IPO AND MARKET NEWS

अर्डी इंडस्ट्रीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 05 ऑगस्ट 2026 पासून होणार सुरू

अर्डी इंडस्ट्रीज लिमिटेडच IPO बुधवार 05 ऑगस्ट 2026 पासून

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 30/07/2026 📞  8850212023
  • अर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 50 रुपये  ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 53  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
  • प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 04 ऑगस्ट 2026 आहे.
  • बोली/ऑफर बुधवार 05 ऑगस्ट 2026 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 07 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल.
  • बोली प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 281 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 281 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
  • रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक:

MUMBAI : RMI.IN : ने प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) बुधवार 05 ऑगस्ट 2026 पासून प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक कार्यालयीन एक दिवस आधी म्हणजेच मंगळवार, 04 ऑगस्ट 2026  आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 07 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल.

अर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 50 रुपये ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 53 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.  बोली प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 281 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 281 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

या प्रस्तावामध्ये 320 कोटी रु. पर्यंतच्या एकूण मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) तसेच काही प्रवर्तक विक्री भागधारकांकडून 19,975,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्रीसाठी ऑफर (Offer for Sale) समाविष्ट आहे. यामध्ये संदीप अग्रवाल यांच्याकडून प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्य असलेले 9,987,500 पर्यंत इक्विटी शेअर्स आणि निकुंज अग्रवाल यांच्याकडून प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्य असलेले 9,987,500 पर्यंत इक्विटी शेअर्सचा समावेश आहे (एकत्रितपणे “प्रवर्तक विक्री समभागधारक”).

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. (यास “अँकर गुंतवणूकदार वाटप किंमत” असे संबोधले जाईल). अँकर गुंतवणूकदार हिस्स्यामध्ये अपुरी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB हिस्स्यामध्ये जोडले जातील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल.

पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा अधिक आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

तसेच, ऑफरच्या किमान 35% हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार उपलब्ध असेल, त्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अ‍ॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (“SCSBs”) एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

कंपनीचे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील.

बुक रनिंग लीड मॅनेजर: पँटोमॅथ कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स  प्रायव्हेट लिमिटेड

ऑफरचे रजिस्ट्रार: केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!