खेल

बीओबी बॅडमिंटन स्पर्धेत हनुमंत सुद्रिक, लोचना जाम्बुलकर विजेते

हनुमंत सुद्रिकने पुरुष गटाचे तर लोचना जाम्बुलकरने महिला गटाचे विजेतेपद पटकाविले

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 14/08/2026 📞  9004379946

मुंबई NHI.COM ;    बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिंटन संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये हनुमंत सुद्रिकने पुरुष गटाचे तर लोचना जाम्बुलकरने महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात साहिल पराठेने डावाच्या मध्याला ११-१० अशी आघाडी घेतली होती. परंतु गतविजेत्या हनुमंत सुद्रिकने निर्णायक क्षणी सर्वांगसुंदर खेळ करीत विजेतेपदावर २१-१८ असा शिक्कामोर्तब केला. महिलांच्या  अंतिम सामन्यात लोचना जाम्बुलकरने प्रारंभापासून आघाडी घेत पूजा मोरेचे आव्हान ११-३ असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली.

दादर येथील बॅडमिंटन कोर्टवर तत्पूर्वी झालेल्या पुरुष उपांत्य सामन्यात हनुमंत सुद्रिकने हितेश ह्यांकीला २१-१३ असे तर साहिल पराठेने एम.एस. गौतमला २१-६ असे पराभूत केले. महिला उपांत्य सामन्यात लोचना जाम्बुलकरने कृतिका अगरवालवर ११-६ असा तर पूजा मोरेने गरिमा श्रीवास्तववर ११-९ असा विजय संपादन केला. दोन्ही गटामधील पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्यांनी बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिंटन पुरुष व महिला संघात स्थान पटकाविले आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या स्पर्धेमध्ये एकूण ४३ स्पर्धक सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!