Business

प्रेस्टिजकडून ट्राय-प्लाय हॅमर्ड कूकवेअर श्रेणी लाँच; दैनंदिन कूकवेअर अनुभव होणार अधिक उत्‍साहवर्धक  

ट्राय-प्लाय हॅमर्ड श्रेणी विविध आकार आणि व्‍हेरिएण्‍ट्समध्ये उपलब्ध आहे

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON 15/05/2026 ( 8850212023 )

राष्ट्रीय  (NHI24.COM ) टीटीके प्रेस्टिज या भारतातील आघाडीच्‍या किचन अप्‍लायन्‍सेस व कूकवेअर ब्रँडने आपल्या ऑल-न्‍यू ट्राय-प्लाय हॅमर्ड कूकवेअर श्रेणीच्या लाँचची घोषणा केली आहे. भारतातील आधुनिक किचन्‍ससाठी उत्कृष्ट कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि समकालीन आकर्षकता यांचे विचारपूर्वक संयोजन करून ही श्रेणी डिझाइन करण्यात आली आहे. कार्यक्षमता आणि शैली या दोन्ही गोष्टींची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन केलेली ही श्रेणी दैनंदिन कूकिंगचा अनुभव अधिक प्रगत आणि कार्यक्षम बनवते.

 

 

या ट्राय-प्लाय हॅमर्ड श्रेणीमध्ये कढई, डीप कढई आणि ग्लास लिड (काचेचे झाकण) असलेले फ्राय पॅन अशा विविध अत्यावश्यक साधनांचा समावेश आहे, जे रोजच्या जेवणापासून ते खास पदार्थांपर्यंतच्या सर्व गरजा पूर्ण करतात. प्रगत ट्राय-प्लाय रचनेमुळे हे कूकवेअर उष्णतेचे समान वितरण सुनिश्चित करतात, ज्यामुळे स्वयंपाक जलद आणि एकसारखा होतो. उच्‍च दर्जाच्या स्टेनलेस स्टील थरांच्या दरम्यान असलेला जाड अॅल्युमिनियमचा गाभा उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतो आणि दीर्घकाळ टिकणारा टिकाऊपणा देतो.

ही ट्राय-प्लाय हॅमर्ड श्रेणी विविध आकार आणि व्‍हेरिएण्‍ट्समध्ये उपलब्ध आहे. कढई २० सेमी आणि २४ सेमी व्‍हेरिएण्‍ट्समध्ये उपलब्ध आहे, ज्‍यांची एमआरपी अनुक्रमे ३,२२५ रूपये आणि ३,७४५ रूपये आहे. फ्राय पॅन २० सेमी, २४ सेमी आणि २६ सेमी आकारात उपलब्ध आहे, ज्‍यांची एमआरपी अनुक्रमे २,७६५ रूपये, ३,३४५ रूपये आणि ३,६३० रूपये आहे. डीप कढई २० सेमी, २४ सेमी आणि २८ सेमी व्‍हेरिएण्‍ट्समध्ये उपलब्ध आहे, ज्‍यांची एमआरपी अनुक्रमे ३,३५५ रूपये, ३,८९५ रूपये आणि ४,५६० रूपये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!