IPO AND MARKET NEWS

बॉनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेडची (आयपीओ) गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी खुली होणार

या ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर 558 रु. ते 586 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे (“Price Band”).

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON  : 12/10/2026 (8850212023) 📞

  • प्रति समभाग 10 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची फ्लोअर प्राईस 55.8 पट, तर कॅप प्राईस ही दर्शनी मूल्याच्या 58.6 पट निश्चित करण्यात आली आहे.
  • बोली/ऑफर प्रक्रिया गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 19 ऑक्टोबर 2026 रोजी बंद होईल (“बोली दिनांक”).
  • प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोली/ऑफर प्रक्रिया कालावधी बुधवार, 14 ऑक्टोबर 2026 असेल.
  • बोली किमान 25 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 25 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“No. of Bids”).
  • आरएचपी लिंक:

https://www.icicisecurities.com/console/uploads/actual/BONFIGLIOLI-TRANSMISSION-LIMITED—RHP_1791727263_81.pdf 

Mumbai : (NHI24) बॉनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेड (“कंपनी”) आपल्या इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्रीसंदर्भातील बोली/ऑफर प्रक्रिया गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू करणार आहे. बोली किमान 25 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 25 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“Minimum Bid Lot”). अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीचा दिनांक बुधवार, 14 ऑक्टोबर 2026 हा असेल. बोली/ऑफर प्रक्रिया गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू होईल. या ऑफरमध्ये प्रवर्तक समभाग विक्री समभागधारक बॉनफिग्लिओली एस.पी.ए. (Bonfiglioli S.p.A.) यांच्याकडून एकूण 43,239,042 पर्यतच्या समभागांची विक्री केली जाणार आहे. प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य केवळ 10 रु. आहे.

(डावीकडून उजवीकडे) 1. लुईसा सैटा – ग्रुप मुख्य वित्त अधिकारी, बोनफिग्लिओली एस.पी.ए. (Bonfiglioli S.p.A.) 2. केनाडी व्ही. कैप्पल्ली – व्यवस्थापकीय संचालक, बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेड. 3. जी. ए. बालाजी – पूर्णवेळ संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी, बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेड.

बॉनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेड (“कंपनी”) ही भारतातील यांत्रिक आणि विद्युत-यांत्रिक ऊर्जा वहन तसेच औद्योगिक ड्राइव्ह सोल्यूशन्स क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी विविध प्रकारच्या अंतिम वापर क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे, अचूक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाने विकसित केलेले गिअर मोटर्स, गिअरबॉक्सेस आणि ड्राइव्ह सिस्टीम्स यांची विस्तृत श्रेणी तयार करते. कंपनीची परंपरा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त असलेल्या बॉनफिग्लिओली या ब्रँडवर आधारित आहे. या ब्रँडला जगभरात जवळपास 70 वर्षांचा इतिहास असून, भारतात कंपनी 25 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. कंपनीची प्रवर्तक संस्था बॉनफिग्लिओली एस.पी.ए.चे मुख्यालय इटलीमध्ये आहे.

यांत्रिक आणि विद्युत-यांत्रिक ऊर्जा वहन तसेच औद्योगिक ड्राइव्ह सोल्यूशन्स उद्योगातील तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत असलेल्या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ही एक आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे विक्रीसाठी प्रस्तावित असलेले समभाग बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”; बीएसईसह एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंजेस”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीएनपी परिबास, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूसाठीचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!