Sports

अरेटो’च्या वतीने ‘यू/एः फ्री द चाइल्ड’ या नव्या ब्रँड कॅम्पेनचे अनावरण; प्रगती, स्वतंत्र व्यक्तित्व आणि उत्सुकता यांचा उत्सव साजरा 

हे कॅम्पेन अरेटोसाठी एक नवीन अध्याय लिहिणार असून, जिज्ञासा, अंतःप्रेरणा त्याचप्रमाणे खेळकरपणा यांच्यात थोडीही कसूर न ठेवता मोठ्या संभाषणाद्वारे 8-13 वयोगटातील बालकांकरिता लीप्स प्रो व्ही आणि लीप्स प्रो सादर करते.

POSTED BY  :  MRUNALI SAKPAL DATED ON  : 19/10/2026 (8850212023) 📞

नवी दिल्ली (NHI24) : प्रत्येकजण चांगल्या डिझाइनसाठी पात्र आहे या विश्वासावर तयार करण्यात आलेल्या डिझाइन-नेतृत्वाखालील बालकांच्या पादत्राणांचा ब्रँड अरेटोने ‘यू/एः फ्री द चाइल्ड’ या नवीन ब्रँड मोहिमेचे अनावरण केले. जी मुलांची जिज्ञासा, व्यक्तिमत्व तसेच शोध घेण्याचे स्वातंत्र्य साजरे करते. ब्रँडसाठी एक नवीन अध्याय चिन्हांकित करीत, कॅम्पेनच्या माध्यमातून लीप्स प्रो व्ही आणि लीप्स प्रो सादर केले. वयवर्षे 8-13 वयोगटातील बालक/चिमुरड्यांसाठी डिझाइन करण्यात आलेली दोन पादत्राण/फूटवेअर श्रेणी, वाढत्या पायांच्या बदलत्या गरजांसह मुक्त खेळकर भावना एकत्र आणतात.

‘फ्री द चाइल्ड’ या कल्पनेला मनोमन आव्हान देते की वयाने मोठे होणे म्हणजे जिज्ञासू वृत्तीला आळा घालणे, फारसे व्यक्त न होणे किंवा सामान्य घटकांवर प्रश्न विचारण्याची तयारी असणे. स्वतंत्रपणे विचार करणारे, त्यांची स्वतःची मते तयार करणारे आणि त्यांच्या अटींनुसार जगाशी संवाद साधणारे जेन अल्फा/ट्वीन्स यांच्या दृष्टिकोनातून, हे कॅम्पेन प्रौढांना शोधण्याची, प्रयोगाची आणि असे का हे विचारण्याची अंतःप्रेरणा धरून ठेवण्यास प्रोत्साहित करते.

कॅम्पेनची यू/ए ओळख खेळकरपणे चित्रपट प्रमाणपत्रातून घेतली जाते. हळूहळू मर्यादित करू शकणाऱ्या नियमांवर आणि अपेक्षांवर पुनर्विचार करण्यासाठी प्रौढांना आमंत्रित करताना ते बालपणीच्या अखंड भावनेचा उत्सव साजरा करते.

 “वाढत्या वयासोबत बालकांचे जग खुले झाले पाहिजे, ते संकुचित नसावे. वय 8 ते 13 वर्षे वयोगटातील लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेत आहेत आणि सामान्य लोकांना प्रश्न विचारायला शिकत आहेत. तसेच प्रौढ लोक त्यांच्या कुतूहलातून बरेच काही शिकू शकतात. ‘फ्री द चाइल्ड’ त्या भावनेचा उत्सव साजरा करते आणि आपल्याला आठवण करून देते की वयाने मोठे होण्याचा अर्थ म्हणजे आपण कोण आहोत त्या भावनेने मोठे होणे नव्हे. हा विश्वास आपण पादत्राणे/ फूटवेअरची रचना कशी करतो याला देखील आकार देतो. जसजशी मुलं मोठी होतात, तसतसे त्यांचे उपक्रम, हालचाली आणि पादत्राणांच्या गरजा विकसित होतात. लीप्स प्रो व्ही आणि लीप्स प्रोसह, आम्ही मोठ्या मुलांना आवश्यक असलेले समर्थन अनुकूल तंत्रज्ञान, श्वासोच्छ्वास आणि लवचिकतेसह एकत्र आणतो जे अरेटोची व्याख्या करतात”, असे अरेटोचे संस्थापक आणि सीईओ सत्यजित मित्तल म्हणाले.

