योगीजी डिजी लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर
योगीजी डिजी लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 21/07/2026 📞 9004379946
मुंबई NHI24.COM : भारतातील आघाडीच्या स्वदेशी आणि एकात्मिक फ्लॅट स्टील प्रोसेसिंग सोल्यूशन्स पुरवठादारांपैकी एक असलेल्या योगीजी डिजी लिमिटेड (“कंपनी”)ने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांना फ्लॅट स्टील प्रोसेसिंग उपकरणांचा पुरवठा करत कोल्ड-रोलिंग आणि डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग बाजारपेठेत एंड-टू-एंड सोल्यूशन्स उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणून (CRISIL अहवालानुसार) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्याकडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.
कंपनी प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे इक्विटी शेअर ऑफरच्या माध्यमातून निधी उभारण्याची योजना आखत आहे. या पब्लिक ऑफरमध्ये 2,700.00 दशलक्ष रु. (270 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 7,171,290 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे.
योगीजी डिजीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये फ्लॅट स्टील प्रोसेसिंग उपकरणांची संपूर्ण श्रेणी समाविष्ट आहे. यामध्ये कोल्ड रोलिंग मिल्स, अॅनिलिंग अँड पिकलिंग लाइन्स, पिकलिंग लाइन्स, ॲसिड रिजनरेशन प्लांट्स, मेटल कोटिंग लाइन्स (GI/GL/ZM लाइन्स), कलर कोटिंग लाइन्स, अदर अॅन्सिलरी लाइन्स (यामध्ये स्लिटिंग, ट्रिमिंग आणि रिवाइंडिंग कम ट्रिमिंग लाइन्सचा समावेश आहे), स्किन पास मिल्स, स्पेअर्स अँड कॉम्पोनंट्स, रिवॅम्प्स अँड रेट्रोफिटिंग तसेच इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन सोल्यूशन्स यांचा समावेश आहे.
कंपनीची उत्पादने स्टील, मेटल प्रोसेसिंग आणि संबंधित क्षेत्रांतील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतात. यामध्ये स्वतंत्र फ्लॅट स्टील उत्पादक तसेच एकात्मिक स्टील उत्पादकांचा समावेश आहे. CRISIL अहवालानुसार, भारतातील CRM विभागात पुरवठा केलेल्या CRMच्या आधारे कंपनीचा अंदाजे 53% बाजारपेठीयहिस्सा होता. तसेच, 31 मार्च 2023 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षापासून 31 मार्च 2025 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षादरम्यानच्या तीन आर्थिक वर्षांत देशात निर्माण झालेल्या एकूण क्षमतेपैकी सुमारे 38% क्षमतेत कंपनीचे योगदान होते.
कंपनीची भारतातील हरियाणा राज्यातील पलवल येथे तीन उत्पादन युनिट्स आहेत. या युनिट्सचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 31,565 चौ.मी. असून, एकत्रित उत्पादन क्षेत्रफळ अंदाजे 14,170 चौ.मी. आहे. ही उत्पादन केंद्रे विविध प्रकारच्या उत्पादन प्रक्रियांची अंमलबजावणी करण्यास सक्षम आहेत.
31 मे 2026 पर्यंत योगीजी डिजीच्या ग्राहकवर्गामध्ये स्टील, मेटल प्रोसेसिंग आणि संबंधित क्षेत्रांतील ग्राहकांसह एकूण 22 सक्रिय ग्राहकांचा समावेश होता.
या इश्यूसाठी एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड यांची बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
About Yogiji Digi Limited
Yogiji Digi Limited is one of the few manufacturers offering complete in-house integration of mechanical manufacturing, electrical systems and automation software, with electrical, mechanical and hydraulic automation systems captively and offered as part of an integrated package along with the mill equipment, making it a full-service solutions provider in the cold rolling and metal processing equipment segment, according to the CRISIL Report. Its backward integration capabilities further strengthen manufacturing operations by enabling in-house production of critical components, including mill housings, chocks and paint coaters, reducing dependence on third-party suppliers and ensuring greater control over quality, cost and delivery timelines, which enables the company to maintain the dimensional accuracy, according to the CRISIL Report.




