जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलचा उपक्रम; ‘क्विट टू लिव्ह’ या सार्वजनिक कलाकृतीचे अनावरण
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलचा उपक्रम

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 29/05/2026 📞 8850212023

मुंबई NHI24.COM: जागतिक तंबाखूविरोधी दिन २०२६ निमित्त पी.डी. हिंदूजा हॉस्पिटल एण्ड मेडिकल रिसर्च सेंटरने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हॉस्पिटलच्यावतीने दादर येथील शिवाजी पार्क आणि खार जिमखाना येथे ‘क्विट टू लिव्ह’ नामक सार्वजनिक कलाकृती उभारण्यात आली आहे. ही कलाकृती खराब झालेल्या मानवी फुफ्फुसाची हुबेहुब आणि महाकाय प्रतिकृती आहे. धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसाच्या आरोग्यावर होणा-या घातक परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, हा यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून हॉस्पिटलने नागरिकांसाठी विनामूल्य फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणारी चाचणीही आयोजित केली होती.
भारतीयांमधील धूम्रपान, तंबाखू आणि इतर प्रकारांचे सेवन ही देशासमोरील गंभीर समस्या बनली आहे. तंबाखूमुळे हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, पक्षाघात आणि फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता दुणावते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, तंबाखू हे भारतात आजार आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागील प्रमुख कारण मानले जाते. भारतात दरवर्षी तब्बल १३.५ लाख लोकांचा मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे होतो. तंबाखूच्या घातक परिणामांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध संस्था आणि सरकारी यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करायला हवी. लोकांना निरोगी जीवनशैली निवडण्यासाठी प्रोत्साहित करणे, ही काळाची गरज आहे. याच सामाजिक बांधिलकीतून, पी.डी.हिंदूजा हॉस्पिटलकडून गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून तंबाखूमुक्ती क्लिनिक सुरु आहे. हे क्लिनिक लोकांना तंबाखूचे व्यसन कायम सोडण्याकरिता मोलाची मदत करते. या क्लिनिकच्या माध्यमातून संबंधित व्यसनींना वैद्यकीय मार्गदर्शनही दिली जाते.
या उपक्रमाबद्दल बोलताना पी.डी. हिंदूजा हॉस्पिटल एण्ड मेडिकल रिसर्च सेंटरचे सीईओ श्री. गौतम खन्ना यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, “आरोग्य संस्थांची जबाबदारी केवळ हॉस्पिटलच्या भिंतीपुरती मर्यादित नाही, असे आमचे मत आहे. निरोगी समाज घडावा, हे आपले कर्तव्य आहे. तंबाखूचे वाढते सेवन ही देशासमोर गंभीर समस्या आहे. या सार्वजनिक कलाकृतीद्वारे फुफ्फुसाच्या आरोग्यावर जास्तीत जास्त चर्चा व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. लोकांना आणि विशेषतः आपल्या तरुण पिढीला धूम्रपान आणि तंबाखू सोडून उत्तम आरोग्याची निवड करण्यासाठी प्रवृत्त करणे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”
पी.डी.हिंदूजा हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट, पल्मोनोलॉजिस्ट आणि एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. लॅन्सेलोट पिंटो म्हणाले, “धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनाचे घातक परिणाम नकळतपणे हळूहळू वाढत जातात. कालांतराने फुफ्फुसाचे न भरुन येणारे नुकसान होऊ शकते. तंबाखूच्या सततच्या वापरामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता घटते. तंबाखूच्या सततच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवतात. या कलाकृतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेने आपल्या फुफ्फुसाचे आरोग्य समजून घ्यावे, अशी आमची इच्छा आहे. आजाराचे वेळेवर निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे, हे लोकांना कळावे, हा यामागील उद्देश आहे. तंबाखूमुळे होणा-या आजारांचा धोका आणि त्यावरील भार कमी करण्यासाठी वेळेवर झालेली जनजागृती आणि व्यसनमुक्ती महत्त्वाची ठरते.”
‘क्विट टू लिव्ह’ सारख्या सार्वजनिक कलाकृतीच्या माध्यमातून पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलने जनजागृती आणि लोकसहभागाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. प्रतिबंधात्मक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हॉस्पिटल सतत प्रयत्नशील असते. हॉस्पिटलने धूम्रपान, फुफ्फुसाचे आरोग्य आणि आजारांचे वेळेवर निदान होणे या सर्व गंभार विषयांवर सार्वजनिक पातळीवर चर्चा सुरु केली आहे. परिणामी, लोकांमध्येही याबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. ते खुलेपणाने याविषयी बोलू लागले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना जागरुक व्हावे, असा विश्वास हॉस्पिटलच्यावतीने व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी अचूक माहितीच्या आधारे योग्य निर्णय घ्यावेत आणि निरोगी जीवन जगावे, यासाठी हॉस्पिटल लोकांना प्रोत्साहित करत आहे.
पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल एण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या तंबाखूमुक्ती क्लिनिलबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.hindujahospital.com/speciality/tobacco-cessation-clinic/ या संकेतस्थळाला भेट द्या.
About P. D. Hinduja Hospital & Medical Research Centre
Established in 1951, P. D. Hinduja Hospital & Medical Research Centre, part of the Hinduja Group, has grown from a small clinic into one of India’s leading not-for-profit, multi-specialty tertiary care hospitals. With two units in Mahim and Khar, Mumbai, the hospital has 510 beds and offers advanced healthcare services across 43+ specialties. Guided by the vision of Shri Parmanand Deepchand Hinduja that healthcare is a fundamental right, the institution has built a 75-year legacy of compassionate, patient-centric care. Known for clinical excellence and innovation, the hospital has adopted advanced technologies such as the da Vinci Xi Robot, Leksell Gamma Knife Perfexion, TrueBeam Linear Accelerator, and advanced PET-CT and SPECT-CT systems. It is also deeply committed to education and research through DNB programmes, nursing and allied health sciences education, specialised fellowships, and active clinical research initiatives.
Accredited by NABH, CAP and ISO, the hospital has collaborations with leading global institutions including King’s College London and Guy’s and St Thomas’ NHS Foundation Trust. Ranked among India’s leading hospitals, it also extends healthcare access to underserved communities through its “Serve with Passion” rural health programme. In 2026, marking its 75-year milestone, the hospital launched the nationwide humanitarian healthcare mission “Saving Lives. Building a Healthier Bharat”, inaugurated by Droupadi Murmu, reaffirming its commitment to equitable and accessible healthcare.
To know more, visit www.hindujahospital.com