अरेटोसाठी, बालकाला मुक्त करणे म्हणजे मुलांच्या हालचालींना आकार देणाऱ्या दैनंदिन आवश्यक गोष्टींचा पुनर्विचार करणे. जसजशी त्यांची दिनचर्या अधिक मागणीची होत जाते आणि त्यांची हालचाल अधिक गतिमान होत जाते, तसतसे नैसर्गिक हालचालींशी तडजोड न करता पादत्राणे अधिक आधार देण्यासाठी आणि धरून ठेवण्यासाठी विकसित होणे आवश्यक आहे. हा विचार कॅम्पेनच्या तत्वज्ञानाचे रुपांतर रचनेत करतो, संशोधनातून मोठ्या बालकांच्या बदलत्या गरजांची माहिती मिळते. लीप्स प्रो व्ही आणि लीप्स प्रो’च्या माध्यमातून ‘फ्री द चाइल्ड’ ला जिवंत करणे

वर्ग, क्रीडांगणे, खेळ आणि इतर उपक्रमांमध्ये मार्गक्रमण करणाऱ्या बालकांसाठी तयार केलेले, लीप्स प्रो व्ही आणि लीप्स प्रो, अरेटोच्या सिग्नेचर अडॅप्टिव्ह तंत्रज्ञानासह वर्धित समर्थन एकत्र करतात. दोन्ही श्रेणींमध्ये पेटंट केलेले Supergrooves™ तंत्रज्ञान आहे, जे मुलाचा पाय जसजसा वाढतो तसतसे तीन आकारांपर्यंत विस्तारण्यासाठी डिझाइन केलेले आहे. एक इन्फिकनिट स्ट्रेचेबल, श्वास घेण्याजोगा विणलेला वरचा भाग आणि स्क्विशी फोम शॉक-अॅबझॉर्बिंग इनसोल.

एक लवचिक, अनवाणी पायांच्या शैलीतील फूटवेअर सोल नैसर्गिक हालचालींना आधार देते, तर नॉन-मार्किंग आऊटसोल शूजना शाळेच्या कॉरिडॉरसाठी आणि इनडोअर कोर्टसाठी योग्य बनवते. प्रो श्रेणीमध्ये जलद, बहुदिशात्मक हालचालीदरम्यान पाय आणि टाच सुरक्षित ठेवण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले मिडफूट पॅनेल आणि पॅडेड कॉलर देखील आहेत.

लीप्स प्रो व्ही मध्ये वेल्क्रो पट्ट्या आहेत, तर लीप्स प्रोमध्ये लवचिक लेस आहेत ज्या एकदा बांधल्या जाऊ शकतात आणि स्लिप-ऑनसारखे परिधान केल्या जाऊ शकतात. दोन्ही श्रेणी अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत, ज्याची किंमत ₹3,499 रुपयांपासून सुरू होते.

हे कॅम्पेन आणि नवीन श्रेणी एकत्रितपणे, मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाढण्याचे, हालचाल करण्याचे आणि शोधण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे या अरेटोच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.

कॅम्पेन लिंक:

https://www.instagram.com/p/DeZbUOzIKzR/ 

https://www.instagram.com/p/DeeQ6A9omdD/

https://www.instagram.com/p/DeYnC1coTHZ/

https://www.instagram.com/reel/DeV3djBzrBU/

अरेटोबद्दल

अरेटो हा मुलांच्या पादत्राणांचा एक रचना-आधारित ब्रँड असून तो एका साध्या विश्वासावर बांधला गेला आहेः प्रत्येकजण अधिक चांगल्या (फूटवेअर) रचनासाठी पात्र आहे. बालकांच्या पादत्राणांचा पहिल्या तत्त्वांवरून पुनर्विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ‘अरेटो’ ही संस्था विचारशील रचना, पादत्राणे विज्ञान आणि जुळवून घेणारे तंत्रज्ञान एकत्र आणते, जेणेकरून मुले नैसर्गिकरित्या कशी वाढतात, हालचाल करतात आणि त्यांचा शोध कसा घेतात याविषयी उत्पादने तयार करता येतील. त्याचे पेटंट केलेले Supergrooves™ तंत्रज्ञान वाढत्या पायांशी जुळवून घेण्यासाठी तयार केले गेले आहे, तर त्याचा समकालीन दृष्टिकोन कार्य, आराम आणि शैली एकत्र आणतो. आज, अरेटो भारतभरातील 80 हून अधिक किरकोळ दुकाने, अनेक ऑनलाइन बाजारपेठा आणि त्याच्या स्वतःच्या थेट-ते-ग्राहक मंचाद्वारे कुटुंबांपर्यंत पोहोचते. दोन लाखांहून अधिक पालकांचा विश्वास असलेला हा ब्रँड विचारपूर्वक डिझाइन केलेले पादत्राणे तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे जे वाढत्या पायांना आणि बालपणीच्या स्वातंत्र्याला आधार देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!