खेल

बीओबी बुध्दिबळ स्पर्धेत तामोजी चक्रबर्ती, अमृता लाड प्रथम

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON  : 10/10/2026 (8850212023) 📞 

Mumbai : (NHI24) ऑफ बडोदा-मुंबई विभाग तर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या मुंबई विभागीय बीओबी निवड चाचणी बुध्दिबळ स्पर्धेमधील पुरुष गटात तामोजी चक्रबर्तीने तर महिला गटात अमृता लाडने प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटामधील निर्णायक साखळी पाचव्या फेरीच्या पहिल्या पटावर विकास महाडिकच्या लढवय्या चालींना तोडीस तोड प्रत्युत्तर देत तामोजी चक्रबर्तीने २३ व्या चालीला रंगतदार सामना बरोबरीत सोडविण्यास भाग पाडला. परिणामी सरस सरासरीच्या बळावर तामोजी चक्रबर्तीने (४.५ गुण) प्रथम स्थानावर झेप घेतली. विकास महाडिकला (४.५ गुण) द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.

बॅलार्ड पियर येथील बीओबी क्रीडा गृहामधील पुरुषांच्या दुसऱ्या पटावरील सामन्यात अनिकेत सकपाळने संकेत साकरेच्या राजाला २८ व्या चालीला जेरील आणले आणि साखळी ४ गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. महिलांच्या निर्णायक सामन्यात पहिल्या पटावर अमृता लाड विरुद्ध देवी शांती यामधील लढत देखील १४ चालींमध्ये बरोबरीत सुटली. सरस सरासरीच्या बळावर अमृता लाडने (२.५ गुण) प्रथम तर देवी शांतीने (२.५ गुण) द्वितीय क्रमांक मिळविला. आक्रमक चाली रचत इंदिरा राणेने नवेजीता गुलेरीला नमवून साखळी २ गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. मुंबई विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक सागर आर., क्रीडा संयोजक प्रदीप सुरोशे, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!