आरोग्य

जगात आता नव्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे

हा आजार कोरोनापेक्षाही खतरनाक मानला जात

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 10/05/2026 📞  8850212023

जगात आता नव्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे, हा आजार कोरोनापेक्षाही खतरनाक मानला जात आहे, कारण या आजारावर अद्यापही कोणतीही विशिष्ट लस किंवा उपचार विकसीत झालेले नाही.

जग आता कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराच्या विळख्यात, पुन्हा लॉकडाऊन लागणार? चिंता वाढली

मुंबई NHI24.COM(M) काही वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगभरात खळबळ उडून दिली होती. कोरोनाच्या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. संपूर्ण जगभरात हाहाकरा उडाला होता. कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झालं होतं. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं होतं. या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. दरम्यान आता पुन्हा एकदा एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सध्या हंता व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात अर्जेंटीनामधून रवाना झालेल्या एका क्रूजवर पहिल्यांदा या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. या क्रूजमधून 108 जण प्रवास करत होते, त्यातील 8 जणांना या आजाराची लागण झाली होती, त्यातील तिंघाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका डच कपलचा समावेश होता, तर एक प्रवासी हा जर्मनीचा नागरिक होता.

दरम्यान आता या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनुसार सध्या सधी घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाहीये. सध्या तरी या आजाराचा फार प्रादुर्भाव झालेला नाही. मात्र ध्रुवीय प्रदेश किंवा इतर देशांसाठी तुम्ही क्रूज बुक करत असाल तर काळजी घ्यावी असं आवाहान जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!