Uncategorized
Trending

बीओबी बुध्दिबळ स्पर्धेत इझेनला चकवून प्रीजेश विजेता  

बीओबी बुध्दिबळ

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 17/08/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM :    आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बँक ऑफ बडोदा-बीओबी सहप्रायोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या बीओबी कप शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेमधील १४ वर्षाखालील गटात इझेन विनिलला (४.५ गुण) चकवून व्ही. प्रीजेशने (४.५ गुण) उत्तम सरासरीच्या बळावर विजेतेपदावर झेप घेतली. परिणामी १२ वर्षाखालील विजेतेपद पटकाविणाऱ्या इझेन विनीलचे दुहेरी विजेतेपद थोडक्यात हुकले. स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळाडूचा स्व. सुरेश आचरेकर स्मृती चषक पुरस्कार इझेन विनीलला देऊन बुध्दिबळप्रेमी विलास डांगे, दिलीप वरेकर, दत्ता गोळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी गौरविले.

बीओबी शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील १४ वर्षाखालील वयोगटात व्ही. प्रीजेशने  (४.५ गुण) प्रथम, इझेन विनीलने (४.५ गुण) द्वितीय, देवांशी जैनने (३.५ गुण) तृतीय, अरीहा देवरुखकरने (३.५ गुण) चतुर्थ, अर्हन खानने (३.५ गुण) पाचवा; ११ वर्षाखालील वयोगटात ज्ञान शेरेगरने (५ गुण) प्रथम, अहान कातरुकाने (४ गुण) द्वितीय, आराध्या पुरोने (४ गुण) तृतीय, लक्ष परमारने (३.५ गुण) चतुर्थ, शिवांश गिरीने (३.५ गुण) पाचवा तर ९ वर्षाखालील वयोगटात अव्यान उपाध्यायने (४ गुण) प्रथम, स्मित लोकेने (४ गुण) द्वितीय, जीतेज गाडगेने (४ गुण) तृतीय, निर्वाण दर्यानानीने (४ गुण) चतुर्थ, रचित शाहने (३ गुण) पाचवा पुरस्कार जिंकला. विविध जिल्ह्यातील फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह ११२ खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या ६ वयोगटांच्या स्पर्धेमध्ये एकूण ९० विजेत्यांना बीओबी कप पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने स्पर्धा परेल येथे संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!