Business

या लाँचसह, फ्लिपकार्ट ग्रुपमधील या कंपनीने आपल्या सेवांचा विस्तार केला आहे, तसेच आता यात विमान, हॉटेल्स, रेल्वे, बसेस आणि हॉलिडे पॅकेजेसचा समावेश झाला आहे 

क्‍लीअरट्रिपचा आयआरसीटीसीसोबत सहयोगासह रेल्वे बुकिंग 

POSTED BY  : ANAGHA SAKPAL DATED ON 29/04/2026 ( 9004379946 )

राष्ट्रीय, एप्रिल, २०२६ ( RMN.COM ): क्‍लीअरट्रिप या फ्लिपकार्ट ग्रुपमधील कंपनी आणि भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने आज भारतीय रेल्वेची अधिकृत तिकीट संस्था इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) सोबत सहयोगाने रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली.

आयआरसीटीसीच्‍या प्रबळ पायाभूत सुविधांचा लाभ घेत हे एकत्रीकरण मोठ्या प्रमाणावर विश्वासार्हता आणि सुलभ, वापरकर्ता-अनुकूल अनुभव प्रदान करते. क्‍लीअरट्रिप आता वापरकर्त्यांना त्यांच्या रेल्वे प्रवासाचा शोध घेणे, बुकिंग करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे या सर्व गोष्टी अॅपमध्येच सहजपणे करण्याची सुविधा देईल. एकीकृत, मल्टी-मोडल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या लाँचसह, प्रवासी रेल्वे मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जनरल आणि तत्काळ कोट्यासह भारतातील सर्व मार्गांवरील रेल्वे तिकिटे बुक करू शकतील. तसेच रिअल-टाइम सीट उपलब्धता, भाड्याची माहिती, पीएनआर स्टेटस ट्रॅकिंग, बर्थ पसंती आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट यांसारख्या आवश्यक सेवा एकाच सहज सोप्या इंटरफेसमध्ये उपलब्ध होतील.

क्‍लीअरट्रिपच्या चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर मंजरी सिंघाल म्हणाल्या, “रेल्वे प्रवास हा भारताच्या वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे आणि हे लाँच आमच्या एकीकृत, मल्टी-मोडल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म बनण्याच्या दृष्टीकोनाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आयआरसीटीसीसोबत सहयोगाने आम्ही बुकिंगचा अनुभव सोपा करण्यावर आणि लाखो प्रवाशांसाठी अधिक सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”

क्‍लीअरट्रिपच्‍या एअर विभागाचे चीफ बिझनेस ऑफिसर गौरव पटवारी म्हणाले, “दरवर्षी ८० कोटींहून अधिक आरक्षित प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे ही संधी फक्त विकासाबद्दल नाही तर एक वेगळा आणि दर्जेदार अनुभव देण्याबद्दल आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर सुलभ बुकिंग अनुभव, भविष्यातील कल ओळखणारे तंत्रज्ञान आणि वैयक्तिकृत सेवांचा समावेश करून आम्ही खात्री घेत आहोत की, तिकीट शोधण्यापासून ते बुकिंगनंतरच्या पाठिंब्‍यापर्यंत प्रत्येक पायरी जलद, विश्वसनीय आणि तणावमुक्त असेल.”

भारताचे रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात गुंतागुंतीची यंत्रणा आहे, जी दररोज २३ दशलक्ष आणि वर्षाला ७ बिलियन प्रवाशांना सेवा देते, ज्यामुळे हे नेटवर्क जगातील सर्वात मोठ्या परिवहन यंत्रणांपैकी एक बनले आहे. रेल्वे बुकिंगचा आपल्या सेवांमध्ये समावेश करून या व्‍यापक मागणीचा लाभ घेण्याचे क्‍लीअरट्रिपचे उद्दिष्ट आहे. कंपनी लवकर ही सेवा आपल्या वेब प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देणार आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना मोबाईल आणि वेब दोन्हीवर विनासायास अनुभव मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!