भारताबाहेर वितरणासाठी नाही नॅक पॅकेजिंग लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) बुधवार, 1 जुलै 2026 रोजी होणार खुली; प्रति इक्विटी शेअरसाठी 161 रु. ते 170 रु. असा किंमतपट्टा निश्चित
प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक हा बोली/प्रस्ताव सुरु होण्याच्या कामकाजाच्या एक दिवस आधी म्हणजे मंगळवार, 30 जून 2026 असेल.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON 24/06/2026 (8850212023)
नॅक पॅकेजिंग लिमिटेड (“कंपनी”) च्या 10 रु. दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी समभाग”) 161 रु. ते 170 रु. असा किंमतपट्टा निश्चित
प्रमुख गुंतवणूकदार बोली/ ऑफर दिनांक – मंगळवार, 30 जून 2026
बोली/ऑफर खुली होण्याचा दिनांक – बुधवार, 01 जुलै 2026 आणि बोली/ ऑफर बंद होण्याचा दिनांक – शुक्रवार, 03 जुलै 2026
प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 88 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या 88 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल
Mumbai : (NHI24.COM) नॅक पॅकेजिंग लिमिटेड (“कंपनी”) कंपनी बुधवार, 1 जुलै 2026 रोजी प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. बोली/प्रस्ताव बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 03 जुलै 2026 आहे.
प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक हा बोली/प्रस्ताव सुरु होण्याच्या कामकाजाच्या एक दिवस आधी म्हणजे मंगळवार, 30 जून 2026 असेल.
कंपनीच्या 10 रु. दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी 161 रु. ते 170 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. कर्मचारी आरक्षण भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना 10 रु. दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी समभागावर 16 रु. इतकी सवलत (“कर्मचारी सवलत”) देण्यात येत आहे. प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 88 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 88 इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल.
या ऑफरमध्ये 3,800.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन फ्रेश इश्यू (Fresh Issue) आणि विक्री करणाऱ्या समभागधारकांकडून 3,500,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (Offer for Sale) यांचा समावेश आहे. यामध्ये श्री. अल्पेश तुलसीभाई पटेल यांच्याकडून 675,750 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, श्री. प्रविणकुमार अंबालाल पटेल यांच्याकडून 300,000 पर्यंत इक्विटी शेअर्स आणि श्री. रश्मिनभाई तुलसीभाई पटेल यांच्याकडून 675,750 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “प्रवर्तक विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे. तसेच, प्रवर्तक समूह विक्री समभागधारकांकडून एकत्रितपणे 1,561,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि इतर विक्री समभागधारकांकडून 287,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.
नॅक पॅकेजिंग लिमिटेड ही एकात्मिक, नाविन्यपूर्णतेचा आग्रह धरणारी, निर्यात-प्रेरित आणि शाश्वततेवर भर देणाऱ्या पॅकेजिंग सोल्यूशन्स पुरवठादारांपैकी एक अग्रगण्य कंपनी आहे. कंपनी प्रिंटेड आणि लॅमिनेटेड विणलेल्या पॉलीप्रॉपिलीन (“PLWPP”) पिशव्या तसेच PLWPP पिंच बॉटम पिशव्या यांसह विविध प्रकारच्या पॅकेजिंग उपाययोजना पुरविते. या सानुकूलित आणि उच्च-क्षमता असलेल्या पॅकेजिंग उपायसुविधा अन्नपदार्थ, पाळीव प्राण्यांचे खाद्यपदार्थ आणि इतर विविध क्षेत्रांसाठी वापरल्या जातात. (स्रोत: टेक्नोपॅक अहवाल)
