आपल्या चाहत्या बॉबी देओलला पाहण्यास विरारकरांची गर्दी चाहत्यांचे प्रेम बघून बॉबी भारावून गेला
रमेश कल्याणरामन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,"महाराष्ट्र नेहमीच आमच्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक राहिला आहे.

POSTED BY : ANAGHA SAKPAL DATED ON 14/07/2026 (9004379946)
विरार (NHI24.COM) : कल्याण ज्वेलर्सने, विरारमध्ये आपल्या पहिल्या शोरूमचा भव्य शुभारंभ केला. महाराष्ट्रातील आपल्या रिटेल विस्तारातील एक मोठा टप्पा ब्रँडने गाठला आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सोहळ्यामध्ये श्री बॉबी देओल यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. अनेक मान्यवर पाहुणे आणि स्थानिक ग्राहक यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्या उत्साही चाहत्यांना संबोधित करताना अभिनेता बॉबी देओल म्हणाले,”कल्याण ज्वेलर्सच्या विरारमधील पहिल्या शोरूमच्या उद्घाटनासाठी येथे उपस्थित राहून मला अत्यंत आनंद होत आहे. कल्याण ज्वेलर्सने गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्कृष्ट कारागिरीबद्दलच्या आपल्या अतूट वचनबद्धतेमुळे कोट्यवधी लोकांचा विश्वास जिंकला आहे. या महत्त्वाच्या समारोहामध्ये सहभागी होऊन मला खूप आनंद होत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की विरारमधील ग्राहकांना ब्रँडची उत्कृष्ट कलेक्शन्स व जागतिक दर्जाचा खरेदीचा अनुभव खूप आवडेल.

विरारमध्ये कल्याण ज्वेलर्सचे नवे शोरूम सुरु झाल्यामुळे या भागातील ग्राहकांसाठी एक शानदार, ‘वन-स्टॉप ज्वेलरी डेस्टिनेशन’ (सर्व प्रकारचे दागिने एकाच ठिकाणी मिळण्याचे ठिकाण) उपलब्ध झाले आहे. या हाय-टेक आणि अत्याधुनिक शोरुमचे वातावरण आलिशान आहे. येथील दागिन्यांचे अतुलनीय कलेक्शन प्रत्येक ग्राहकाची आवडनिवड आणि गरज पूर्ण करते. सदाबहार पारंपरिक आणि लग्नाच्या दागिन्यां पासून ते आधुनिक, हलक्या वजनाची डिझाईन्स देखील या ठिकाणी मिळतील.
रमेश कल्याणरामन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,”महाराष्ट्र नेहमीच आमच्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक राहिला आहे. विरारमध्ये आमचे पहिले शोरूम सुरू करून आम्ही आमचे स्थान अधिक मजबूत करत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा विस्तार दर्शवतो की, आम्ही या संपूर्ण परिसरातील ग्राहकांपर्यंत कल्याण ज्वेलर्सचा सर्वोत्तम अनुभव पोहोचवण्यासाठी तत्पर आहोत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, हे नवीन शोरूम आमच्या ग्राहकांना दागिने खरेदीचा एक उत्कृष्ट अनुभव देईल, जिथे त्यांना अप्रतिम कलाकुसर, दागिन्यांचे खूप मोठे कलेक्शन आणि सर्वोत्तम सेवा एकाच छताखाली मिळतील.”




