Entertainments

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा वर्धापन दिन, एक परंपरा… एक अभिमान… आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या एकजुटीचा उत्सव!

मराठी चित्रपटसृष्टीच्या एकजुटीचा उत्सव

POSTED BY MRUNALI SAKPAL ON DT. 10/011/2026 (9004379946)

MUMBAI (NHI@COM : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा वर्धापन दिन म्हणजे केवळ एका संस्थेच्या स्थापनेचा दिवस नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी अनेक वर्षे योगदान देणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक आणि असंख्य सभासदांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव आहे. महामंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सर्व सभासद यांच्या सहकार्याने सोमवार, रोजी महामंडळाच्या अंधेरी, मुंबई येथील कार्यालयात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलप्रसंगी महामंडळाचे सहकार्यवाह श्री. दीपक कदम यांच्या शुभहस्ते केक कापून वर्धापन दिनाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवर सभासद श्री रमाकांत मुंडे फोटोग्राफर, सुधाकर शर्मा, दिग्दर्शक विनोद डवरे, दिग्दर्शक प्रदीप दळवी, स्वाती महाडिक अतुल राजकुळे, विनोद चौरसिया, जय तारी, राजकुमार तिवारी, अभिनेत्री अश्विनी बडगे, अभिनेता सचिन देवरुखकर, अभिनेत्री सीमा राहूकर, पूजा धावडे, आणि व्यवस्थापक विशाल पवार आणि कर्मचारी वृंद मोठ्या आपुलकीने उपस्थित होते. संस्था मोठी होते ती केवळ वर्षांनी नाही, तर तिच्याशी जोडलेल्या माणसांच्या विश्वासाने, प्रेमाने आणि एकजुटीने! आपण सर्वांनी मिळून मराठी चित्रपटसृष्टीचा हा वारसा अधिक समृद्ध करूया. मतभेद असतील, विचार वेगळे असतील; पण मराठी माणूस आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी आपली एकजूट कायम राहू दे. महामंडळाचा प्रवास असाच बहरत राहो…
मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा सदैव उंच फडकत राहो! सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा वर्धापन दिन चिरायू होवो!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!