Business

सॅमसंगचा बीस्‍पोक एआय विंडफ्री एसीद्वारे स्मार्ट कूलिंगचा अनुभव

लाइनअप भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 25/03/2026 ( 8850212023 )

लाइनअप भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २३ मॉडेल्‍स, तसेच ४-स्‍टार व्‍हेरिएण्‍ट्स असलेली नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री श्रेणी सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमतता आणि प्रीमियम डिझाइनवर लक्ष केंद्रित करते.

भारतातील कुटुंबांना वाढत्‍या तापमानाचा आणि सतत बदलत असलेल्‍या हवामान स्थितींचा सामना करावा लागत असताना एअर कंडिशनिंगबाबत अपेक्षा साध्‍या कूलिंगपलीकडे जात आहेत. सॅमसंगची १०० टक्‍के बीस्‍पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर्सची २०२६ लाइनअप या परिवर्तनाचे निराकरण करते, जेथे या लाइनअपमध्‍ये सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रीमियम डिझाइन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. हे एअर कंडिशनर्स रूममधील स्थिती आणि वापरकर्त्‍याच्‍या पसंतीशी सर्वोत्तमपणे जुळून जातात, जेथे योग्‍य कूलिंग व आरामदायीपणा देतात. रूममध्‍ये त्‍वरित कूलिंग निर्माण करायचे असल्‍यास एआय फास्‍ट व विंडफ्री कूलिंग+ वैशिष्‍ट्ये साह्य करतात, तर ड्राय कम्‍फर्ट मोड भारतातील मान्‍सूनच्‍या काळात आर्द्रतेवर देखरेख ठेवते.

ठळक वैशिष्ट्यांमध्ये एआय-संचालित कूलिंगचा समावेश असून, हे तंत्रज्ञान रूममधील स्थिती आणि वापरकर्त्याच्या पसंतीनुसार कूलिंग समायोजित करून वैयक्तिकृत आरामदायी अनुभव देते. विंडफ्री कम्फर्टमुळे अधिक प्रमाणात थंडावा न देता खोलीत सतत आणि संतुलित कूलिंग मिळते. ड्राय कम्फर्ट टेक्नॉलॉजी विशेषतः मान्सूनच्या काळात आर्द्रतेचे प्रभावी व्यवस्थापन करते, ज्यामुळे वातावरण अधिक सुखद राहते. गरज भासल्यास एआय फास्ट आणि विंडफ्री कूलिंग+ फीचर खोलीत झटपट कूलिंग निर्माण करते. स्मार्टथिंग्ज इंटीग्रेशनमुळे स्मार्टफोन किंवा बिक्सबी, अॅलेक्सा आणि गुगल असिस्टंटसारख्या वॉइस असिस्टंटद्वारे एसी सहज नियंत्रित आणि ऑटोमेट करता येतो. याशिवाय, एआय एनर्जी मोड कूलिंग ऑप्टिमाइझ करून सुमारे ३० टक्क्यांपर्यंत वीज बचत करतो. टिकाऊपणाच्या दृष्टीने, या उत्पादनास ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि एआय इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.

 

      

 

 

 

सॅमसंगच्‍या १०० टक्‍के बीस्‍पोक एआय विंडफ्रीच्‍या २०२६ लाइनअपचा स्‍मार्ट, अधिक सर्वोत्तम कूलिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍याचा मनसुबा आहे, जे भारतातील विविध हवामान स्थितींसाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. ३२,४९० रूपयांपासून किंमत सुरू होणारी बीस्‍पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर श्रेणी आघाडीचे रिटेल आऊटलेट्समध्‍ये आणि ऑनवलाइन प्‍लॅटफॉर्म्‍ससह फ्लिपकार्ट, अॅमेझॉन व Samsung.com वर उपलब्‍ध आहे. ज्‍यामुळे स्‍मार्ट, अधिक सर्वोत्तम कूलिंग अधिकाधिक ग्राहकांसाठी सहजसाध्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!