खेल

बीओबी बुध्दिबळ स्पर्धेत शौर्या, लक्ष, इझेन गटविजेते

बीओबी कप शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 16/08/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM; आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बँक ऑफ बडोदा-बीओबी, मुंबई विभाग सहप्रायोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या बीओबी कप शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेमधील ८ वर्षाखालील गटात शौर्या गौरने, १० वर्षाखालील गटात लक्ष परमारने तर १२ वर्षाखालील गटात इझेन विनीलने विजेतेपद पटकाविले. शौर्या गौरने (५ गुण) व इझेन विनीलने (४.५ गुण) सर्वाधिक गुण नोंदवीत निर्विवाद अजिंक्यपदाला गवसणी घातली. लक्ष परमारला विजेतेपदासाठी निर्णायक पाचव्या साखळी फेरीपर्यंत झुंजावे लागले. लक्षने अखेर निकिता संदीपचे (४.५ गुण) बरोबरीचे आव्हान सरस सरासरीच्या बळावर मागे टाकले. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी व नवनाथ दांडेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने झालेल्या बीओबी शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील ८ वर्षाखालील वयोगटात शौर्या गौरने (५ गुण) प्रथम, ईअन अठीयानने (४ गुण) द्वितीय, स्मित लोकेने (४ गुण) तृतीय, अव्यान उपाध्यायने (३.५ गुण) चतुर्थ, आरोहा चुघने (३.५ गुण) पाचवा; १० वर्षाखालील वयोगटात लक्ष परमारने (४.५ गुण) प्रथम, निकिता संदीपने (४.५ गुण) द्वितीय, ज्ञान शेरेगरने (३,५ गुण) तृतीय, यश चुरीने (३ गुण) चतुर्थ, कृषीव माणेकने (३ गुण) पाचवा तर १२ वर्षाखालील वयोगटात इझेन विनीलने (४.५ गुण) प्रथम, अहान कातरुकाने (४ गुण) द्वितीय, नैतिक पालकरने (३,५ गुण) तृतीय, शिवांश गिरीने (३ गुण) चतुर्थ, आराध्या पुरोने (३ गुण) पाचवा पुरस्कार जिंकला. विविध जिल्ह्यातील फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह झालेल्या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटात पहिल्या १५ विजेत्यांना पुरस्कार देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!