वैद्यकीय क्षेत्रातील विविध भूमिका प्रत्यक्ष अनुभवण्याच्या सहभागात्मक उपक्रमातून लहान मुलांमध्ये जिज्ञासा आणि सहवेदना निर्माण करण्यासाठी
नारायणा हेल्थच्या SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलची किडझानिया मुंबईसोबत भागीदारी

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 23/09/2026 (8850212023) 📞
मुंबई (NHI24) : नारायणा हेल्थतर्फे व्यवस्थापन करण्यात येत असलेल्या आणि एनएबीएच व जेसीआय मान्यताप्राप्त मुंबईतील आघाडीच्या टर्शरी केअर चिल्ड्रन्स हॉस्पिटलपैकी एक असलेल्या नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने किडझानिया इंडियासोबत भागीदारी केली आहे. देशातील सर्वात मोठे इनडोअर एज्युटेनमेंट थीम पार्क असलेल्या किडझानियामध्ये हेल्थकेअर प्रोफेशनल्सच्या भूमिका प्रत्यक्ष अनुभवता येतील अशा खास रोल-प्ले ॲक्टिव्हिटीज सुरू करण्यात आल्या आहेत. नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या बालरोग उपचारातील तज्ज्ञतेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश लहान मुलांमध्ये जिज्ञासा, सहवेदना आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.
या नव्या अनुभवाच्या माध्यमातून मुलांना सर्जरी, नर्सरी आणि इमर्जन्सी युनिट अशा, हॉस्पिटलमधील विविध विभागांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या भूमिका साकारता येणार आहेत. यामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या ॲम्ब्युलन्सचाही समावेश आहे. मुलांना वैद्यकीय क्षेत्रातील विविध परिस्थिती आणि उपकरणांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व समजावे तसेच त्यांच्यामध्ये चिकित्सक विचार, टीमवर्क, सहवेदना आणि रुग्णांची संवेदनशीलतेने काळजी घेण्यासारखी कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने हा अनुभव तयार करण्यात आला आहे.
भविष्यात आरोग्यसेवा क्षेत्रातील नेतृत्व घडवण्यासाठी तसेच आरोग्यसेवा प्रत्येकासाठी सहज उपलब्ध असलेले जग निर्माण करण्याची प्रेरणा मुलांना देण्यासाठी नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने किडझानिया मुंबईमध्ये हा अनोखा अनुभव सुरू केला आहे. सर्वांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे हॉस्पिटलचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. किडझानिया थिएटरमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रतीकात्मकरीत्या चावी सुपूर्द करण्यात आली, फीत कापण्यात आली आणि विशेष कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यामुळे हा उद्घाटन सोहळा अधिक संस्मरणीय ठरला.
या भागीदारीविषयी बोलताना नारायणा हेल्थचे (वेस्ट क्लस्टर) डायरेक्टर श्री. बलविंदर वालिया म्हणाले, ‘नारायणा हेल्थमध्ये आम्ही सुशिक्षित आणि संवेदनशील हेल्थकेअर प्रोफेशनल्सची पुढील पिढी घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. 29 सप्टेंबर रोजी असलेला जागतिक हृदय दिन जवळ येत असताना, या भागीदारीमुळे मुलांमध्ये लहान वयापासूनच हृदयाचे आरोग्य आणि रुग्णांची संवेदनशीलतेने काळजी घेण्याचे महत्त्व याविषयी संवाद सुरू करण्याची संधी मिळणार आहे. किडझानिया मुंबईसोबतच्या भागीदारीतून सुरू करण्यात आलेला हॉस्पिटलचा हा अनुभव मुलांना प्रत्यक्ष कृतीतून अर्थपूर्ण शिक्षण देण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय कौशल्ये आणि त्यासाठी घेतले जाणारे परिश्रम यांची ओळख यामुळे मुलांना होणार आहे. महत्त्वाच्या शस्त्रक्रियांपासून ते नवजात बालकांची नर्सरीमध्ये घेतली जाणारी काळजी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने करण्यात येणाऱ्या उपचारांपर्यंत विविध गोष्टींचा अनुभव मुलांना येथे घेता येणार आहे. त्यातून आधुनिक वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक असलेले प्रगत तंत्रज्ञान, टीमवर्क आणि स्वच्छतेचे नियम त्यांना समजणार आहेत. सहभागात्मक रोल-प्लेच्या माध्यमातून जिज्ञासू मुलांना या क्षेत्राची ओळख करून देता येणे ही या उपक्रमाची सर्वात महत्त्वाची बाब आहे. यातून भविष्यातील हेल्थकेअर क्षेत्रातील नेतृत्वाला प्रेरणा मिळण्याबरोबरच मुलांमध्ये सहवेदना, चिकित्सक विचार आणि टीमवर्क यांसारखी कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.’


