IPO AND MARKET NEWS

शंकेश ज्वेलर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ)  मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 पासून होणार सुरू

शंकेश ज्वेलर्स लिमिटेडच्या प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 88  रुपये  ते 93 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.   

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON: 10/08/2026 (8850212023)

  • प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक सोमवार, 17 ऑगस्ट 2026 आहे. 

  • बोली/ऑफर मंगळवार 18 ऑगस्ट 2026 रोजी खुली होईल आणि गुरूवार, 20 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल. 

  • बोली प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 160 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या 160 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल 

Mumbai (NHI24.COM) : शंकेश ज्वेलर्स लिमिटेडने मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 पासून प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक सोमवार, 17 ऑगस्ट 2026 असून बोली/ ऑफर गुरुवार, 20 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल.   

प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 88  रुपये  ते 93 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 160 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 160 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.  

 

या ऑफरमध्ये 2,742 दशलक्ष रु. पर्यंत रकमेचे 29,482,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू तसेच 930 दशलक्ष रु. पर्यंत रकमेची 10,000,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. विक्री समभागधारकांकडून असलेल्या या ऑफर फॉर सेल मध्ये श्री. कांतिलाल खीमराज जैन यांच्याकडून 48,00,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि श्री. मनोज कांतिलाल जैन यांच्याकडून 52,00,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे (एकत्रितपणे, प्रवर्तक विक्री समभागधारक).

 

शंकेश ज्वेलर्स लिमिटेड ही मुंबईत मुख्यालय असलेली B2B दागिने कंपनी असून, ती संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी हाताने तयार केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या निर्मिती आणि कस्टमायझेशन सेवांच्या व्यवसायात कार्यरत आहे. डिझाइन, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि तयार दागिन्यांचे थेट ग्राहकांपर्यंत वितरण या सर्व बाबींमध्ये कंपनी प्रमुख कंत्राटदार म्हणून काम करते. यामुळे अखंडित आणि उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित होते.

कंपनीला हाताने तयार केलेल्या दागिन्यांच्या क्षेत्रात 3 दशकांहून अधिक काळाची परंपरा लाभली आहे. शंकेश ज्वेलर्सचा संपूर्ण भारतभर विस्तारलेला B2B ग्राहकवर्ग असून, त्यामध्ये प्रस्थापित कॉर्पोरेट आणि बिगर-कॉर्पोरेट दागिने क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये जॉयलुक्कास, पी. एन. गाडगीळ अँड सन्स, कल्याण ज्वेलर्स, पी एन गाडगीळ ज्वेलर्स, मनोज वैभव जेम्स ‘एन’ ज्वेलर्स, नोव्हेल ज्वेल्स (आदित्य बिर्ला ग्रुप), भीमा ज्वेलरी मदुराई, हरि प्रसाद गोपी कृष्ण सराफ प्रा. लि., डी. पी. आभूषण, वैश्यराजू ज्वेलर्स, गजानंदा ज्वेलरी मार्ट, अरुंधती ज्वेलर्स, वर्मा ज्वेलर्स आणि शाम ज्वेलर्स यांच्यासह इतर ग्राहकांचा समावेश आहे.

 

शंकेश ज्वेलर्सने कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात सातत्याने वाढ नोंदवली असून, त्यासोबतच नफ्यातही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2026, 2025 आणि 2024 मध्ये कंपनीने अनुक्रमे 418, 457 आणि 448 ग्राहकांना सेवा दिली. याच कालावधीत कामकाजातून मिळणारा महसूल अनुक्रमे 16,307 रु., 14,038 दशलक्ष रु. आणि 10,617 दशलक्ष रु. इतका होता. आर्थिक वर्ष 2026 मध्ये महसुलात वार्षिक 16.17% आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 32.21% वाढ नोंदवण्यात आली.

ऑफर: ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार नियम 

32(1) च्या नियमनात ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBs आणि तो हिस्सा QIB Portion) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि कंपनी BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (Anchor Investor Portion) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. वरील कलम (ii) मध्ये नमूद केलेल्या राखीव श्रेणीमध्ये कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये (Net QIB Portion) समाविष्ट केले जातील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या Net QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी (अ)एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा अधिक आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, ऑफरच्या किमान 35% हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी  (“RIBs”) सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार (“Retail Portion”) उपलब्ध असेल, त्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (except Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (ASBA) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (“SCSBs”) एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात ASBA प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!