Businessखेल

बीओबी बुद्धिबळ स्पर्धेत अहान, अथर्व, ईशा, अरोहाची विजयी सलामी

बीओबी बुद्धिबळ

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 16/08/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM : : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग सहप्रायोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित बीओबी कप शालेय मुलामुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत अहान कटरुका, अथर्व दाभोळकर, ईशा मंगलपल्ली, अरोहा चूघ आदींनी सलामीचे सामने जिंकले. १२ वर्षांखालील गटात पहिल्या पटावर अहान कटरुकाने अर्णव जगताप याच्या राजाला २५ व्या चालीला जेरीस आणून पहिला साखळी गुण वसूल केला. स्पर्धेचे उद्घाटन अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे प्रमुख पंच प्रतीक धोत्रे, बुद्धिबळप्रेमी राजन लाड, सुरेश मोरे, गंगाराम तावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन हॉलमध्ये १२ वर्षांखालील गटात दुसऱ्या पटावर अथर्व दाभोळकरने सुजय सावंतच्या राजावर २१ व्या चालीमध्ये मात केली.
८ वर्षांखालील गटात ईशा मंगलपल्लीने अर्ना सावंतला, अरोहा चूघने कियांश होनपला, चैतन्य आनंदने मोहम्मद अर्जाद खानला, शर्विल गोल्हारने एव्हिन डी अल्मेडा ला हरवून पहिला गुण घेतला. १० वर्षांखालील गटात आरोन गुरियाने श्रीहान पुरणकरवर, आर्यन भोसलेने श्रुतिका शेरेगरवर आणि विहान पटेलने मोहम्मद ओवेसवर पहिल्या साखळी सामन्यात विजय मिळवला.
आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्यित स्पर्धेत बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागाच्या सौजन्याने प्रत्येक वयोगटातील १५ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!