तारुण्य, स्टाइल आणि स्व-अभिव्यक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी टीव्हीएसची ‘स्टाईल आयकॉन अवॉर्ड्स 2026’ सोबत भागीदारी
तारुण्य, स्टाइल आणि स्व-अभिव्यक्तीचा उत्सव साजरा

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 19/06/2026 📞 8850212023

मुंबई NHI24.COM : नवीन पिढीतील रायडर्ससाठी भारतातील आधुनिक युगाची मोटरसायकल असलेल्या टीव्हीएस रेडरने ‘स्टाईल आयकॉन अवॉर्ड्स 2026’ सोबत ‘टायटल पार्टनर’ म्हणून भागीदारी केली आहे. भारतातील तरुण आणि स्टाइलबाबत जागरूक ग्राहकांशी ब्रँडचे नाते अधिक दृढ करण्याच्या दिशेने हे एक धोरणात्मक पाऊल आहे. या भागीदारीमुळे मोबिलिटी, फॅशन, मनोरंजन आणि लोकप्रिय संस्कृती एकत्र आले आहेत. तसेच, आजच्या तरुणांच्या आकांक्षा आणि व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत अशी मोटरसायकल म्हणून टीव्हीएस रेडरची ओळख अधिक भक्कम झाली आहे.
आपली वैशिष्ट्यपूर्ण रचना, कामगिरी आणि तरुणांना आकर्षित करणारी शैली यामुळे टीव्हीएस रेडर अशा पिढीशी सातत्याने जोडले गेले आहे, जी व्यक्त होण्याला आणि अस्सलपणाला महत्त्व देते. भारतातील एका आघाडीच्या स्टाईल प्लॅटफॉर्मशी भागीदारी करून, हा ब्रँड अशा ग्राहकांशी आपला संवाद अधिक दृढ करू इच्छितो, ज्यांच्यासाठी स्टाईल म्हणजे केवळ फॅशन नव्हे, तर त्यांची दैनंदिन निवड — ज्यात ते चालवत असलेल्या मोटारसायकलचाही समावेश आहे, — याचा एक भाग आहे.
या भागीदारीचा एक भाग म्हणून, टीव्हीएस रेडरने #RaidTheCarpet ही देशव्यापी स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेमुळे टीव्हीएस रेडरच्या मालकांना त्यांच्या मोटरसायकलसोबतच आपली स्टाइल सादर करण्याची संधी मिळणार आहे. निवडक स्पर्धकांना मुंबईतील ‘स्टाईल आयकॉन अवॉर्ड्स’ला उपस्थित राहण्याची विशेष संधी मिळेल, ज्यामुळे ग्राहकांना या कार्यक्रमातील ग्लॅमर आणि उत्साहाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
अनेक प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून ही भागीदारी प्रत्यक्षात आणली जाईल. यामध्ये टीव्हीएस रेडर रायडर्सद्वारे सेलिब्रिटींना निमंत्रणे पोहोचवणे, कार्यक्रमातील फॅशन शोदरम्यान टीव्हीएस रेडर-प्रेरित विशेष सादरीकरण, टीव्हीएस रेडर एंगेजमेंट झोनद्वारे ब्रँडचा अनोखा अनुभव आणि वैयक्तिक शैली तसेच प्रेक्षकांच्या पसंतीचा गौरव करणारी विशेष टीव्हीएस रेडर अवॉर्ड श्रेणी यांचा समावेश आहे. डिजिटल आणि सोशल माध्यमांवरील कथाकथनाद्वारे (स्टोरीटेलिंग) या क्षणांना अधिक व्यापक प्रसिद्धी दिली जाईल, ज्यामुळे हा अनुभव केवळ रेड कार्पेटपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडे पोहोचेल.
स्टाइल, मनोरंजन आणि ग्राहकांचे अनुभव यांच्यात अर्थपूर्ण सांगड घालत, टीव्हीएस रेडर तरुणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आपले स्थान अधिक दृढ करत आहे. स्टाईल आयकॉन अवॉर्ड्स 2026 सोबतची ही भागीदारी आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि आजच्या पिढीची ओळख असलेल्या ‘स्व-अभिव्यक्ती’च्या भावनेचा गौरव करण्याप्रती असलेल्या ब्रँडच्या कटिबद्धतेचे दर्शन घडवते.



