मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रात स्वच्छता अभियान
Cleanliness Mission

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 20/11/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM : मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत मलाबार गोल्ड एंड डायमंड्सच्या शोरूमच्या वतीने नांदेड, जळगाव, लातूरमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका व नगरपालिका यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्वच्छता मोहिमेत मलाबार गोल्ड एंड डायमंड्सच्या व्यवस्थापनातील अधिकारी, शोरूम प्रमुख, कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्रितपणे स्वच्छता उपक्रमात योगदान देत परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला.
पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि सुशासन या तत्त्वांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मलाबार ग्रुपच्या वतीने या महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील मलाबार ग्रुपच्या ९,००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
यावेळी मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “पर्यावरणाप्रती जबाबदारी, सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि नैतिक व्यावसायिक प्रशासन या मूल्यांचा व्यावसायिक कार्यपद्धतीत समावेश करून ईएसजी तत्त्वांना अधिक बळकटी देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. पर्यावरणीय शाश्वततेच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून येत्या वर्षभरात देशभरात सुमारे १ लाख वृक्षांची लागवड करण्याचे ग्रुपचे उद्दिष्ट आहे.”
व्यावसायिक कार्यासोबतच मलाबार ग्रुप समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रभावी सामाजिक उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘हंगर फ्री वर्ल्ड’ हा भूकमुक्ती उपक्रम, वंचित मुलांसाठी मायक्रो लर्निंग सेंटर्स, मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच ज्येष्ठ महिलांसाठी ‘ग्रँडमा होम्स’ यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून सामाजिक उत्तरदायित्व आणि शाश्वत विकासाप्रती मलाबार ग्रुपची असलेली बांधिलकी स्पष्ट होते.

