बागमने प्राईम ऑफिस आरईआयटीचा ३,४०५ कोटी रूपयांचा ‘आयपीओ’ मंगळवार, ५ मे २०२६ रोजी खुला होणार
प्राइस बँड ९५ रूपये ते १०० रूपये प्रति युनिट निश्चित.
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 30/04/2026 📞 8850212023
- बोली/ऑफर सुरू होण्याची तारीख – मंगळवार, ५ मे २०२६ आणि बंद होण्याची तारीख – गुरुवार, ७ मे २०२६.
- अँकर इन्व्हेस्टर बोली कालावधी – मुख्य ऑफर सुरू होण्यापूर्वीचा एक कामकाजाचा दिवस, म्हणजेच सोमवार, ४ मे २०२६.
- अँकर आणि धोरणात्मक गुंतवणूकदारांव्यतिरिक्त इतर बोलीदारांसाठी किमान १५० युनिट्स आणि त्यानंतर १५० च्या पटीत बोली लावता येईल.
- कंपनीने १०० रूपये प्रति युनिट दराने ८.५ कोटी युनिट्ससाठी ८५० कोटी रूपयांची गुंतवणूक निश्चित केली आहे. यामध्ये यूटीआय म्युच्युअल फंड, निष्ठा झुनझुनवाला डिस्क्रेशनरी ट्रस्ट, आर्यमन झुनझुनवाला डिस्क्रेशनरी ट्रस्ट, आर्यावीर झुनझुनवाला डिस्क्रेशनरी ट्रस्ट, अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड, आयसीआयसीआय पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेड, ३६० वन रिअल असेट्स डेव्हलपमेंट फंड, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि इतर धोरणात्मक गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

मुंबई NHI24.COM(M): बेंगळुरूस्थित व्यावसायिक आरईआयटी आणि ग्रेड ए+ बिझनेस पार्क्सचा समावेश असलेल्या बागमने प्राईम ऑफिस आरईआयटीने (‘आरईआयटी‘) आपल्या सार्वजनिक ऑफरसाठी ९५ रूपये ते १०० रूपये प्रति युनिटचा प्राइस बँड निश्चित केला आहे.
ही बोली/ऑफर मंगळवार, ५ मे २०२६ रोजी खुली होईल आणि गुरुवार, ७ मे २०२६ रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टर्स आणि धोरणात्मक गुंतवणूकदारांव्यतिरिक्त इतर बोलीदार किमान १५० युनिट्ससाठी आणि त्यानंतर १५० च्या पटीत बोली लावू शकतात.
या इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये आरईआयटीद्वारे २,३९० कोटी रूपये पर्यंतच्या नवीन युनिट्सची विक्री (‘फ्रेश इश्यू‘) आणि बीआरईपी एशिया III इंडिया होल्डिंग कं. VIII प्रा. लि. (ब्लॅकस्टोनची संलग्न संस्था) कडून १,०१५ कोटी रूपये पर्यंतच्या युनिट्सच्या विक्रीसाठीची ऑफर (‘ऑफर फॉर सेल‘) यांचा समावेश आहे. या दोन्हीला एकत्रितपणे ‘ऑफर‘ म्हटले जाईल. नवीन इश्यूमधून मिळणारा मुख्य निधी बागमने कॅपिटल टेक पार्कमधील १० लाख चौरस फुटांच्या लक्सर या प्रीमियम मालमत्तेच्या अधिग्रहणासाठी आणि बागमने रिओ बिझनेस पार्कमधील ९३ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी वापरला जाईल. ही १.१ दशलक्ष चौरस फुटांची प्रतिष्ठित इमारत पूर्णपणे एका मोठ्या परदेशी बहुराष्ट्रीय कंपनीला भाड्याने देण्यात आली आहे.
ही ऑफर बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे आणि सेबी (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) रेग्युलेशन, २०१४ (‘आरआयईटी रेग्युलेशन्स‘) तसेच ११ जुलै २०२५ च्या आरईआयटी मास्टर सर्कुलरच्या अनुपालनानुसार केली जात आहे. आरईआयटी नियमांनुसार, या इश्यूमध्ये (धोरणात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा वगळता) ७५ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल, तर २५ टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.
आरईआयटीचे प्रायोजक बागमने रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी (बागमने समूहाची मुख्य संस्था) हे भारतातील आघाडीचे आणि बेंगळुरूचे सर्वात मोठे प्युअर प्ले ग्रेड ए+ ऑफिस मालक आणि विकासक आहेत. अॅक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड हे विश्वस्त आहे, बागमने रिअल्टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर प्रायव्हेट लिमिटेड हे आरईआयटीचे व्यवस्थापक आहेत.
आरईआयटीच्या पोर्टफोलिओमध्ये ६ प्रीमियम ग्रेड ए+ बिझनेस पार्क्सचा समावेश असून त्याचे एकूण क्षेत्रफळ २०.३ दशलक्ष चौरस फूट आहे. हे पार्क्स जगातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मायक्रो-मार्केटमध्ये (२०२१ ते २०२५ या वर्षातील निव्वळ शोषणाच्या आधारे) स्थित आहेत. या पोर्टफोलिओमध्ये १९.६ दशलक्ष चौरस फूट भाड्याने देण्यायोग्य क्षेत्राचा समावेश आहे, ज्यामध्ये १६.६ दशलक्ष चौरस फूट पूर्ण झालेल्या क्षेत्राचा समावेश असून ते साधारण ९९ टक्के व्यापलेले आहे. हे भारतातील आरईआयटींच्या सूचीबद्घतेनंतरचे सर्वाधिक ऑक्युपन्सी प्रमाण आहे.* भाडेकरूंच्या यादीमध्ये साधारण ८९ टक्के ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आणि परदेशात मुख्यालय असलेल्या नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे, ज्या बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहेत. मुख्य ऑफिस मालमत्तेव्यतिरिक्त, पोर्टफोलिओमध्ये एकूण १६४.४ मेगावॅट (डीसी) क्षमतेच्या चार सौर ऊर्जा प्रकल्पांचा (ज्यामध्ये १ निर्माणाधीन आहे) आणि दोन निर्माणाधीन हॉटेल्सचा (६०७ खोल्या) समावेश आहे.* ४७ दशलक्ष चौरस फुटांहून अधिक असलेल्या आपल्या आरओएफओ पाइपलाइनमुळे ही आरईआयटी शाश्वत वाढीसाठी सज्ज आहे. भारतीय ऑफिस आरईआयटींच्या सूचीबद्घतेनंतरची ही सर्वात मोठी पाइपलाइन आहे.*
जेएम फायनान्शिअल लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, ३६० वन वॅम लिमिटेड आणि एचडीएफसी बँक लिमिटेड हे या ऑफरचे लीड मॅनेजर्स आहेत. केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे या ऑफरचे रजिस्ट्रार आहेत. हे युनिट्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
*३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची आकडेवारी