चीफ बिझनेस ऑफिसर श्री. तरणदीप सिंग म्हणाले, ‘किडझानियामध्ये मुलांना प्रत्यक्ष जगाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे शिकतात, असा आमचा विश्वास आहे. आरोग्यसेवेचा प्रत्येक मुलाच्या आयुष्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध येतो. मात्र, या क्षेत्रात प्रत्यक्ष काय घडते हे जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी फार कमी मुलांना मिळते. किडझानिया मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेल्या नव्या नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमुळे मुलांना हीच संधी मिळणार आहे. मौजमजा करतानाच विविध भूमिका साकारून, प्रत्यक्ष अनुभव घेऊन आणि नवनवीन गोष्टी जाणून घेत त्यांना आरोग्यसेवेचे जग समजून घेता येणार आहे. हा अनुभव प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्यासोबत अतिशय जवळून काम केल्याबद्दल नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबईच्या संपूर्ण टीमचेही मी आभार मानतो. त्यांच्या तज्ज्ञतेमुळे आणि सहकार्यामुळे मुलांसाठी केवळ मनोरंजकच नव्हे, तर अर्थपूर्ण अनुभवही तयार करता आला आहे. आमचे हे छोटे नागरिक डॉक्टरांचा कोट घालतील, कुतूहलाने प्रश्न विचारतील आणि आरोग्यसेवेचे जग पूर्णपणे नव्या पद्धतीने अनुभवतील, याची आम्हाला उत्सुकता आहे.’ किडझानिया मुंबईमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात मनोरंजनासोबतच मुलांना मूलभूत गोष्टी शिकण्याची अनोखी संधी मिळणार आहे. विविध भूमिका प्रत्यक्ष साकारत त्यांना वैद्यकीय क्षेत्राची ओळख करून घेता येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञता आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा आनंद यांची सांगड घालत नारायणा हेल्थ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबईतर्फे मुलांमध्ये जिज्ञासा आणि सहवेदना विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भविष्यातील हेल्थकेअर क्षेत्रातील नेतृत्वाला प्रेरणा देण्याबरोबरच लहान वयापासून आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन देण्याचा दोन्ही संस्थांचा समान उद्देश या उपक्रमातून अधोरेखित होतो.
नारायणा हेल्थविषयी
डॉ. देवी शेट्टी यांनी स्थापन केलेले आणि बंगळुरूमध्ये मुख्यालय असलेले नारायणा हेल्थ हे जागतिक आरोग्यसेवा क्षेत्रातील एक आघाडीचे नाव आहे. भारतातील सर्वात मोठ्या आरोग्यसेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या नारायणा हेल्थतर्फे भारत आणि कॅरिबियनमध्ये प्राथमिक, दुय्यम आणि सुपर-स्पेशालिटी टर्शरी केअरच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. विविध वैद्यकीय क्षेत्रांतील ग्रुपची सेंटर्स ऑफ एक्सलन्स, 3,868 कुशल डॉक्टर्स आणि स्पेशालिस्ट्ससह एकूण 18,822 समर्पित प्रोफेशनल्सची टीम तसेच रुग्णांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवेतील उत्कृष्टतेवर सातत्याने दिला जाणारा भर यामुळे आरोग्यसेवा क्षेत्रात नारायणा हेल्थने विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. नारायणा वन हेल्थ (एनएच इंटिग्रेटेड केअर) आणि नारायणा हेल्थ इन्शुरन्स या नारायणा हेल्थच्या उपकंपन्या आहेत.
अधिक माहितीसाठी https://www.narayanahealth.org या वेबसाइटला भेट द्यावी.



