‘गजा अल्टरनेटिव्ह अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड’चा आयपीओ बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार खुला
प्रति शेअर (समभाग) १५२ रुपये ते १६० रुपये असा किंमतपट्टा निश्चित.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED ON : 13/08/2026 (8850212023)
-
प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्ससाठी किमान किंमत (फ्लोअर प्राईज) दर्शनी मूल्याच्या ३०.४० पट, तर कमाल किंमत (कॅप प्राइज) ३२.०० पट.
-
‘आयपीओ’ची बोली (ऑफर) बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी खुली होऊन शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी होणार बंद.
-
अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची प्रक्रिया मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी.
-
प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या किमान ९३ समभागांसाठी बोली लावता येईल. त्यानंतर ९३ समभागांच्या पटीत बोली लावता येणार आहे.
-
‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ची (आरएचपी) लिंक : https://live.jmfl.com/od/UploadedFiles/16BC4ED1-5363-4ADF-8CA2-0EDA83C83E1F.pdf
भारत (NHI24.COM) : गजा अल्टरनेटिव्ह अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचा प्राथमिक समभाग विक्रीचा प्रस्ताव (आयपीओ) बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार आहे.
या ‘आयपीओ’साठी प्रति समभाग १५२ रुपये ते १६० रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या किमान ९३ समभागांसाठी बोली लावता येईल. त्यानंतर ९३ समभागांच्या पटीत बोली लावता येणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची प्रक्रिया मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी होईल. बोली (ऑफर) बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी खुली होईल आणि शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी बंद होईल.
या ऑफरचा एकूण आकार ५५० कोटी रुपये इतका आहे. यामध्ये ४५० कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी करण्यात येणार आहेत, तर १०० कोटी रुपयांच्या समभागांचा विक्री प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) समाविष्ट आहे.
नवीन समभागांच्या विक्रीतून मिळणारा निव्वळ निधी काही विशिष्ट उद्देशांसाठी कंपनी वापरणार आहे. ‘फंड-४’अंतर्गत असलेल्या पुढील निधींमध्ये प्रायोजक म्हणून असलेली उर्वरित आर्थिक बांधिलकी पूर्ण करण्यासाठी तसेच ‘ब्रिज लोन’ची परतफेड करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. यामध्ये ‘गजा कॅपिटल इंडिया फंड २०२० एलएलपी’, ‘गजा कॅपिटल इंडिया फंड २०२१’ (पूर्वीचे नाव गजा कॅपिटल इंडिया फंड २०२०) तसेच ब्रिज लोन रक्कम यांचा समावेश आहे. तसेच, प्रस्तावित ‘फंड-५’मधील प्रायोजक म्हणून असलेली बांधिलकी पूर्ण करण्यासाठी आणि ‘सेकंडरीज फंड’मधील प्रायोजक बांधिलकीसाठीही हा निधी वापरण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल.
दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’अंतर्गत ऑफर करण्यात येणारे हे समभाग बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी एनएसई हा नामनिर्देशित शेअर बाजार असेल.
जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे नाव आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड) हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
ही ऑफर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स, १९५७ मधील नियम १९(२)(ब), तसेच सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ३१ आणि नियम ६(१) यानुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे आणली जात आहे. या ऑफरपैकी कमाल ५० टक्के इतकाच हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयबी) राखीव ठेवला जाईल, त्यापेक्षा अधिक नाही. या भागाला ‘क्यूआयबी हिस्सा’ असे म्हटले जाते. कंपनीला बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) यांच्याशी सल्लामसलत करून क्यूआयबी हिश्शापैकी ६० टक्क्यांपर्यंत हिस्सा अँकर गुंतवणूकदारांना वाटप करण्याचा अधिकार असेल. या भागाला ‘अँकर गुंतवणूकदार हिस्सा’ म्हटले जाते. या अँकर गुंतवणूकदार हिश्शापैकी ३३.३३ टक्के हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी आणि ६.६७ टक्के हिस्सा आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असेल. मात्र, यासाठी संबंधित गुंतवणूकदारांकडून अँकर वाटप किमतीइतकी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असलेल्या भागाला संपूर्ण प्रतिसाद न मिळाल्यास, उर्वरित हिस्सा ‘सेबी’च्या नियमांनुसार देशांतर्गत म्युच्युअल फंडांना वाटप केला जाऊ शकतो. अँकर गुंतवणूकदारांच्या भागाला संपूर्ण प्रतिसाद न मिळाल्यास किंवा समभागांचे वाटप न झाल्यास, उर्वरित समभाग उर्वरित क्यूआयबी हिश्शात समाविष्ट केले जातील. या भागाला ‘निव्वळ क्यूआयबी हिस्सा’ (नेट क्यूआयबी पोर्शन) असे म्हटले जाते.
याशिवाय, ‘निव्वळ क्यूआयबी’ हिश्शापैकी ५ टक्के हिस्सा हा केवळ म्युच्युअल फंडांसाठी त्यांच्या प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. उर्वरित ‘निव्वळ क्यूआयबी’ हिस्सा म्युच्युअल फंडांसह सर्व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (क्यूआयबी) त्या त्या प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. मात्र, यासाठी ऑफर किमतीइतकी किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी निव्वळ क्यूआयबी हिश्शाच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, उर्वरित समभाग परत क्यूआयबी हिश्शात जोडले जातील आणि त्यांचे वाटप सर्व क्यूआयबी गुंतवणूकदारांना प्रमाणानुसार केले जाईल. तसेच, सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार ऑफरपैकी किमान १५ टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. यासाठीही ऑफर किमतीइतकी किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. या हिश्शापैकी एक-तृतीयांश हिस्सा २ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतच्या बोलींच्या अर्जांसाठी राखीव असेल, तर दोन-तृतीयांश हिस्सा १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अर्जांसाठी राखीव असेल. या दोन गटांपैकी कोणत्याही गटात पूर्ण प्रतिसाद न मिळाल्यास, उर्वरित हिस्सा दुसऱ्या गटातील पात्र बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप केला जाऊ शकतो. याशिवाय, ऑफरपैकी किमान ३५ टक्के हिस्सा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. मात्र, त्यासाठीही ऑफर किमतीइतकी किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.
अँकर गुंतवणूकदार वगळता सर्व संभाव्य गुंतवणूकदारांसाठी एएसबीए प्रक्रियेचा वापर करणे बंधनकारक आहे. यासाठी त्यांना त्यांच्या एएसबीए खात्याचा तपशील द्यावा लागेल. ‘यूपीआय’द्वारे अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांचा ‘यूपीआय आयडी’देखील द्यावा लागेल. त्यानुसार, संबंधित गुंतवणूकदारांच्या बोली रकमेइतकी रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँका (एससीएसबीज) किंवा यूपीआय प्रणालीअंतर्गत स्पॉन्सर बँका त्यांच्या खात्यात तात्पुरती रोखून ठेवतील. अँकर गुंतवणूकदारांना एएसबीए प्रक्रियेद्वारे या ऑफरमध्ये सहभागी होता येणार नाही.




