
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 13/07/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM: =आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या ६ वयोगटामध्ये बुध्दिबळ स्पर्धा १८ जुलै रोजी आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटात मुलांसाठी १० बक्षिसे व मुलींसाठी ५ बक्षिसे असे एकूण आकर्षक ९० पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक बुध्दिबळ दिनानिमित्त होणाऱ्या स्पर्धेस मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सहकार्य लाभले आहे.
न्यू इंडिया अॅशुरन्स-आयडियल जलद बुध्दिबळ स्पर्धा ८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील सहा गटात स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. दोन गटामध्ये प्रथम पुरस्काराचा धमाका करणाऱ्या विजेत्यास विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुध्दिबळ पट व घड्याळ दिले जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण किंवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉटसअॅपवर १५ जुलैपर्यंत संपर्क साधावा.




