एक विकसित केला आहे.



