खेल

अमृत महोत्सवी मोहिते ट्रॉफी शालेय कॅरम स्पर्धेत प्रसाद माने विजेता

अमृत महोत्सवी मोहिते ट्रॉफी

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 03/06/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित अमृत महोत्सवी क्रीडापटू गोविंदराव मोहिते ट्रॉफी १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या राज्यस्तरीय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा प्रसाद माने विजेता ठरला. राष्ट्रीय ख्यातीचे सबज्युनियर कॅरमपटू न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत व महात्मा गांधी विद्या मंदिरची तनया दळवी यांना चकवून अंतिम फेरीत धडक देणाऱ्या जे.बी.वाच्छा हायस्कूलच्या गौरी सावंतचे आव्हान अखेर प्रसाद मानेने १७-२ असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. परिणामी गौरी सावंतला स्ट्रायकर व भेटवस्तूसह उपविजेतेपदाच्या चषकावर समाधान मानावे लागले.

तृतीय क्रमांकावर शिक्कामोर्तब करतांना अचूक फटक्यांची आतषबाजी करीत जैतापूरच्या आर्यन राऊतने शारदाश्रम विद्या मंदिरच्या सोहम जाधववर १५-४ असा विजय मिळविला. आरएमएमएस सभागृहात विविध जिल्ह्यातील ३२ खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या स्पर्धेमध्ये पाटकर विद्यालयाचा नील म्हात्रे, पोद्दार अकादमीचा पुष्कर गोळे, शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूलचा दैविक वाघेला, महात्मा गांधी विद्या मंदिरची तनया दळवी यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळविले. सहभागी शालेय खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शन देखील लाभले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, शिवाजी काळे, सुनील नागवेकर, साई निकम, सुहास जोशी, संयोजक लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!