Businessयुवाशैक्षणिक

अरीना ॲनिमेशनने पर्टस्पेक्टिव्हज २०२६ मुंबई एडिशनसह सर्जनशील उत्कृष्टतेच्या ३० वर्षांना साजरे केले; उद्योग क्षेत्रातील दिग्गज, एआय नवप्रवर्तक आणि तरुण सर्जनशील टॅलेंट एकत्र आले

~ वार्षिक प्रमुख इव्हेंटमध्ये अभिनेते डॉ. अमित बहल, अभिनेता शांतनु महेश्वरी, दिग्दर्शक, डिझायनर व अॅनिमेटर वैभव मोरे, उद्योग क्षेत्रातील प्रमुख आणि १००० हून अधिक विद्यार्थी एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील सर्जनशीलता, नाविन्यता आणि नव्याने निर्माण होणाऱ्या करिअरच्या संधींचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले ~

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 22/08/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM: अरीना ॲनिमेशन या ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि डिजिटल मीडिया शिक्षणातील अग्रणी आणि ॲप्टेक लिमिटेडच्या प्रशिक्षण ब्रँडने पर्सपेक्टिव्हज २०२६ च्या मुंबई एडिशनचा यशस्वी समारोप केला. या प्रमुख वार्षिक उद्योग प्लॅटफॉर्मवर मीडिया आणि मनोरंजन विश्वातील १००० हून अधिक विद्यार्थी, उद्योग व्यावसायिक, सर्जनशील प्रमुख आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे एकत्र आली होती.

सर्जनशील उत्कृष्टतेची ३० वर्षे साजरी करताना, या वर्षीचे एडिशन तरुण सर्जनशील व्यावसायिकांना वास्तविक जगतातील उद्योगांचे दृष्टिकोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर आधारित नवीन कार्यपद्धती, नवनवीन तंत्रज्ञान आणि वेगाने वाढणाऱ्या एव्हीजीसी-एक्सआर (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रियॅलिटी) क्षेत्रातील करिअरच्या संधींशी जोडून त्यांना प्रेरित करण्याच्या संकल्पनेवर आधारित होती.

दिवसभर चाललेल्या या इव्हेंटने महत्त्वाचे सत्र, एआय प्रात्यक्षिके, सेलिब्रिटी संवाद आणि टॅलेंट सादरीकरणाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील ज्ञानाची विद्यार्थ्यांच्या अनुभवांशी सांगड घातली. यामुळे उद्योग जगतासाठी सक्षम सर्जनशील प्रोफेशनल घडवण्याच्या अरीना अॅनिमेशनची कटिबद्धता अधिक दृढ झाली.

या इव्हेंटमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्त्व डॉ. अमित बहल, प्रतिभावान अभिनेता, नर्तक आणि कलाकार श्री. शांतनु महेश्वरी, मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा अभिनेता आदित्य देशमुख, ॲनिमेशनआणि व्हीएफएक्समधील एआयवर विशेष सत्र घेणारे दिग्दर्शक, डिझायनर व ॲनिमेटर श्री. वैभव मोरे, आर्क इन्फोसोल्युशन्सचे कंट्री मॅनेजर – मीडिया अँड एंटरटेनमेंट श्री. विनीत एस., तसेच ॲप्टेक लिमिटेडचे ग्लोबल रिटेल बिझनेसचे व्होल-टाइम डायरेक्टर व चीफ बिझनेस ऑफिसर श्री. संदीप वेलिंग आणि ॲप्टेक लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष व नॅशनल सेल्स हेड (अरेना अॅनिमेशन) श्री. शाजन सॅम्युअल यांसारख्या नामांकित व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी वेगाने बदलणारी सर्जनशील अर्थव्यवस्था, कंटेंट क्रिएशनमध्ये एआयचा वाढता प्रभाव, उद्योगासाठी आवश्यक असलेली नवीन कौशल्ये आणि अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, डिजिटल डिझाइन व चित्रपटनिर्मिती यांमधील करिअरच्या संधींविषयी प्रत्यक्ष ज्ञान मिळवले. सेलिब्रिटींच्या संवादाने त्यांच्या चिकाटीच्या, करिअरच्या प्रवासाच्या आणि सतत शिकण्याच्या वैयक्तिक कथांद्वारे उपस्थितांना अधिक प्रेरित केले.

पर्सपेक्टिव्हज २०२६ साठी मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल्स कौन्सिल (एमईएससी)ने इंडस्ट्री पार्टनर म्हणून आणि ह्यूऑनने टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून सहयोग केला. हा सहयोग उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यावर, प्रात्यक्षिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यावर आणि भारताच्या वेगाने वाढणाऱ्या एव्हीजीसी-एक्सआर जगताला आकार देणाऱ्या तंत्रज्ञानाचा, उद्योग मानकांचा व करिअरच्या संधींचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळवून देण्यावर अरेना अॅनिमेशनचा असलेला सतत भर दर्शवतो.
उद्योग क्षेत्रातील संवादांव्यतिरिक्त, पर्सपेक्टिव्हज २०२६ चे उत्साही विद्यार्थी महोत्सवात रूपांतर झाले. यामध्ये अरेनाज गॉट टॅलेंट, कॉसप्ले रॅम्प वॉक, संवादी उपक्रम, एआय प्रात्यक्षिके आणि लोकप्रिय खाऊ गल्ली फूड झोन यांचा समावेश होता. यामुळे विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, सहयोग आणि स्वतःची कला व्यक्त करण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म्स मिळाले.

