ओरीयंट केबल्स (इंडिया) लिमिटेडची 5,520.00 दशलक्ष रु. साठीची प्राथमिक समभाग विक्री 25 सप्टेंबर 2026 रोजी खुली होणार आहे.
1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 258 रु. ते 272 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 22/09/2026 (8850212023) 📞
- 1 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 258 रु. ते 272 रु. असा किंमतपट्टा निश्चित
- बोली/ऑफर शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली/ऑफर साठीचा दिनांक गुरूवार, 24 सप्टेंबर 2026 आहे.
- बोली 1 रु. दर्शनी मूल्याच्या किमान 55 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 1 रु. दर्शनी मूल्याच्या 55 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
राष्ट्रीय (NHI24) : ओरीयंट केबल्स (इंडिया) लिमिटेड (“कंपनी”) शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 पासून आपल्या इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली करत आहेत. बोली/ऑफर मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली/ऑफर साठीचा दिनांक गुरूवार, 24 सप्टेंबर 2026 आहे.

या ऑफरमध्ये कंपनीकडून 3,200.00 दशलक्ष रु. किंमती पर्यंत प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”), तसेच काही विद्यमान भागधारकांकडून (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) 2,320.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (“ऑफर केलेले शेअर्स”) समाविष्ट आहेत. ऑफरचा एकूण आकार 5,520.00 दशलक्ष रु. पर्यंत आहे. ऑफर केलेल्या शेअर्समध्ये प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या [●] पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे, ज्यांची एकूण रक्कम 2,320.00 दशलक्ष रु. पर्यंत आहे. यामध्ये विपुल नागपाल यांच्याकडून 672.00 दशलक्ष रु. पर्यंत, गरिमा नागपाल यांच्याकडून 157.00 दशलक्ष रु. पर्यंत, विपुल फॅमिली ट्रस्टकडून 520.00 दशलक्ष रु. पर्यंत आणि गरिमा फॅमिली ट्रस्टकडून 971.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या शेअर्सचा समावेश आहे (“प्रवर्तक विक्री समभागधारक”).

कंपनीने इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या अंदाजे 3,200.00 दशलक्ष रु. निव्वळ उत्पन्नाचा उपयोग (i) कंपनीच्या उत्पादन सुविधा केंद्रांमध्ये यंत्रसामग्री, उपकरणे आणि बांधकामांच्या खरेदीसाठी कंपनीच्या भांडवली खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी; (ii) कंपनीने घेतलेल्या काही थकीत कर्जांची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड किंवा मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी; आणि (iii) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी करण्याचे प्रस्तावित केले आहे (एकत्रितपणे, “ऑफरचे उद्देश”).

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की SEBI ICDR नियमांनुसार देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. (यास “अँकर गुंतवणूकदार वाटप किंमत” असे संबोधले जाईल). अँकर गुंतवणूकदार हिस्स्यामध्ये अपुरी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB हिस्स्यामध्ये (प्रमुख गुंतवणुकदार हिस्सा वगळून) जोडले जातील. (the “Net QIB Portion”).
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या Net QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी (अ) एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा अधिक आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, ऑफरच्या किमान 35% हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी (“RIBs”) सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार (“Retail Portion”) उपलब्ध असेल, त्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (except Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशीलासाठी आरएचपीचे ‘ऑफर प्रोस्युजर’ चे पान 434 पहावे. IIFL कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वी IIFL सिक्युरिटीज लिमिटेड या नावाने ओळखली जाणारी) आणि JM फायनान्शियल लिमिटेड हे ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत (“बुक रनिंग लीड मॅनेजर्स” किंवा “BRLMs”).
इक्विटी शेअर्स कंपनीच्या 21 सप्टेंबर 2026 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे (“RHP”) जारी केले जात आहेत. हा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दक्षिण दिल्ली येथील राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली-I येथील कंपनी निबंधकांकडे (“RoC”) दाखल करण्यात आला आहे. हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंजेस”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.




