खेल

मोहिते ट्रॉफी शालेय कॅरम स्पर्धेत गौरी, नील, दैविक, आर्यनची विजयी सलामी 

मोहिते ट्रॉफी शालेय कॅरम स्पर्धेत

POSTED BY MRUNALI SAKPAL ON DATED- 01/06/2026(9004379946)

Mumbai (NHI@24)  आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित अमृत महोत्सवी क्रीडापटू गोविंदराव मोहिते ट्रॉफी १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत जे.व्ही. वाच्छा हायस्कूलची गौरी सावंत, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे, शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूलचा दैविक वाघेला, न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पोद्दार हायस्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे यांनी सलामीचे सामने जिंकले. सरळ जाणाऱ्या सोंगट्यांचे सातत्य राखत गौरी सावंतने सुळे गुरुजी सेकंडरी स्कूलच्या ग्रीष्मा धामणकरचा १४-५ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

विविध जिल्ह्यातील ३२ खेळाडूंमध्ये सुरु झालेल्या आरएमएमएस सभागृहामधील स्पर्धेत पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे विरुध्द मायकल हायस्कूल-कुर्ल्याचा निखील भोसले यामधील लढत एकतर्फी झाली. सुरुवातीचे दोन बोर्ड हातचे निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या निखील भोसलेला नील म्हात्रेने १५-४ असे नमविले. अन्य सामन्यात दैविक वाघेलाने दुर्वेश चव्हाणवर २५-० असा, आर्यन राऊतने आरव आंजर्लेकरबर २५-० असा, प्रसन्न गोळेने अनय म्हेत्रेवर २३-२ असा तर तनया दळवीने वेदिका पोमेंडकरवर १२-८ असा विजय मिळविला. क्रीडापटू गोविंदराव मोहिते, माजी नगरसेवक सुनील अहिर, संजय कदम, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!