तसेच, या इव्हेंटने उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहयोग अधिक दृढ करण्यावर, शिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर आणि अरीना अॅनिमेशन ओरिजिनल्स सारख्या उपक्रमांद्वारे मूळ बौद्धिक संपदा निर्मितीला प्रोत्साहन देण्यावर अरीना अॅनिमेशनच्या धोरणात्मक लक्ष्यावर भर दिला. हे उपक्रम भविष्यासाठी सज्ज असलेल्या कौशल्यांनी परिपूर्ण जागतिक दर्जाचे सर्जनशील व्यावसायिक घडवण्याच्या या संस्थेच्या दृष्टिकोनाला दर्शवतात.
अॅप्टेक लिमिटेडचे ग्लोबल रिटेल बिझनेसचे होल-टाइम डायरेक्टर व चीफ बिझनेस ऑफिसर श्री. संदीप वेलिंग म्हणाले, ” अरीना अॅनिमेशन सर्जनशील टॅलेंट घडवण्याची तीन दशके साजरी करत असताना, पर्सपेक्टिव्हज हे केवळ उद्योग जगतातील संवादापुरते मर्यादित न राहता प्लॅटफॉर्मच्या रूपात विकसित झाले आहे, जिथे प्रेरणेला संधीची साथ मिळते. एआय, इमर्सिव्ह तंत्रज्ञान आणि डिजिटल स्टोरीटेलिंगमुळे कंटेंट कसा तयार केला जातो याची व्याख्या बदलत आहे, ज्यासह, सर्जनशील अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे. पर्सपेक्टिव्हज २०२६ च्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांनी भविष्य घडवणाऱ्या उद्योग क्षेत्रातील प्रमुख, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि सर्जनशील व्यावसायिकांकडून प्रत्यक्ष शिकून या बदलांचा स्वतः अनुभव घ्यावा, अशी आमची इच्छा होती. यासोबत आमच्या विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि आवड प्रदर्शित करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे होते. अरेना ॲनिमेशनमध्ये आमचा तांत्रिकदृष्ट्या सक्षम असण्यासोबत नाविन्यपूर्ण, परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि जागतिक स्तरावर रोजगारास पात्र असलेले व्यावसायिक तयार करणे हा प्रयत्न आहे.”
डॉ. अमित बहल म्हणाले, “आजचे सर्जनशील क्षेत्र तरुणांसाठी प्रचंड संधी प्रदान करते, जे शिकण्यासाठी, परिस्थितीनुसार बदलण्यासाठी आणि आपल्या कलेबद्दल उत्सुक राहण्यासाठी तयार आहेत. अरीना ॲनिमेशननच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खूप छान वाटले, ज्यांनी उत्कृष्ट उत्साह आणि उत्सुकता दाखवली. त्यांची सर्जनशीलता आणि ऊर्जा हीच गोष्ट अधोरेखित करते की, भारतातील कथाकार, कलाकार आणि क्रिएटर्सची भावी पिढी जागतिक स्तरावर प्रभाव पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.”
श्री. शांतनु महेश्वरी म्हणाले, “प्रत्येक सर्जनशील प्रवासाची सुरुवात एका स्वप्नाने होते, पण शिस्त, सतत शिकण्याची वृत्ती आणि चिकाटी या स्वप्नांचे करिअरमध्ये रूपांतर करते. या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटणे आणि अरेनाज गॉट टॅलेंट व इतर उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची आवड प्रत्यक्ष पाहणे खरोखर प्रेरणादायी होते. मी आशा करतो की, ते स्वतःवर विश्वास ठेवत राहतील आणि समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचा स्वीकार करतील.”
भारतातील एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्र अभूतपूर्व वाढ अनुभवत आहे आणि सर्जनशील तंत्रज्ञान मनोरंजन, जाहिरात, गेमिंग व डिजिटल अनुभवांचे भविष्य बदलत आहे. या पार्श्वभूमीवर, अरेना ॲनिमेशनने आपल्या अभ्यासक्रमात एआय-सक्षम कार्यपद्धती, उद्योगांसोबत सहयोग आणि प्रात्यक्षिक शिक्षणाचा समावेश करून आपली शैक्षणिक परिसंस्था अधिक दृढ करणे सुरूच ठेवले आहे.

सर्जनशील उत्कृष्टतेची ३० वर्षे पूर्ण करत असताना, अरीना ॲनिमेशनमहत्त्वाकांक्षी कलाकार, डिझायनर्स, कथाकार, ॲनिमेटर्स आणि नवप्रवर्तकांना उद्योग-संबंधित कौशल्ये, जागतिक अनुभव व भविष्याकरिता सज्ज शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे, तसेच भारताच्या वाढत्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत आणि एव्हीजीसी-एक्सआर जगतात मोलाचे योगदान देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!