सॉटेफिन भारत लिमिटेडचा आयपीओ १६ जुलैपासून खुला
या आयपीओअंतर्गत ₹10 दर्शनी मूल्याचे 48,00,000 इक्विटी शेअर्स जारी करण्यात येणार असून, प्रति शेअर किंमत पट्टा ₹178 ते ₹187 निश्चित करण्यात आला आहे.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 14/07/2026 (8850212023)
-
एकूण इश्यू आकार – ₹10 दर्शनी मूल्याचे 48,00,000 इक्विटी शेअर्स
-
आयपीओचा आकार – ₹89.76 कोटी (उच्च किंमत पट्टीनुसार)
-
किंमत पट्टा – ₹178 ते ₹187 प्रति शेअर
-
लॉट साइज – 600 इक्विटी शेअर्स (किमान अर्जाचा आकार: 2 लॉट म्हणजे 1,200 इक्विटी शेअर्स)
मुंबई (NHI24.COM) – रोबोटिक आणि ऑटोमेटेड पार्किंग सोल्यूशन्स क्षेत्रातील टर्नकी सेवा पुरवणारी सॉटेफिन भारत लिमिटेड आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी खुला करणार आहे. उच्च किंमत पट्टीनुसार कंपनी या आयपीओद्वारे ₹89.76 कोटी उभारण्याचा मानस असून, कंपनीचे समभाग बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहेत.
समभागांचे वाटप:
-
क्यूआयबी अँकर भाग – 13,68,000 पर्यंत इक्विटी शेअर्स
-
नेट क्यूआईबी पोर्शन – 9,12,000 पर्यंत इक्विटी शेअर्स
-
नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स – किमान 6,84,000 इक्विटी शेअर्स
-
इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स – किमान 15,96,000 इक्विटी शेअर्स
-
मार्केट मेकर – 2,40,000 पर्यंत इक्विटी शेअर्स
आयपीओतून उभारण्यात येणाऱ्या निधीचा वापर पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी भांडवली खर्च, प्रस्तावित नवीन कार्यालयासाठी भांडवली खर्च, कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी करण्यात येणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी होणार असून, आयपीओ १६ जुलै २०२६ रोजी खुला होऊन २० जुलै २०२६ रोजी बंद होईल.
या इश्यूसाठी चॉइस कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर असून, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.

सॉटेफिन भारत लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अरूप चौधरी म्हणाले, “स्थापनेपासूनच सॉटेफिन भारतने अभियांत्रिकीतील उत्कृष्टता आणि तांत्रिक नवोन्मेषाच्या बळावर नाविन्यपूर्ण ऑटोमेटेड पार्किंग सोल्यूशन्स प्रदान करण्यावर सातत्याने भर दिला आहे. आमचा आगामी आयपीओ हा आमच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या माध्यमातून आम्हाला उत्पादन क्षमता वाढविणे, तांत्रिक उपाय अधिक सक्षम करणे आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची क्षमता बळकट करणे शक्य होईल.”
चॉइस कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री. रतीराज तिब्रेवाल म्हणाले, “अभियांत्रिकीतील नवोन्मेष आणि ऑटोमेटेड पार्किंग सोल्यूशन्सवर असलेल्या सॉटेफिनभारतच्या ठाम लक्षामुळे कंपनीने वेगाने वाढणाऱ्या आणि विशेष स्वरूपाच्या या बाजारपेठेत विस्तारक्षम व्यवसाय उभारला आहे. हा आयपीओ कंपनीला उत्पादन क्षमता वाढविण्यास, प्रकल्प अंमलबजावणीची क्षमता अधिक मजबूत करण्यास आणि भारतात स्मार्ट पार्किंग पायाभूत सुविधांच्या वाढत्या मागणीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आर्थिक लवचिकता प्रदान करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
सॉटेफिन भारत लिमिटेडविषयी :
सॉटेफिन भारत लिमिटेडची स्थापना २०१२ मध्ये झाली असून, कंपनी यांत्रिक आणि ऑटोमेटेड पार्किंग सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. कंपनीला स्वित्झर्लंडस्थित प्रवर्तक कंपनी सॉटेफिन एसए यांचे पाठबळ लाभले आहे. १९५६ पासून ऑटोमेटेड पार्किंग सिस्टिम्स क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या सॉटेफिन एसएला सहा दशकांहून अधिक अभियांत्रिकी अनुभव असून, त्याचा लाभ कंपनीच्या भारतातील व्यवसायाला होत आहे.
कंपनी प्रणालीची रचना, उत्पादन, स्थापना तसेच संचालन आणि देखभाल यांसह संपूर्ण एंड-टू-एंड ऑटोमेटेड पार्किंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देते.
कंपनीने आतापर्यंत ५८ हून अधिक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, ३० हून अधिक प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. हे प्रकल्प भारतातील दिल्ली, कोलकाता, मुंबई, पुणे, वाराणसी आणि तिरुवनंतपुरम यांसह अमेरिका आणि दुबई या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही सुरू आहेत.
आर्थिक वर्ष २०२५-२६ (FY26) मध्ये कंपनीने ₹11,674.65 लाखांचे महसूल ,₹2,983.15 लाखांचा EBITDA आणि ₹1,735.56 लाखांचा निव्वळ नफा नोंदविला.
अस्वीकरण :
या दस्तऐवजातील ऐतिहासिक तथ्ये नसलेली काही विधाने ही भविष्यातील अपेक्षा दर्शविणारी आहेत. अशा विधानांवर सरकारी धोरणांतील बदल, स्थानिक, राजकीय किंवा आर्थिक घडामोडी, तांत्रिक जोखीम तसेच इतर विविध अनिश्चित घटकांचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल या विधानांमध्ये व्यक्त केलेल्या अपेक्षांपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळे असू शकतात. या विधानांच्या आधारे कोणतीही कृती केल्यास त्यासाठी कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. तसेच, भविष्यातील घटना किंवा परिस्थितीनुसार या अपेक्षाधारित विधानांमध्ये सार्वजनिकरीत्या कोणताही बदल किंवा अद्ययावत माहिती देण्याचे बंधन कंपनीवर राहणार नाही.




