खेलमहाराष्ट्र

वणी प्रीमियम लीग ‘मनसे चषक’चा थरार संपन्न; ४ लाखांच्या बक्षिसासह ‘ZIHU 11’ ठरला महाविजेता

४ लाखांच्या बक्षिसासह 'ZIHU 11' ठरला महाविजेता

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 18/04/2026 📞  8850212023

वणी / NHI24.COM(M) प्रतिनिधी – स्थानिक शासकीय मैदानावर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘वणी प्रीमियम लीग – मनसे चषक २०२६’ या भव्य दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचा समारोप अत्यंत उत्साहात पार पडला. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्या खेळाचा दर्जा उंचावत ‘ZIHU 11’ या संघाने विजेतेपदावर मोहोर उमटवली. प्रथम क्रमांकाचे ४ लाख रुपये आणि मानाचा चषक पटकावून या संघाने वणीच्या क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे, तर यवतमाळच्या ‘नाईट रायडर्स’ संघाला उपविजेतेपदासह २ लाख ५१ हजार रुपयांच्या बक्षिसावर समाधान मानावे लागले.

मनसे नेते राजू उंबरकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ १० एप्रिल रोजी आमदार संजय देरकर आणि राजू उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. १८ एप्रिल रोजी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्याला राजू उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेले ‘विजेत्या संघ मालकाला दुचाकी मोटारसायकल’ हे बक्षीस देताना उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. वणी परिसरातील क्रिकेट प्रेमींनी या रात्रीच्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मैदानावर मोठी गर्दी केली होती.

 या सोहळ्याला वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, उप मुख्याधिकारी जयंत सोनटक्के, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.महेंद्र लोढा, शिवसेनेचे अविनाश भुजबळराव,  मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे,तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, विनोद कुचनकर,तालुका उपाध्यक्ष राकेश शंकावार, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष राकेश वैद्य, सरपंच शुभम भोयर, गोविंदराव थेरे, परशुराम खंडाळकर, दिलीप मस्के, विलन बोदाडकर, संजय गौरकर, जितेंद्र शिरभाते, अविनाश पाटील, लक्की सोमकुवर, मयूर घाटोळे,अमोल मसेवार, अनिल टोंगे सर, प्रवीण कळसकर, आशिष ठावरी आणि  लोकेश लडके, यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीचे शैलेश ढोके, नदीम शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. वणी शहरातील तरुणाईला खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या आयोजनाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.

वैयक्तिक कामगिरीचा गौरव:

या स्पर्धेत खेळाडूंनी अटीतटीची झुंज दिली. यात आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडणारा शोएब खान ‘बेस्ट बॅट्समन’ ठरला, तर अचूक गोलंदाजीच्या जोरावर अथर्व याने ‘बेस्ट बॉलर’चा बहुमान पटकावला. संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रवी राजुरकर याला अत्यंत मानाचा ‘मॅन ऑफ द सिरीज’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!