आरोग्य

हिप रिप्लेसमेंटच्या पलीकडे: डायरेक्ट अँटेरिअर अप्रोचमुळे जलद रिकव्हरी आणि हालचालींमध्ये सुधारणा

POSTED BY  :  MRUNALI SAKPAL  DATED ON  : 26/11/2026 (8850212023) 📞 

नवी मुंबई, 26 नोव्हेंबर 2026: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने डायरेक्ट अँटेरिअर अप्रोच (डीएए) या पद्धतीने हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणाऱ्या भारतातील मोजक्या केंद्रांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. आधुनिक आणि स्नायूंना कमीत कमी इजा पोहोचवणाऱ्या अस्थिरोग शस्त्रक्रिया पद्धतींप्रती रुग्णालयाची बांधिलकी या माध्यमातून अधोरेखित झाली आहे.

हिप रिप्लेसमेंट ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्वात यशस्वी शस्त्रक्रियांपैकी एक आहे. दरवर्षी हिप आर्थ्रायटिस (सांध्यांची झीज), हिप फ्रॅक्चर आणि नितंबाशी (हिपशी) संबंधित इतर विकारांनी त्रस्त असलेले हजारो रुग्ण हालचाल करण्याची क्षमता आणि जीवनमान सुधारण्यासाठी ही शस्त्रक्रिया करून घेतात. शस्त्रक्रियेच्या तंत्रात आणि प्रत्यारोपण (इम्प्लांट) तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे ही प्रक्रिया कालांतराने अधिक सुरक्षित झाली आहे. मात्र, आधुनिक अस्थिरोग शस्त्रक्रियेचा दृष्टिकोन आता बदलला आहे. केवळ खराब झालेला सांधा बदलणे एवढेच या शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट राहिलेले नाही. शस्त्रक्रियेदरम्यान शरीराला होणारी इजा कमी करणे, शस्त्रक्रियेनंतरचा त्रास मर्यादित ठेवणे आणि रुग्णांना त्यांची नेहमीची दैनंदिन कामे लवकरात लवकर करता यावे, यावर आता भर दिला जात आहे. डायरेक्ट अँटेरिअर अप्रोच (डीएए) ही पद्धत याच बदललेल्या दृष्टिकोनाला अनुसरून आहे.

भारतासाठी या पद्धतीचा जास्त वापर होणे विशेष महत्त्वाचे आहे. भारतीय रुग्णांना अनेकदा मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे, जमिनीवर बसून वापरल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहांचा वापर करणे आणि योगासने करणे अशा हालचालींची सवय असते. अनेक रुग्ण पैशाच्या अडचणींमुळे किंवा तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचायला उशीर झाल्यामुळे वर्षानुवर्षे त्रास सहन केल्यानंतर उपचारांसाठी येतात. या रुग्णांसाठी शस्त्रक्रियेकडून अपेक्षा फक्त वेदना कमी होण्यापुरती नसते. त्यांच्यासाठी आपली पूर्वीची जीवनशैली पुन्हा जगता यावी आणि दैनंदिन कामे पूर्ववत करता यावीत, हे अधिक महत्त्वाचे असते. डीएए पद्धतीमुळे शस्त्रक्रियेनंतर हालचालींची क्षमता लवकर सुधारण्यास मदत होण्याची शक्यता असल्याने भारताच्या बाबतीत ही पद्धत महत्त्वाची ठरते.

पारंपरिक पद्धतीने हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करताना सांध्यापर्यंत पोहोचण्यासाठी मागील बाजूने किंवा बाजूने मार्ग तयार केला जातो. या प्रक्रियेत अनेकदा स्नायूंचे महत्त्वाचे गट कापावे लागतात. मात्र, डीएए पद्धतीत वेगळा मार्ग वापरला जातो. शल्यचिकित्सक मांडीच्या पुढील बाजूने स्नायूंमधील नैसर्गिक मोकळ्या जागेतून हिप जॉइंटपर्यंत पोहोचतात. त्यामुळे स्नायू न कापता शस्त्रक्रिया करता येते. स्नायूंना इजा न पोहोचवण्याचे हे तत्त्व डीएए पद्धतीबाबत वाढत्या वैद्यकीय स्वारस्यामागील प्रमुख कारण आहे. यामुळेच ही पद्धत पारंपरिक शस्त्रक्रिया पद्धतींपेक्षा वेगळी ठरते.

