खेल

काळाचौकीचा गणाधीश चषक शालेय कॅरम स्पर्धेत ४८ खेळाडूंमध्ये आज चुरस

काळाचौकीचा गणाधीश चषक शालेय कॅरम

POSTED BY MRUNALI SAKPAL ON DATED 19/09/2026

MUMBAI(NHI@24)बाल गोपाळ (अभिलाषा) गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शालेय मुलांच्या मोफत एकेरी कॅरम स्पर्धेत काळाचौकीचा गणाधीश चषक जिंकण्यासाठी ४८ शालेय खेळाडूंमध्ये चुरस राहील. मुंबईचे माजी नगरपाल डॉ.जगन्नाथराव हेगडे, मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील शिंगे व सेक्रेटरी शुभ्रतो वरेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेची उद्घाटनीय लढत चिराग शिंदे विरुध्द तनिष मोरे यामध्ये २० सप्टेंबर रोजी सकाळी ९.१५ वा. होईल.

डॉ. जगन्नाथराव हेगडे सहप्रायोजित ही स्पर्धा चँम्पियन कॅरम बोर्डवर काळेवाडी-काळाचौकी येथील बाल गोपाळ गणेशोत्सव मंडपात रंगणार आहे. पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे, कोल्हापूर शाळेचे अतुल पाटील व अथर्व नरुटे, चेंबूरनाका पब्लिक स्कूलचा रुद्र करडक, एसकेकेई स्कूलचा केवल कुळकर्णी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा अनय म्हेत्रे, पार्ले टिळक विध्यालयाचा दुर्वेश चव्हाण, ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूलचा तीर्थ ठाकर, शारदाश्रम विद्यामंदिरचा सोहम जाधव आदी विविध जिल्ह्यातील शालेय खेळाडू विजेतेपदाच्या दावेदारीसाठी दर्जेदार खेळ करणार आहेत. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!