‘द डेमन ऑफ ड्रॉट’ची एंट्री! ‘रणबाली’मधील अर्नोल्ड व्हॉसलू यांचे दमदार पात्र झाले रिव्हील
‘द डेमन ऑफ ड्रॉट’ची एंट्री!

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 19/06/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM
‘रणबाली’च्या निर्मात्यांनी चित्रपटातील हॉलिवूड स्टार अर्नोल्ड व्हॉसलू यांचा कॅरेक्टर पोस्टर रिलीज केला आहे. भारताच्या इतिहासातील काही अनोळखी आणि सत्य घटनांपासून प्रेरित असलल्या या ऐतिहासिक चित्रपटात विजय देवरकोंडा एका निर्भय योद्ध्याच्या भूमिकेत, तर रश्मिका मंदाना ‘जायम्मा’च्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रणबाली’ ११ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
‘रणबाली’ हा यावर्षीचा सर्वाधिक प्रतीक्षित पॅन-इंडिया चित्रपटांपैकी एक आहे. मायथ्री मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भव्य वर्ल्ड-बिल्डिंग, दमदार पात्रांचे रिव्हील आणि उत्कृष्ट संगीत अशा प्रत्येक अपडेटमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हीच उत्सुकता अधिक वाढवत निर्मात्यांनी हॉलिवूड स्टार अर्नोल्ड व्हॉसलू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा एक जबरदस्त कॅरेक्टर पोस्टर रिलीज केला आहे. कल्ट हिट ‘द ममी’ फ्रँचायझीमध्ये ‘इमहोटेप’ ही आयकॉनिक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले व्हॉसलू या चित्रपटाद्वारे भारतीय सिनेमात पदार्पण करत आहेत. निर्मात्यांनी त्यांची ओळख “द डेमन ऑफ ड्रॉट – सर थियोडोर हेक्टर” अशी करून दिली आहे. या इंटेन्स पोस्टरमध्ये ते अत्यंत प्रभावी अवतारात दिसत असून त्यांनी मेटॅलिक केप परिधान केलेली आहे आणि त्यांच्या मागे धुराचे वातावरण दिसत आहे. या पोस्टरवरून चित्रपटात त्यांची अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका असणार असल्याचे स्पष्ट होते. पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
https://www.instagram.com/p/DZpMQeekvdI/?img_index=2&igsh=MThzNzczaTUzaW1qZQ%3D%3D
हा पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, “द डेमन ऑफ ड्रॉट – सर थियोडोर हेक्टर. ‘द ममी’मध्ये ‘इमहोटेप’च्या भूमिकेतून जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अर्नोल्ड व्हॉसलू यांचा आता #Ranabaali मधील निर्दयी ‘सर थियोडोर हेक्टर’ म्हणून नवीन प्रवास सुरू होत आहे. ❤️🔥 वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि भारतीय सिनेमात तुमचे स्वागत. ❤️🔥 – टीम #Ranabaali”
‘रणबाली’ हा औपनिवेशिक काळाच्या पार्श्वभूमीवर आधारित भव्य ऐतिहासिक अॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे. भारताच्या इतिहासातील काही कमी परिचित पण सत्य घटनांपासून प्रेरित असलेल्या या चित्रपटात विजय देवरकोंडा एका निर्भय योद्ध्याच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर रश्मिका मंदाना त्यांच्या पत्नी ‘जायम्मा’ची भूमिका साकारणार आहेत.
चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवत चित्रपटातील रोमँटिक गाणे “ओ मेरे साजन” मोठे हिट ठरले आहे. या गाण्यात चित्रपटाच्या भव्यतेसोबत विजय आणि रश्मिकाची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळते. सोशल मीडियावर या गाण्यावर १ लाखांहून अधिक रील्स तयार झाल्या असून यूट्यूबवर त्याला ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आता अर्नोल्ड व्हॉसलू यांच्या या दमदार कॅरेक्टर पोस्टरच्या रिव्हीलनंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.
राहुल संकृत्यान दिग्दर्शित आणि टी-सीरिजच्या सहकार्याने मायथ्री मूव्ही मेकर्सचे वाय. रविशंकर आणि नवीन यरनेनी निर्मित ‘रणबाली’मध्ये रश्मिका मंदाना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहेत. विजय देवरकोंडासोबतची त्यांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात आंतरराष्ट्रीय अभिनेता अर्नोल्ड व्हॉसलू यांच्यासह अनेक दमदार कलाकारांची फौज आहे, ज्यामुळे हा चित्रपट जागतिक स्तरावर अधिक खास ठरणार आहे. ‘रणबाली’ ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



