इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGRs)च्या माध्यमातून भारतातील सुवर्ण परिसंस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडविण्यासाठी भारतातील पहिल्या क्रमांकाचे एक्स्चेंज आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा गोल्ड प्लॅटफॉर्म एकत्र
इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGRs)च्या माध्यमातून भारतातील सुवर्ण परिसंस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडविण्यासाठी भारतातील पहिल्या क्रमांकाचे एक्स्चेंज आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा गोल्ड प्लॅटफॉर्म एकत्र

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 15/07/2026 📞 8850212023
भारतातील आघाडीच्या एकात्मिक गोल्ड प्लॅटफॉर्मपैकी एक ऑगमाँट एनएसईच्या EGR विभागासाठी तरलता आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार म्हणून कार्य करणार; निर्मिती, रिडेम्प्शन (प्रत्यक्ष स्वरूपात परत मिळवणे), कर्जपुरवठा आणि किंमत निर्धारणाला चालना देणार
मुंबई NHI24.COM : भारतातील आघाडीच्या एकात्मिक गोल्ड प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या ऑगमाँट एंटरप्रायझेस लिमिटेडने आज नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) सोबत ऐतिहासिक धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. ही भागीदारी भारतातील संघटित बुलियन बाजारपेठेच्या बदलातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGRs)चा स्वीकार अधिक वेगाने वाढविणे हा या सहकार्याचा उद्देश आहे. EGR हे प्रत्यक्षातील सोन्याचे रूपांतर गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात धारण करण्यात येणाऱ्या डिमॅट स्वरूपातील सिक्युरिटीत करणारे सेबी-नियंत्रित, एक्स्चेंजवर व्यवहार होणारे साधन आहे.
या धोरणात्मक भागीदारीचा भाग म्हणून, EGR निर्मिती, रिडेम्प्शन, तरलता उपलब्ध करून देणे, वितरण आणि किंमत निर्धारण यासाठी ऑगमाँट आपल्या सर्वसमावेशक परिसंस्थेचा वापर करणार आहे. यामध्ये त्यांचे 4.2 कोटीहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते, SPOT प्लॅटफॉर्मवरील 4,975 पेक्षा अधिक ज्वेलर्सचे नेटवर्क, 4,600 पेक्षा अधिक रिटेल टचपॉइंट्स, 80 पेक्षा अधिक गोल्ड फॉर ऑल स्टोअर्स तसेच आघाडीच्या स्टॉकब्रोकर्स आणि वित्तीय सेवा पुरवठादारांसोबतची API इंटिग्रेशन्स यांचा समावेश आहे. ऑगमाँट हे इंडिया गुड डिलिव्हरी मानांकन प्राप्त रिफायनर असून, एमसीएक्ससह विविध एक्स्चेंजवर सर्व गोल्ड कॉन्ट्रॅक्ट्सच्या फ्युचर्स डिलिव्हरीसाठी पॅनेलवर नोंदणीकृत आहे. तसेच, ते गोल्ड ETF साठी अधिकृत सहभागी (Authorised Participant) असल्याने ETF आणि EGR परिसंस्थांमध्ये नैसर्गिक दुवा निर्माण करते.
सोन्यासाठी भारताचा UPI क्षण
ज्याप्रमाणे यूपीआयने सुरक्षित, आंतर व्यावहारिक आणि नियमनाधीन डिजिटल पायाभूत सुविधा उभारून पेमेंट प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला, त्याचप्रमाणे EGRs मध्येही सोन्याच्या क्षेत्रात तशीच क्रांती घडविण्याची क्षमता आहे. EGRs मुळे भौतिक सोने एकाच एक्स्चेंज-नियंत्रित चौकटीत धारण करता येते, त्याचा व्यापार करता येतो, तारण ठेवता येते आणि कर्जासाठी वापर करता येतो. त्यामुळे भारतातील घरांमध्ये साठवून ठेवलेल्या प्रचंड प्रमाणातील सोन्याचे आर्थिक मूल्य खुले होते आणि ते औपचारिक, अधिकृत वित्तीय व्यवस्थेचा भाग बनते.
भारतामध्ये खासगी मालकीमध्ये अंदाजे 30,000–35,000 टन सोने आहे. मात्र, ही संपत्ती आजपर्यंत आर्थिकदृष्ट्या निष्क्रिय राहिली आहे. प्रत्येक EGR हे एक्स्चेंजने निश्चित केलेल्या किमतीवर आधारित भौतिक सोन्यावरील थेट मालकीचे प्रतिनिधित्व करते. त्याचवेळी, ठेवीदारांना सोन्याच्या किमतीतील वाढीचा किंवा घटीचा पूर्ण लाभ मिळत राहतो आणि ते आपले सोने एनएसईच्या सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (SLB) प्लॅटफॉर्मद्वारे दागिने उत्पादकांना कर्जरूपाने देऊन अतिरिक्त परतावाही मिळवू शकतात.
