Business

बीएनवाय आणि कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वूमन यांच्याकडून तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी ‘शक्ती अलायन्स’ लाँच

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON  : 09/10/2026 (8850212023) 📞 

पुणे (NHI24) : बीएनवाय (NYSE: BNY) ही जागतिक आर्थिक सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आणि कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वूमन (सीसीओईडब्ल्यू) यांनी आज बहुवार्षिक उपक्रम ‘शक्ती अलायन्स’च्या लाँचची घोषणा केली. हा उपक्रम एआय आणि अभियांत्रिकी शिक्षणातील गुंतवणुकीच्या माध्यमातून महिला तंत्रज्ञान प्रमुखांची भावी पिढी घडवण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

शक्ती अलायन्स प्रामुख्याने अनुभवात्मक शिक्षण, उपयोजित संशोधन, अभ्यासक्रम संवर्धन आणि प्राध्यापक विकास यांवर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना वाढत्या एआय-केंद्रित जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये, ज्ञान आणि उद्योग जगताचा थेट अनुभव मिळू शकेल.

हा सहयोग बीएनवायचे जागतिक अभियांत्रिकी कौशल्य व मोठ्या प्रमाणावर एआय उपयोगात आणण्याचा अनुभव, आणि कमिन्स कॉलेजची तंत्रज्ञान क्षेत्रातील शैक्षणिक उत्कृष्टता यांना एकत्र आणतो. या सहयोगामधून कुशल टॅलेंटला अधिक निपुण करणे, तसेच विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण आणि उद्योगांचे दृष्टिकोन प्रदान करणे, ही दोन्ही संस्थांची कटिबद्धता दिसून येते. 

या सहयोगांतर्गत खालील प्रमुख क्षेत्रांमधील संधींचा शोध घेतला जाण्याची अपेक्षा आहे:

  • अनुभवात्मक शिक्षण: प्रकल्प, मार्गदर्शन आणि उद्योग जगताशी थेट संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि त्वरित डिलिव्हरी पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची संधी.

  • एआय रिसर्च लॅब: उद्योग जगतासाठी उपयुक्त एआय अॅप्लिकेशन्सचा विकास आणि शैक्षणिक सहयोगावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संशोधन प्रयोगशाळेच्या माध्यमातून संभाव्य एआय इनोव्हेशन उपक्रमांचा शोध.

  • अभ्यासक्रम संवर्धन: अभ्यासक्रमात संयुक्त सुधारणा, संभाव्य कॅपस्टोन प्रोजेक्ट्सच्या संधी आणि शैक्षणिक शिक्षणाला प्रत्यक्ष तंत्रज्ञान व अभियांत्रिकी पद्धतींशी जोडणारे उद्योग सहभाग उपक्रम.

  • प्राध्यापक विकास: उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आधुनिक अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण, ज्ञान आदान-प्रदान आणि बीएनवायच्या तज्ज्ञांसोबत संवादाच्या संधी.

“एआय तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांना नवीन आकार देत आहे,” असे बीएनवायच्या चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर आणि ग्लोबल हेड ऑफ इंजिनिअरिंग ली-अॅन रसेल म्हणाल्या. “विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणाचा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात वापर करता यावा आणि प्राध्यापकांना उपयोजित संशोधन व आधुनिक शिक्षण पद्धतींचा विस्तार करता यावा, यासाठी बीएनवायच्या प्रदीर्घ उद्योग अनुभवाला सीसीओईडब्ल्यूशी एकत्र करताना आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही सहयोगाने महिला इंजीनिअर्सच्या पुढच्या पिढीला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देण्यासाठी आणि या एआय-सक्षम जगात नेतृत्व करण्यासाठी नवीन मार्ग निर्माण करत आहोत.”

“हा सहयोग सीसीओईडब्ल्यू आणि बीएनवाय यांच्यातील दीर्घकालीन संबंधांमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे,” असे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वूमनच्या प्राचार्या डॉ. माधुरी खांबेटे म्हणाल्या. “अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांना सक्षम करण्याच्या आमच्या परंपरेला बीएनवायच्या उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञतेशी एकत्र करुन आम्ही विद्यार्थिनींसाठी सध्याच्या मागणीनुसार कौशल्ये विकसित करण्याच्या नवीन संधी निर्माण करू. आम्ही महिला अभियंत्यांच्या भावी पिढीमध्ये भविष्यासाठी-सुसज्ज टॅलेंट घडवणे, नाविन्यतेला चालना देणे, उद्योगांसाठी आवश्यक सज्जता निर्माण करणे आणि नेतृत्वगुण रुजवणे या आमच्या सामायिक कटिबद्धतेला पुढे नेण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!