बँक ऑफ इंडियाचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२६ मध्ये
वार्षिक १४.१९ टक्क्यांनी वाढून झेपावला १०,५२७ कोटी रुपयांवर

POSTED BY : ANAGHA DT. 09/05/2026 📞 9004379946
मुंबई NHI24.COM(M): बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मधील आपल्या आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये निव्वळ नफा वार्षिक १४.१९ टक्के वाढून १०,५२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२६ तील चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक १४.८५ टक्के वाढून ३,०१६ कोटी रुपयांवर झेपावला आहे. बँकेचा आरओए (ROA) आणि आरओई (ROE) आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीसाठी अनुक्रमे १.०१ टक्के आणि १६.३६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
बँकेचा आर्थिक वर्ष २०२६ साठीचा कार्यात्मक नफा वाढून १७,०४९ कोटी रुपये झाला, तर आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीसाठीतील कार्यात्मक नफ्यातही वाढ होऊन तो ५,०२६ कोटी रपयांवर झेपावला आहे.
बँकेच्या जागतिक पातळीवरील व्यवसायात वार्षिक १४.५७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे आणि तो १६.९८ लाख कोटी रुपयचांवर पोहचला आहे. जागतिक ठेवी वार्षिक १३.५६ टक्क्यांनी वाढून ९.२७ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. जागतिक कर्जवाटप वार्षिक १५.८२ टक्क्याने वाढून ७.७१ लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. विदेशातील कर्जवाटपाने वार्षिक १४.२५ टक्के वाढ नोंदवली आणि ते १.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. किरकोळ (रिटेल) कर्जवाटप वार्षिक २१.१९ टक्क्याने वाढले आहे, तर एमएसएमई क्षेत्रासाठीचे कर्जवाटप वार्षिक १७.६८ टक्क्यांनी वाढले आहे. कृषी कर्जवाटप वार्षिक १७.६० टक्क्याने आणि कॉर्पोरेट कर्जवाटप वार्षिक १२.०८ टक्क्याने वाढले. रॅम ॲडव्हान्सेसचा (RAM Advances) वाटा ५८.७४ टक्क्यांपर्यंत वाढला. ३१ मार्च २०२६ रोजी बँकेच्या कासा ठेवींमध्ये वार्षिक ७.३० टक्क्यांनी वाढ झाली तर कासा गुणोत्तर ३७.६४ टक्के होते.
एकूण एनपीए गुणोत्तर वार्षिक १.२९ टक्क्यांनी (१२९ बेसिस पॉइंट्सने) वाढून १.९८ टक्क्यांवर पोहचले आहे. निव्वळ एनपीए गुणोत्तर ०.५६ टक्क्यांवर पोहचले असून ते वार्षिक ०.२६ टक्क्यांनी (२६ बेसिस पॉइंट्सने) वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी संभाव्य बुडीत कर्जासाठीच्या तरतूदीत (क्रेडीट कॉस्ट) वार्षिक ०.२८ टक्क्यांनी (२८ बेसिस पॉइंट्सने) वाढ झाली असून ती ०.४८ टक्के झाली आहे.
३१ मार्च २०२६ अखेर भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (CRAR) १८.०१ टक्के इतके राहिले आहे.
डिजिटल आणि पर्यायी माध्यमांच्या पातळीवर, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ५१ लाखांहून अधिक ग्राहक बँकेशी जोडले गेले आणि त्यामुळे एकूण युपीआय ग्राहकांची संख्या २७१ लाखांहून अधिक झाली आहे. पर्यायी वितरण माध्यमांद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या ७.६ अब्ज झाली असून त्यात वार्षिक २२ टक्के वाढ दिसून आली आहे.



