
POSTED BY MRUNALI SAKPAL ON DATED 03/06/2026(9004379946)
Mumbai (NHI@24.COM)आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे माजी कॅरम संघटनेचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा यंदाही ७ जून रोजी होणार आहे. परेल येथील आरएमएमएस सभागृहात होणाऱ्या स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. शालेय नवोदित खेळाडूंना डीएसओ कॅरम स्पर्धेच्या तयारीसाठी यंदाही मोफत उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सल्लागार व माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होणाऱ्या शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शन देखील लाभणार आहे. चँम्पियन बोर्डावर रंगणाऱ्या स्पर्धेमधील सामन्यात ‘ब्रेक टू फिनिश’ करणाऱ्या शालेय खेळाडूस विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी मोफत प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे ५ जूनपर्यंत संपर्क साधावा.