याचे भारताच्या आयात बिलावरही महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात. आर्थिक वर्ष 26 मध्ये भारताची सोन्याची आयात 71.98 अब्ज अमेरिकन डॉलर या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली असून, ती देशाच्या एकूण वस्तू आयातीच्या जवळपास 9.2% इतकी होती. SLB यंत्रणेद्वारे देशांतर्गत उपलब्ध सोने उत्पादकांपर्यंत पोहोचवल्यास, EGRs मुळे आयातीत बुलियनवरील भारताचे अवलंबित्व कमी होऊ शकते. त्यामुळे सरकारला व्याजाचा भार न उचलता अर्थव्यवस्थेत बहुगुणक परिणाम (साखळी स्वरूपाचा आर्थिक परिणाम) निर्माण करत चालू खात्यातील तुटीवरील दबाव कमी होईल.
अद्वितीय उत्पादन
EGRs हे जगातील पहिल्या एक्स्चेंजवर व्यवहार होणाऱ्या, भौतिक सोन्याद्वारे समर्थित अशा साधनांपैकी एक आहे. ते रिफायनिंग, व्हॉल्टिंग, ट्रेडिंग, कर्जपुरवठा आणि भौतिक रिडेम्प्शन या सर्व प्रक्रिया एका नियमनाधीन चौकटीत एकत्रित करते.
एक्स्चेंजचे नियमन, पारदर्शक किंमत निर्धारण, खात्रीशीर सेटलमेंट आणि एकात्मिक कर्जपुरवठा यंत्रणा यांचा संगम EGRs मध्ये असल्यामुळे भारतासारख्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होते.
एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी (CBDO) श्री. श्रीराम कृष्णन म्हणाले: “भारतामध्ये प्रत्यक्षातील भौतिक सोन्यासाठी पारदर्शक, कार्यक्षम आणि एक्स्चेंज-नियंत्रित बाजारपेठ निर्माण करण्याच्या उद्देशाने एनएसईची EGR चौकट विकसित करण्यात आली आहे. या परिसंस्थेत जसजसे अधिकाधिक सहभागी जोडले जातील, तशी बाजारपेठेला अधिक चांगली तरलता, अधिक प्रमाणबद्धता आणि गुंतवणूकदारांचा व्यापक सहभाग मिळेल. रिफायनर्सची पॅनेलवर नियुक्ती आणि तरलता पुरवठादारांचा सहभाग हे विश्वासार्ह आणि सक्षम, मजबूत बुलियन बाजारपेठेची पायाभूत रचना उभारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.”
ऑगमाँट एंटरप्रायझेस लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक केतन कोठारी म्हणाले: “EGRs मुळे भारतीयांचा भौतिक सोन्याकडे पाहण्याचा आणि व्यवहार करण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. ETF आणि डिजिटल गोल्ड या दोन्हींचे सर्वोत्तम गुण एकत्र आणत, EGRs प्रथमच सोन्याचे कमोडिटी, चलन आणि वित्तीय मालमत्ता हे तीनही पैलू एका साधनामध्ये एकत्र आणतात. त्यामुळे तुम्ही त्याचा शेअर्सप्रमाणे व्यापार करू शकता, आपल्या विश्वासार्ह ज्वेलरकडून नाणे किंवा दागिन्यांच्या स्वरूपात रिडीम करू शकता, परतावा मिळवण्यासाठी ते कर्जाऊ देऊ शकता किंवा त्यावर कर्ज घेऊ शकता — आणि हे सर्व सेबी-नियंत्रित चौकटीत करता येते. जगात अन्य कोणतेही सोने उत्पादन इतकी बहुपयोगिता पुरवित नाही. ऑगमाँटमध्ये आम्ही याच क्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या आहेत आणि प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी सोन्याला खऱ्या अर्थाने उत्पादक मालमत्ता बनविण्यासाठी आमचे ज्वेलर्स नेटवर्क, रिटेल टचपॉइंट्स आणि ब्रोकर इंटिग्रेशन्सची संपूर्ण परिसंस्था कार्यान्वित करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले, “आज टोकनाइज्ड गोल्ड बाजारपेठ ज्या पातळीवर आहे, त्याच्या तुलनेत EGRs चे प्रमाण 100 पट मोठे असेल. कोणतेही ब्लॉकचेन-आधारित गोल्ड उत्पादन देऊ शकत नाही असे एक्स्चेंजवर आधारित किंमत निर्धारण, हमीदार सेटलमेंट, प्रमाणित गुणवत्ता आणि निष्क्रिय पडलेले सोने थेट गरज असलेल्या उत्पादकांपर्यंत पोहोचवणारी कर्जपुरवठा यंत्रणा EGRs पुरविते.
जागतिक स्तरावर लोकांना वाटत होते की ब्लॉकचेन-आधारित चलने पैशांच्या व्यवहारांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवतील. मात्र, त्यापैकी कोणतेही UPI ने साध्य केलेल्या यशाच्या जवळही पोहोचलेले नाही. खाणीतून बाजारपेठेत, ग्राहकापर्यंत आणि पुन्हा परत या संपूर्ण जीवनचक्रात प्रमाणित सोन्याचा व्यवहार कसा केला गेला पाहिजे हे EGRs जगाला दाखवून देतील. भारताने केवळ डिजिटल पेमेंट्सचा स्वीकार केला नाही, तर जागतिक स्तरावर नवा मापदंड निर्माण केला. EGRs च्या माध्यमातून भारत सोन्याच्या क्षेत्रातही हेच करून दाखवेल.”




