सिम्बायोटेक फार्मालॅब लिमिटेडची 17,570.00 दशलक्ष रु. किंमतीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 24 ऑगस्ट 2026 रोजी खुली होणार
सिम्बायोटेक फार्मालॅब लिमिटेडची 17,570.00 दशलक्ष रु. किंमतीची प्राथमिक समभाग विक्री

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 19/08/2026 📞 8850212023
- 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 938 रु. ते 988 रु. असा किंमतपट्टा निश्चित
- बोली/ऑफर सोमवार, 24 ऑगस्ट 2026 रोजी खुली होईल आणि गुरूवार, 27 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली सुरु आणि बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 आहे.
- बोली किमान 15 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 15 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
- कर्मचारी राखीव भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 90.00 रु. इतकी सूट दिली जाईल
मुंबई NHI24.COM : सिम्बायोटेक फार्मालॅब लिमिटेड (“सिम्बायोटेक फार्मालॅब” किंवा “कंपनी”) सोमवार, 24 ऑगस्ट 2026 पासून इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) च्या अनुषंगाने बोली/ऑफर खुली करणार आहे.
या ऑफरमध्ये 1,500.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या एकूण मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) तसेच काही विद्यमान समभागधारकांकडून (“विक्री समभागधारक”) 16,070.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्रीसाठी ऑफर फॉर सेल (Offer for Sale) समाविष्ट आहे. (एकत्रितपणे “टोटल ऑफर साईज”).
कंपनीने निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/पूर्वपरतफेड करणे आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“Objects of the Offer”) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
या ऑफर फॉर सेल मध्ये सत्वानी होल्डिंग्स एलएलपी (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) यांच्या तर्फे 1,440.00 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स, रोझवूड इन्व्हेस्टमेंट तर्फे 9,880.00 दशलक्ष रु. किंमती पर्यंतचे त्याच प्रमाणातील इक्विटी शेअर्स आणि इंडिया बिझनेस एक्सलन्स फंड- III तर्फे 4,750.00 दशलक्ष रु. किंमती पर्यंतचे त्याच प्रमाणातील इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे. (एकत्रितपणे, “गुंतवणुकदार विक्री समभागधारक”)
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली सुरु आणि बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 आहे. बोली/ऑफर सोमवार, 24 ऑगस्ट 2026 रोजी खुली होईल आणि गुरूवार, 27 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल. ( “Bid/Offer Period”).
ऑफरसाठी 938 रु. ते 988 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 15 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 15 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (the “Bid Lot”). कर्मचारी राखीव भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 90.00 रु. इतकी सूट दिली जाईल.
या इक्विटी शेअर्सची ऑफर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील कंपनी रजिस्ट्रार (Registrar of Companies) यांच्याकडे दाखल करण्यात (“RoC”) आलेल्या कंपनीच्या 18 ऑगस्ट 2026 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार करण्यात येत आहे.
आरएचपी द्वारे सादर करण्यात येत असलेले कंपनीचे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE एकत्रितपणे BSE सोबत “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी BSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील. (The “Listing Details”)
जेएम फायनान्शियल लिमिटेड, अव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बुक रनिंग लीड मॅनेजर्स” किंवा “बीआरएलएम”) आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.
ही ऑफर 1957 SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की SEBI ICDR नियमांनुसार देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. (यास “अँकर गुंतवणूकदार वाटप किंमत” असे संबोधले जाईल). वरील कलम (ii) मध्ये नमूद केलेल्या राखीव श्रेणीमध्ये कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. अँकर गुंतवणूकदार हिस्स्यामध्ये अपुरी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB हिस्स्यामध्ये (प्रमुख गुंतवणुकदार हिस्सा वगळून) जोडले जातील. (the “Net QIB Portion”).
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या Net QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल.
पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा अधिक आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, ऑफरच्या किमान 35% हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी (“RIBs”) सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार (“Retail Portion”) उपलब्ध असेल, त्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.
तसेच, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप प्रमाणानुसार करण्यात येईल, मात्र त्यांच्याकडून इश्यू किंमत किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला (लागू असल्यास कर्मचारी सवलत वजा केल्यानंतर) वैध बोली प्राप्त झालेल्या असणे आवश्यक आहे. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशीलासाठी आरएचपी च्या 451 पानावरील “ऑफर प्रोस्युजर” पहावी.
Disclaimer:
Symbiotec Pharmalab Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the Red Herring Prospectus with the Registrar of Companies, Madhya Pradesh at Gwalior, SEBI and the Stock Exchanges on August 18, 2026. The Red Herring Prospectus shall be available on the websites of the Company i.e. www.symbiotec.com and SEBI, BSE and NSE at www.sebi.gov.in, www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of the Book Running Lead Managers i.e. JM Financial Limited at www.jmfl.com, Avendus Capital Private Limited at www.avendus.com, Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswal.com and Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited at www.nomuraholdings.com/company/group/asia/india/index.html. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled “Risk Factors” on page 28 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision but should only rely on the information included in RHP filed by the Company with the RoC for making investment decisions.