2013 मध्ये स्थापन झालेली कंपनी मोठ्या प्रमाणातील लवचिक पॅकेजिंग उपायसुविधांची उत्पादक आहे. मार्च 2026 पर्यंत गुजरातमधील उत्पादन केंद्रांमध्ये विणलेल्या पॉलीप्रॉपिलीन (“WPP”) पिशव्या, PLWPP पिशव्या, PLWPP पिंच बॉटम पिशव्या आणि इतर उत्पादनांसाठी कंपनीची प्रभावी जोडणी उत्पादन क्षमता वार्षिक 43,300 मेट्रिक टन इतकी होती. कंपनी B2B2C मॉडेलअंतर्गत अनेक आघाडीच्या ब्रँड्सना सेवा पुरवत आहे. PLWPP पिंच बॉटम पिशव्यांसह आर्थिक वर्ष 2025 मध्ये मोठ्या प्रमाणातील लवचिक PLWPP पिशव्यांच्या भारतीय बाजारपेठेत कंपनीचा अंदाजे 10.1% बाजारपेठीय हिस्सा होता. (स्रोत: टेक्नोपॅक अहवाल). कंपनी ही बायॲक्सियली ओरिएंटेड पॉलीप्रॉपिलीन (“BOPP”)/PLWPP पिशव्यांच्या उत्पादन क्षेत्रातील सुरुवातीच्या कंपन्यांपैकी एक असून, PLWPP पिंच बॉटम पिशव्यांमध्ये लेझर कट आणि सहज उघडता येणारे वैशिष्ट्य समाविष्ट करून देणारी भारतातील (आणि आशियातील) पहिली कंपनी आहे. (स्रोत: टेक्नोपॅक अहवाल). स्वतःच्या मुद्रण सुविधेच्या माध्यमातून कंपनी आपल्या ग्राहकांना कलाकृतींची निवड किंवा निर्मिती तसेच सिलिंडर विकासासह संपूर्ण डिझाइन सेवा सादर करते. कंपनीकडे 31 मे 2026 पर्यंत 1,950 हून अधिक ग्राहकांसाठी विकसित करण्यात आलेले 73,000 पेक्षा अधिक सिलिंडर्स आणि 13,379 एसकेयू (SKU) होते. याद्वारे कंपनी ग्राहकांच्या ब्रँडिंग साहित्याची संरक्षक म्हणून काम करते आणि दीर्घकालीन ग्राहक संबंध दृढ करण्यास मदत होते. कंपनीकडे सिलिंडर साठवणुकीसाठी 92,065.47 चौरस फूट क्षेत्रफळाचे समर्पित गोदाम आहे. या सेवेमुळे विविध उत्पादनांमध्ये सातत्यपूर्ण मुद्रणाची गुणवत्ता राखण्यास मदत होते. आपल्या ग्राहकांसाठी ब्रँडची सुसंगतता कायम राहावी यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आआहे देशभरातील स्थान आणि 71 देशांमध्ये होणारी निर्यात यामुळे कंपनीला विविध ग्राहकवर्गाला प्रभावीपणे सेवा देता येते, बाजारपेठेतील मागण्यांना तत्पर प्रतिसाद देता येतो आणि देशांतर्गत तसेच निर्यात विभागांमध्ये आपला विस्तार वाढवता येतो.
कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष 2024 मधील 6,545.59 दशलक्ष रु. वरून आर्थिक वर्ष 2026 मध्ये 8,234.34 दशलक्ष रु. पर्यंत वाढला असून या कालावधीत त्याचा CAGR 12.16% राहिला आहे. EBITDA मार्जिन आर्थिक वर्ष 2024 मधील 15.38% वरून आर्थिक वर्ष 2026 मध्ये 20.42% पर्यंत वाढले आहे. करपश्चात नफा (PAT) आर्थिक वर्ष 2024 मधील 459.77 दशलक्ष रु. वरून आर्थिक वर्ष 2026 मध्ये 927.24 दशलक्ष रु. पर्यंत वाढला असून या कालावधीत CAGR 42.01% राहिला आहे. याच कालावधीत विक्रीचे एकूण प्रमाण 30,590.10 मेट्रिक टनवरून 38,157.49 मेट्रिक टनपर्यंत वाढले असून CAGR 11.69% राहिला आहे. ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR नियम 6(1) च्या नियमनात आहे.
पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) भाग: निव्वळ ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नाही
बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार भाग: निव्वळ ऑफरच्या किमान 15%
किरकोळ गुंतवणूकदार भाग: निव्वळ ऑफरच्या किमान 35%
कर्मचारी आरक्षण भाग: एकूण 20.00 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या [•] पर्यंत इक्विटी समभाग. कर्मचारी आरक्षण भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना 10 रु. दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी समभागावर 16 रु. इतकी सवलत (“कर्मचारी सवलत”) देण्यात येत आहे.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तसेच, कर्मचारी सवलतीनंतर लागू होणाऱ्या ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त दराने प्राप्त झालेल्या वैध बोलींच्या अधीन राहून कर्मचारी आरक्षण भागात अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रमाणानुसार इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात येईल.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) (BSE आणि NSE मिळून एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंजेस”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी नामनिर्देशित स्टॉक एक्स्चेंज NSE असेल.
सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड आणि पॅन्टोमॅथ कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.



