रोहित शर्मा बनला ‘फ्रेअर एनर्जी’चा पहिला ब्रँड ॲम्बेसेडर; ‘सोलर हो, तो फ्रेअर हो!’ मोहिमेला सुरुवात
ही मोहीम एका साध्या विचारावर आधारित आहे: रूफटॉप सोलर बसवणे हा ३० वर्षांचा निर्णय असतो.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 02/10/2026 (8850212023) 📞
मुंबई (NHI24) : ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ (PM Surya Ghar: Muft Bijli Yojana) अंतर्गत भारतातील निवासी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रूफटॉप सोलर कंपनी असलेल्या ‘फ्रेअर एनर्जी’ने (Freyr Energy), भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा याची कंपनीचा पहिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा आज केली. या भागीदारीची सुरुवात ‘सोलर हो, तो फ्रेअर हो!’ (Solar Ho, Toh Freyr Ho!) या देशव्यापी मोहिमेद्वारे होत आहे.
त्यामुळे केवळ सोलर सिस्टिमची स्थापना करणारी नव्हे, तर पुढील अनेक वर्षे दर्जेदार सेवा देणारी विश्वासार्ह कंपनी निवडणे महत्त्वाचे ठरते. ‘फ्रेअर एनर्जी’ने गेल्या दशकाहून अधिक काळ भारतातील घरांच्या छतांवर याच विश्वासाची आणि गुणवत्तेची परंपरा निर्माण केली आहे. कंपनीने ४० हून अधिक शहरांमध्ये २०,००० हून अधिक सौर ऊर्जा प्रणालींचे डिझाइन, वित्तपुरवठा, स्थापना आणि देखभाल केली आहे. यासोबतच, ग्राहकांसाठी ॲप, ‘सेल्फ-क्लीनिंग’ अर्थात आपोआप स्वच्छ होणाऱ्या सौर ऊर्जा प्रणाली आणि ‘सोलर एक्सपिरियन्स सेंटर्स’ यांसारखे उद्योगातील नाविन्यपूर्ण उपक्रमही कंपनीने सर्वप्रथम सादर केले आहेत.
‘फ्रेअर एनर्जी’चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ मारडा म्हणाले, “केवळ सोलर सिस्टिम बसवण्याच्या दिवसापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण ३० वर्षांच्या कार्यकाळात रूफटॉप सोलरकडून भारतीय घरमालकांनी काय अपेक्षा ठेवावी, याचा दर्जा उंचावणे हे आमचे नेहमीच ध्येय राहिले आहे. रोहितने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कामगिरीतून हाच दर्जा सातत्याने प्रस्थापित केला आहे. त्यामुळे आमचा पहिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्याची निवड होणे ही आमच्यासाठी अगदी स्वाभाविक बाब आहे.”




