झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस लिमिटेडची गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी खुली होणार आहे.
या ऑफरमध्ये प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी किंमतपट्टा 143 रु. ते प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 151 रु. (“इक्विटी शेअर्स”) निश्चित करण्यात आला आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 12/10/2026 (8850212023) 📞
- झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस लिमिटेड (“कंपनी”) च्या प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी किंमतपट्टा 143 रु. ते प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 151 रु. (“इक्विटी शेअर्स”) निश्चित करण्यात आला आहे.
- प्रमुख गुंतवणूकदारांसाठीच्या बोलीचा दिनांक – बुधवार, 14 ऑक्टोबर 2026.
- बोली/ऑफर सुरू होण्याचा दिनांक – गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 आणि बोली/ऑफर बंद होण्याचा दिनांक – सोमवार, 19 ऑक्टोबर 2026.
- बोली प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 99 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 99 समभागांच्या पटीत लावता येईल.
- रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“आरएचपी”) लिंक:
राष्ट्रीय : (NHI24) : झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस लिमिटेड (“कंपनी”) ने प्रत्येकी
1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोलीचा दिनांक हा बोली/ऑफर सुरू होण्याच्या दिनांकाच्या आधीचा कामकाजाचा दिवस असून, तो बुधवार, 14 ऑक्टोबर 2026 आहे. बोली/ऑफर बंद होण्याचा दिनांक सोमवार, 19 ऑक्टोबर 2026 आहे. बोली प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 99 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 99 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. फ्लोअर प्राईस आणि कॅप प्राईस या अनुक्रमे इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 143 पट आणि 151 पट आहेत.
या विक्रीमध्ये प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे 28,300.00 दशलक्ष रु. (2,830 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि काही विद्यमान भागधारकांकडून प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या 144,525,036 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (“ऑफर फॉर सेल”) यांचा समावेश आहे. फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल हे दोन्ही मिळून “ऑफर” ठरते.
ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार नियम 32(2) च्या नियमनात ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की SEBI ICDR नियमांनुसार देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी राखीव प्रमुख गुंतवणूकदार श्रेणीमध्ये कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये (प्रमुख गुंतवणूकदार हिस्सा वगळून)(“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या Net QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल.
पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा अधिक आणि 1,000,000 रु. पर्यंत पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु. पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, ऑफरच्या 10% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी (“RIBs”) सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार उपलब्ध असेल, त्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.
तसेच, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप प्रमाणानुसार करण्यात येईल, मात्र त्यांच्याकडून इश्यू किंमत किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला (लागू असल्यास कर्मचारी सवलत वजा केल्यानंतर) वैध बोली प्राप्त झालेल्या असणे आवश्यक आहे. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (except Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (“SCSBs”) एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी एनएसई हे निर्देशित स्टॉक एक्स्चेंज असेल.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, अव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि पॅन्टोमॅथ कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूसाठीचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.




