Business

डॉ. हेगडे चषक कॅरम स्पर्धेत मुंबईचा प्रसन्न विजेता; रत्नागिरीचा आदित्य उपविजेता      

न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत,यांनी उपांत्यपूर्व उपविजेते आयईएस स्कूल-वाशीचा वेदांत मांढरे, शारदाश्रम विद्यामंदिरचा सोहम जाधव केले आहे.

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON 08/06/2026 ( 8850212023 )

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक १६ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता तर शिर्के हायस्कूल-रत्नागिरीचा आदित्य देसाई उपविजेता ठरला. कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीच्या बलाढ्य भरत सावंतचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आणणाऱ्या आदित्य देसाईला राणीवर सतत कब्जा मिळवीत अचूक खेळ करणाऱ्या प्रसन्न गोळेकडून २५-१ असा पराभव पत्करावा लागला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी नगरपाल डॉ.जगन्नाथराव हेगडे, आयडियल अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रेमी दिलीप वरेकर, संयोजक लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत पार पडला.

तत्पूर्वी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात झालेल्या उपांत्य फेरीत आदित्य देसाईने कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीच्या भरत सावंतला ८-७ असे तर प्रसन्न गोळेने कनोसा हायस्कूलच्या वेदिका पोमेंडकरला १४-५ असे हरविले आणि अंतिम फेरीत धडक दिली. स्पर्धेमध्ये भरत सावंत व वेदिका पोमेंडकर यांनी उपांत्य उपविजेते; न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, आयईएस स्कूल-वाशीचा वेदांत मांढरे, शारदाश्रम विद्यामंदिरचा सोहम जाधव, पाटकर विद्यालय-डोंबिवलीची निधी सावंत यांनी उपांत्यपूर्व उपविजेते तर विश्वनाथ विद्यालय-राजापूरची निधी सप्रे, शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा कदम, महात्मा गांधी विद्यालयाची तनया दळवी, पोद्दार हायस्कूलचा पुष्कर गोळे, शारदाश्रम विद्यामंदिरचा आरव आंजर्लेकर, सीएनएमएस स्कूलचा दैविक जैन, सेंट पॉल हायस्कूलचा रुद्र पोसरेकर, महिला मंडळ शाळेचा विराज बर्वे यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार जिंकला. विविध जिल्ह्यातील ६२ खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या स्पर्धेतील शालेय खेळाडूंना मार्गदर्शक सचिन शिंदे, संतोष जाधव, चंद्रकांत करंगुटकर यांचे मोफत मार्गदर्शन देखील केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!