Uncategorized

लोकांचा जीव गेला अन् अमित साटम यांना हसू आवरेना, मुंबईतील मॅनहोलच्या घटनेनंतर असंवेदनशीलतेचा कळस!

कुटुंबाने एकमेव कमावता सदस्य गमावला

साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी; कुटुंबाने एकमेव कमावता सदस्य गमावला

असलम शेख नावाची व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याने प्रशासाने कठोर कारवाई केली आहे. साकिनाका भागात ही घटना घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे.

Video : लोकांचा जीव गेला अन् अमित साटम यांना हसू आवरेना, मुंबईतील मॅनहोलच्या घटनेनंतर असंवेदनशीलतेचा कळस!

 मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या असंवदेनशीलतेचे दर्शन समस्त महाराष्ट्राला घडले आहे. दोन दिवसात मुंबईत पावसामुळे दोघांचा बळी गेला. पहिल्या दुर्घटनेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत असलम शेख या व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी अंत झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आमदार तथा मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम चक्क हसताना दिसत आहेत. अमित साटम यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विरोधी बाकावरचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं, असं बोलताना अमित साटम हसत आहेत.

मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!

मुंबईतील साकीनाका परिसरात मुसळधार पावसादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खैरानी रोड परिसरातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव अस्लम इसाक शेख असे असून, सुमारे 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, विरोधकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. पावसाळ्यापूर्वी 31 मेपर्यंत मॅनहोलची झाकणे बसवणे, जाळ्या बदलणे आणि नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण झाली नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचे अर्थसंकल्प असतानाही मुंबईकरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या दुर्घटनेनंतर पावसाळी तयारीच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे.

दोन दिवसात दोन मृत्यूच्या घटना

विधिमंडळ परिसरातील हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. अमित साटम या व्हिडीओत चक्क हसत असताना दिसत आहेत. मुंबईत झालेल्या दोन दुर्घटनांचा उल्लेख करून ते जयंत पाटील यांच्यासोबत बोलताना हासत आहेत. स्कुलबसवर झाड कोसळल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. एका कुटुंबाने चिमुकला गमावला आहे. आज (2 जुलै) एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये मृत्यू झालेला असताना साटम मात्र हसत असल्याने संताप व्यक्त केला जातोय.

मृत्यूच्या घटनेवर बोलताना अमित साटम हसत आहेत

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अमित साटम यांनी मुंबईचा विकास केला जाईल. मुंबईत पाणी तुंबू दिले जाणार नाही, असे अनेक प्रकारचे आश्वासन देत होते. परंतु आता हेच अमित साटम आता मात्र दोन मृत्यूंच्या घटनेवर बोलताना हसताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अमित साटम किती असंवेदनशील आहेत, असे म्हणत नाराजी व्यक्त केली जातेय.

चार अधिकाऱ्यांचे निलंबन

दरम्यान, असलम शेख नावाची व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याने प्रशासाने कठोर कारवाई केली आहे. साकिनाका भागात ही घटना घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असे मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडे तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!