सॅमसंगचा (AI)-आधारित इकोसिस्टम्सच्या माध्यमातून आपल्या एंटरप्राइझ व्यवसायाचा विस्तार
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 10/05/2026 📞 8850212023
- भारताच्या डिजिटल प्रगतीसाठी खाजगी आणि सरकारी क्षेत्रांत अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर.
- गुरुग्राम आणि मुंबईतील ‘एक्सपिरियन्स स्टुडिओ’द्वारे व्यवसायांसाठी AI चे प्रत्यक्ष उपयोग दाखवणार.
- संस्थांना अधिक स्मार्ट, एकमेकांशी जोडलेली आणि मोठी उद्दिष्टे गाठणारी कार्यप्रणाली उभारण्यास मदत.
गुरुग्राम,NHI24.COM(M): भारतात आपला एंटरप्राइझ बिझनेस अधिक मजबूत करत असताना सॅमसंग कंपनी आता AI-आधारित आणि एकमेकांशी जोडलेली ‘इकोसिस्टम सोल्यूशन्स’ सुरु करत आहे. या प्रगत, सुरक्षित आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे संस्थांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने आणि नव्या स्वरूपात चालवण्यास मदत होणार आहे.
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि डिस्प्ले क्षेत्रात आपला भक्कम पाया मजबूत केल्यानंतर, सॅमसंग आता केवळ उपकरणांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण (End-to-end) सोल्यूशन्स देत आहे. याद्वारे व्यवसायांना माहिती आधारित (Data-driven) आणि काळानुसार बदलत असणाऱ्या प्रगत कार्यप्रणालीकडे वळण्यास मदत होईल.
गुरुग्राम आणि मुंबईतील सॅमसंगचे ‘बिझनेस एक्सपिरियन्स स्टुडिओ’ (BES) हे तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष सादरीकरणाचे व्यासपीठ आहेत. येथे सॅमसंगची विविध उपकरणे, डिस्प्ले, मोबिलिटी, AI प्लॅटफॉर्म आणि ‘नॉक’ (Knox) सुरक्षा यांसारख्या क्षमता एकत्र पाहायला मिळतात. फक्त उत्पादनांची माहिती न देता, कशा प्रकारे एकमेकांशी जोडलेली ही यंत्रणा प्रत्यक्ष कामात कार्यक्षमता, वैयक्तिक गरजा आणि प्रगती वाढवू शकते याचा अनुभव हे स्टुडिओ व्यवसायांना देतात.
“सॅमसंगमध्ये आमचा असा विश्वास आहे की, व्यवसायांचे भविष्य आता केवळ उपकरणांपुरते मर्यादित नसून ते AI-आधारित आणि एकमेकांशी जोडलेल्या यंत्रणेवर (Ecosystems) अवलंबून असेल. एक तंत्रज्ञान कंपनी म्हणून आमची ताकद आम्हाला हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सुरक्षा या सर्वांना एकाच चौकटीत एकत्र आणण्याची संधी देते. यामुळे व्यवसायांना त्यांच्या डिजिटल प्रगतीचा वेग वाढवणे, कामात लवचिकता आणणे आणि मोठ्या स्तरावर माहिती आधारित वैयक्तिक अनुभव देणे सोपे होईल,” असे सॅमसंग इंडियाच्या एंटरप्राइझ बिझनेसचे उपाध्यक्ष पुनीत सेठी यांनी सांगितले.
‘बिझनेस एक्सपिरियन्स स्टुडिओ’ (BES) मध्ये सॅमसंग रिटेल, बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस (BFSI), आरोग्यसेवा, शिक्षण आणि हॉस्पिटॅलिटी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रात्यक्षिक सादर करते. याद्वारे AI-आधारित यंत्रणा प्रत्येक क्षेत्रातील आव्हाने कशी सोडवू शकतात हे दाखवले जाते उदाहरणार्थ, रिटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करणे, बँकिंगमध्ये सुरक्षित व्यवहार करणे, तसेच आरोग्य सेवा आणि डिजिटल शिक्षण क्षेत्रात एकमेकांशी जोडलेली प्रगत यंत्रणा उभारणे.
‘बिझनेस एक्सपिरियन्स स्टुडिओ’ (BES) हे सह-निर्मितीचे एक केंद्र (Co-creation hub) म्हणूनही काम करते. येथे सॅमसंग आपल्या भागीदार आणि कंपन्यांसोबत मिळून त्यांच्या गरजांनुसार खास सोल्यूशन्स तयार करते, ज्यामुळे तंत्रज्ञानाची अंमलबजावणी वेगाने होते आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
भारतामध्ये ३० वर्षे पूर्ण करत असताना, सॅमसंगची खरी ताकद ही हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सुरक्षिततेचा मेळ घालून एक संपूर्ण कार्यप्रणाली (End-to-end ecosystem) देण्यात आहे. भारताच्या डिजिटल परिवर्तनाशी सुसंगत राहून कंपनी खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतील विविध प्रकल्पांवर काम करत आहे. तसेच, वेगवेगळ्या उद्योगांशी आपले संबंध अधिक दृढ करण्यावर सॅमसंगचा भर आहे.
भारत हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रगतीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. हे लक्षात घेऊन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक पातळीवरील शोध आणि भक्कम भागीदारीच्या माध्यमातून ग्राहक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रांत दीर्घकालीन प्रगती साधण्यासाठी सॅमसंग कटिबद्ध आहे.
Samsung Newsroom India: Samsung Expands Enterprise Play with AI-Powered Ecosystems




