आयएमटीएमतर्फे पुण्यात ‘पुणे मशिन टूल एक्स्पो (पीएमटीएक्स)’ आणि ‘फॅक्टरी इक्यूपमेंट एक्स्पो (फॅक्टेक) २०२६’ चे आयोजन
भारतीय उत्पादन क्षेत्राकडून जोरदार सहभागाचा अंदाज

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 20/08/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM : इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमटीएमए) च्या वतीने ७ ते १० सप्टेंबर २०२६ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र (पिएसीसी), मोशी, पुणे येथे ‘पुणे मशिन टूल एक्स्पो (पीएमटीएक्स) २०२६’ चे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनासोबतच ‘फॅक्टरी इक्यूपमेंट एक्स्पो (फॅक्टेक) २०२६’ चे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
पीएमटीएक्स हे प्रगत मशिन टूल्स, उत्पादन तंत्रज्ञान, फॅक्टरी ऑटोमेशन आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग सोल्यूशन्सचे प्रदर्शन करणारे एक अग्रगण्य बी२बी प्रदर्शन आहे. तर फॅक्टेक हे फॅक्टरी उपकरणांसंदर्भातील एक विशेष प्रदर्शन असून, नवीन कारखान्यांच्या गरजा आणि अस्तित्वात असलेल्या सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आवश्यक उत्पादने व उपायांवर यात भर दिला जाईल.
या प्रदर्शनात १७५ हून अधिक प्रदर्शक मशिन टूल्स, मेटल कटिंग, मेटल फॉर्मिंग, टूलिंग, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मेट्रोलॉजी आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान सादर करतील. याशिवाय फॅक्टरी उपकरणे, मटेरियल हँडलिंग, औद्योगिक पायाभूत सुविधा, ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली आणि स्मार्ट फॅक्टरी सोल्यूशन्सचे प्रदर्शनही यात पाहायला मिळेल.
ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, जनरल आणि हेवी इंजिनिअरिंग, कॅपिटल गुड्स आणि इतर अनेक क्षेत्रांतील व्यावसायिक व उद्योजक या प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा आहे.
पुणे हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे उत्पादन आणि अभियांत्रिकी केंद्र आहे. मशिन टूल आणि उत्पादन उद्योगाला विविध उपायांचे मूल्यांकन करण्यासाठी, तज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी आणि मशिन व फॅक्टरी सिस्टीम्स प्रत्यक्ष (लाईव्ह) अनुभवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाची रचना करण्यात आली आहे.
नवीन उत्पादन तंत्रज्ञान आणि फॅक्टरी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्सची माहिती करून घेण्यासाठी हे प्रदर्शन अभ्यागतांना उपयुक्त ठरेल.
याविषयी बोलताना आयएमटीएमएचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिबक दासगुप्ता म्हणाले, “आजच्या काळातील उत्पादक केवळ मशिन्स नकोत, तर संपूर्ण सोल्यूशन्स (एंड-टू-एंड सोल्यूशन्स) देणारे तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसे काम करते हे पाहू इच्छितात. मशिन्सचे लाईव्ह प्रात्यक्षिके, सर्व्हिस प्रपोजिशन्स आणि तंत्रज्ञान पुरवठादारांशी थेट संवाद यामुळे जलद आणि अधिक माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेणे शक्य होईल.”
भारताच्या इंजिनिअरिंग उत्पादनात पश्चिम भारताचे योगदान नेहमीच उत्तम राहिले आहे. ऑटोमेशन, गुणवत्तेत सुधारणा आणि कॉस्ट ऑप्टिमायझेशनचा (खर्च नियंत्रण) सक्रियपणे शोध घेणारे ओईएम, घटक उत्पादक (कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स), एमएसएमई आणि फॅक्टरी मॅनेजर्स यांचा या प्रदर्शनात चांगला सहभाग लाभेल, असा विश्वास आयएमटीएमएला वाटतो. याद्वारे बिझनेस नेटवर्किंग, नवीन सप्लायर शोधणे, तंत्रज्ञान भागीदारी आणि औद्योगिक सहकार्याच्या संधी देखील निर्माण होणार आहेत.
व्यावसायिक अभ्यागत (ट्रेड व्हिजिटर्स) ऑनलाईन नोंदणी करू शकतात आणि नोंदणीकृत उद्योग व्यावसायिकांसाठी प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य असेल.
• कार्यक्रमाचे नाव: पुणे मशिन टूल एक्स्पो (पीएमटीएक्स) २०२६
• सोबतचे प्रदर्शन: फॅक्टरी इक्यूपमेंट एक्स्पो (फॅक्टेक) २०२६
• दिनांक: ७ ते १० सप्टेंबर २०२६
• स्थळ: पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र (पीआयसीसी), मोशी, पुणे
• आयोजक: इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमटीएमए)