जागतिक स्तरावरील आकडेवारीतूनही या तंत्रावरील वाढता विश्वास दिसून आला आहे. 2025 मध्ये अमेरिकेतील 53 टक्के शल्यचिकित्सकांनी टोटल हिप आर्थ्रोप्लास्टीसाठी (संपूर्ण हिप रिप्लेसमेंट) डीएए ही सर्वाधिक वापरली जाणारी शस्त्रक्रिया पद्धत असल्याचे सांगितले. नेदरलँड्समध्ये 2007 मध्ये एकूण हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांपैकी केवळ 0.2 टक्के शस्त्रक्रिया डीएए पद्धतीने होत होत्या. 2020 पर्यंत हे प्रमाण वाढून 41 टक्क्यांवर पोहोचले आहे. 2026 मधील एका संभाव्य अभ्यासात 43 टक्के रुग्णांनी डीएए पद्धतीला पसंती दर्शवली आहे.

वृद्ध रुग्णांसाठीही ही शस्त्रक्रिया पद्धत विशेष उपयुक्त ठरू शकते. भारतात हिप रिप्लेसमेंटची गरज असलेल्या ऐंशी आणि नव्वदीच्या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः फेमरच्या नेकला (मांडीच्या हाडाच्या वरच्या टोकाला) फ्रॅक्चर झाल्यानंतर अशा रुग्णांना हिप रिप्लेसमेंटची गरज भासते. या वयोगटातील रुग्णांसाठी शस्त्रक्रियेनंतर लवकर हालचाल सुरू करणे ही वैद्यकीय उपचारांमधील महत्त्वाची बाब असते. रुग्णांना पुन्हा लवकर बरे होता यावे आणि आपल्या कुटुंबीयांसोबत पुन्हा चांगला वेळ घालवता यावा, हेच या उपचारांचे उद्दिष्ट आहे.

या घडामोडीविषयी बोलताना नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील वरिष्ठ अस्थिरोग व सांधे प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. दीपक गौतम म्हणाले, “या शस्त्रक्रियेत कोणताही स्नायू कापला जात नाही. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर होणारा त्रास खूपच कमी असतो, सांधा निखळण्याचा धोका अत्यंत कमी असतो आणि रुग्णाला रुग्णालयात कमी काळ राहावे लागते. तसेच, कामावर लवकर परतण्यासाठीही ही पद्धत फायदेशीर ठरते.”

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण शिंगोटे म्हणाले, “डीएए पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक प्रणाली किंवा विशेष ऑपरेशन थिएटरची आवश्यकता नसते. मात्र, यासाठी शल्यचिकित्सकाकडे विशेष कौशल्य आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. या पद्धतीमध्ये विशिष्ट प्रशिक्षण आणि अनुभवातून साध्य होणारे कौशल्य महत्त्वाचे असते. त्यामुळे शल्यचिकित्सकाने ही शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करण्यापूर्वी मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणे आणि कॅडेव्हरिक वर्कशॉप्समध्ये (मृतदेहावर आधारित शस्त्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा) सहभागी होणे यांसारखे नियोजनबद्ध प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.”

अपोलो हॉस्पिटल्सबद्दल

1983 मध्ये डॉ. प्रताप रेड्डी यांनी चेन्नई येथे पहिले अपोलो हॉस्पिटल सुरू केले आणि अशाप्रकारे अपोलोने आरोग्यसेवेमध्ये क्रांती घडवली. आज अपोलो हे जगातील सर्वात मोठे एकात्मिक आरोग्यसेवा केंद्र आहे, अपोलोकडे 76 रुग्णालयांमध्ये 10,400 पेक्षा जास्त बेड, 7,113 पेक्षा जास्त फार्मसी, 308 क्लिनिक्स, 2,457 निदान केंद्रे, आणि 800 पेक्षा जास्त टेलिमेडिसिन केंद्रे आहेत. हे जगातील अग्रगण्य हृदयरोगाच्या केंद्रांपैकी एक असून अपोलोने 3,00,000 हून अधिक अँजिओप्लास्टी आणि 2,00,000 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. रुग्णांना जगातील सर्वोत्तम उपचार मिळावेत म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि उपचार पद्धतींमध्ये संशोधन करुन आणि नाविन्यता आणून अपोलो सातत्याने गुंतवणूक करत आहे. अपोलो कुटुंबातील 1,20,000 सदस्य अतुलनीय वैद्यकीय सेवा देण्यासाठी आणि जग आणखी सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!