स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) बुधवार, 09 सप्टेंबर 2026 रोजी खुली होणार
कंपनीच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 77 रु. ते 81 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 07/09/2026 (8850212023)
. स्टीमहाऊस इंडिया लिमिटेड (“कंपनी”) च्या 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 77 रु. ते 81 रु. असा किंमतपट्टा निश्चित
. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक – मंगळवार, 08 सप्टेंबर 2026
. बोली/ऑफर बुधवार, 09 सप्टेंबर 2026 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल.
. बोली किमान 185 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 185 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://steamhouse.in/wp-content/uploads/2026/09/Red-Herring-Prospectus.pdf
राष्ट्रीय (NHI24) : स्टीमहाऊस इंडिया लिमिटेड (“कंपनी”) ने बुधवार, 09 सप्टेंबर 2026 पासून प्रत्येकी 2 रु. किंमतीच्या आपल्या इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच मंगळवार, 08 सप्टेंबर 2026 आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल. बोली किमान 185 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 185 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

ऑफरमध्ये 353 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि विक्री समभागधारकाकडून 61 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्रीची ऑफर (“ऑफर फॉर सेल”) यांचा समावेश आहे. फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल यांना एकत्रितपणे “ऑफर” असे संबोधले जाईल. ऑफरचा एकूण आकार 414 कोटी रु. इतका आहे. कंपनीने ऑफरमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील बाबींसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे: (अ) कंपनीने घेतलेल्या काही थकीत कर्जांची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड किंवा मुदतपूर्व परतफेड; (ब) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी. यामध्ये अंकलेश्वर सुविधा केंद्र (फेज 3) आणि पानोली सुविधा केंद्र (फेज 2) यांच्या क्षमतेचा विस्तार समाविष्ट आहे, पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक भांडवली खर्चासाठी निधी उपलब्ध करणे; (क) दहेज GIDC येथे स्टीम निर्मितीसाठी नवीन उत्पादन सुविधा केंद्र उभारण्यासाठी (फेज 2) आवश्यक भांडवली खर्चासाठी निधी उपलब्ध करणे; आणि (ड) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी. स्टीमहाऊस इंडिया लिमिटेड ही भारतीय कंपनी असून ती आपल्या पाइपलाइन नेटवर्कद्वारे स्टीम आणि नायट्रोजनसह औद्योगिक वायूंची निर्मिती आणि केंद्रीकृत वितरण करण्यात विशेष कार्यरत आहे.


कंपनी आणि तिचे प्रवर्तक हे भारतातील कम्युनिटी बॉयलर प्रणालीचे प्रणेते आहेत. ही प्रणाली प्रथम 2014 मध्ये सुरू करण्यात आली. कंपनीची कम्युनिटी औद्योगिक वायू निर्मिती आणि वितरण प्रणाली पाइपलाइन नेटवर्कद्वारे विविध औद्योगिक ग्राहकांना वायूचा पुरवठा करते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला स्वतःची स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एक पर्यायी व्यवस्था उपलब्ध होते. स्टीमहाऊसच्या औद्योगिक वायू व्यवसायामध्ये स्टीम निर्मिती आणि वितरण; स्टीम खरेदी आणि वितरण; तसेच नायट्रोजनचे पृथक्करण, कॉम्प्रेशन आणि वितरण यांचा समावेश आहे.
कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये आपल्या अंकलेश्वर सुविधा केंद्रात वितरित पाइपलाइन नेटवर्कद्वारे नायट्रोजन पुरवठ्यासाठीची पहिली सुविधा सुरू केली.
ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांच्या नियमन 32(1) नुसार, ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की SEBI ICDR नियमांनुसार देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या अँकर गुंतवणूकदार वाटप किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. अँकर गुंतवणूकदार हिस्स्यामध्ये अपुरी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्य असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB हिस्स्यामध्ये जोडले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्य असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल.
पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Portion”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा अधिक आणि 1,000,000 रु. पर्यंत पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब)दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु. पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, ऑफरच्या किमान 35% हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी (“RIBs”) सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार उपलब्ध असेल, त्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
कंपनीचे इक्विटी शेअर्स BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे (BSE आणि NSE यांना एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंजेस” असे संबोधले जाईल). इक्विरस कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) ही ऑफरसाठी एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर (“BRLM”) आहे. येथे परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड संज्ञांचा अर्थ RHP मध्ये त्यांना दिलेल्या अर्थाप्रमाणेच असेल.




