आ.सचिनभाऊ अहिर वाढदिवस चषक शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धा
आ.सचिनभाऊ अहिर वाढदिवस चषक शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धा

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 13/03/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M) : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या वाढदिवसानिमित विविध जिल्ह्यातील १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा २० मार्च रोजी आरएमएमएस सभागृह, परेल येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेतील खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शन लाभणार असून पहिल्या १६ विजेत्या–उपविजेत्यांना आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.
सबज्युनियर खेळाडूंच्या तंत्रशुध्द खेळाबरोबर सरावात्मक दर्जा वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणारे आमदार सचिनभाऊ अहिर यांचे शालेय क्रीडा चळवळीमधील योगदान उल्लेखनीय असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धेचे सातत्य संयोजकांनी यंदाही कायम राखले आहे. ही स्पर्धा चँम्पियन कॅरम बोर्डावर होणार असून कॅरम स्ट्रायकर सुध्दा मोफत पुरविले जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे १५ मार्चपर्यंत संपर्क साधावा.




