आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड आणि तरुण तहलियानी यांच्या तस्व ब्रँडचा मुंबईतील जुहू स्टोअरसह विस्तार
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड आणि तरुण तहलियानी यांच्या तस्व ब्रँडचा मुंबईतील जुहू स्टोअरसह विस्तार
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 20/05/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM(M): आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (एबीएफआरएल) आणि ख्यातनाम डिझायनर तरुण तहलियानी यांच्या तस्व या भारतातील प्रीमियम मेन्सवेअर ब्रँडने मुंबईतील प्रसिद्ध जुहू तारा रोडवर आपले नवीन स्टोअर सुरू केले आहे. ब्रँडच्या रिटेल विस्ताराच्या प्रवासातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
मुंबईच्या प्रीमियम कोस्टल फॅशन कॉरिडॉरमध्ये धोरणात्मकरित्या स्थित असलेले हे प्रशस्त स्टोअर देशातील एका प्रमुख लक्झरी बाजारपेठेत तस्वचे स्थान अधिक दृढ करते. या नवीन स्टोअरच्या उद्घाटनासह हा ब्रँड आता मुंबईत एकूण ७ स्टोअर्स चालवत आहे, ज्यासह शहरातील आपला विस्तार अधिक वाढवत आहे.
नवीन तस्व स्टोअर ग्राहकांना खरेदीचा एक आगळावेगळा आणि उच्च दर्जाचा अनुभव देणारे ठिकाण म्हणून विकसित केले गेले आहे. या स्टोअरमध्ये कुर्ता, शेरवानी, बंधगळा, अचकन, बुंदी, चुरीदार आणि अलिगढी या कपड्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. यासोबत सफा, ब्रोच, पॉकेट स्क्वेअर, शाल आणि मोजरी यांसारख्या विविध सणांनुसार आणि समारंभांनुसार लागणाऱ्या अॅक्सेसरीज देखील येथे मिळतील. अत्यंत सुबक आणि आधुनिक डिझाइनसह तयार केलेल्या या स्टोअरच्या अंतर्गत भागात न्यूट्रल रंगसंगती, सुबक आर्किटेक्चरल लाईन्स आणि मोकळी जागा ठेवली आहे, जी कपड्यांची कारागिरी निदर्शनास आणते आणि ग्राहकांना खरेदीचा एक उत्कृष्ट व सहज सोपा अनुभव देते.
या विस्ताराबाबत मत व्यक्त करत तस्वचे चीफ डिझाईन ऑफिसर तरुण तहलियानी म्हणाले, “मुंबई हे नेहमी परंपरेशी जोडलेले राहूनही वैयक्तिक शैलीचा आदर करणारे शहर राहिले आहे. शहरातील सुजाण आणि अभ्यासू ग्राहक अशा वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात, जे लक्झरी कपड्यांना महत्त्व देतात आणि त्याच वेळी त्यात सहजता व आधुनिकतेचा शोध घेतात. तस्वमध्ये आमचा भर पुरूषांसाठी समकालीन भारतीय कपडे तयार करण्यावर आहे, जे आजच्या काळाशी सुसंगत, सुबक आणि परिधान करण्यास अगदी सोपे वाटतील. आम्ही मुंबईत आमचा विस्तार करत असताना पुरुषांना त्यांच्या बदलत्या जीवनशैलीला आणि उत्सवाच्या क्षणांना शोभतील असे विचारपूर्वक डिझाइन केलेले कपडे देणे, हाच आमचा उद्देश आहे.”
आपले मत व्यक्त कतर तस्वचे ब्रँड हेड आशिष मुकुल म्हणाले, “तस्वचे प्रत्येक स्टोअर ग्राहकांना उच्च दर्जाचा आणि सातत्यपूर्ण रिटेल अनुभव देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला सादर करते. मुंबईत प्रीमियम भारतीय सण-समारंभांच्या कपड्यांसाठी सातत्याने मोठी मागणी दिसून येत आहे, आणि आमचे नवीन स्टोअर आम्हाला शहराच्या सर्वात प्रभावशाली लक्झरी फॅशन कॉरिडॉरच्या केंद्रस्थानी आणते. ग्राहकांसाठी सुलभता, उत्कृष्ट डिझाइन आणि उत्पादनाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करणे यांवर आमचे पूर्ण लक्ष केंद्रित आहे.”
या कलेक्शनमध्ये सिल्क, बनारसी ब्रोकेड आणि मखमली (व्हॅल्व्हेट) सारख्या पारंपारिक कापडांचा वापर करून लग्न आणि सणांच्या प्रसंगांसाठी खास डिझाइन केलेले सुबक कपडे तयार करण्यात आले आहेत. जरदोजी, आरी आणि चिकनकारी यांसारख्या क्लिष्ट नक्षीकामाचा अतिशय अचूक व मर्यादित वापर केला गेला आहे, ज्यामुळे या कपड्यांना आधुनिक आणि सुबक लूक मिळतो.
मुंबईतील जुहू तारा रोडवरील आपल्या या नवीन स्टोअरच्या उद्घाटनासह, तस्व आजच्या आधुनिक पुरुषाला जीवनातील खास क्षण स्टाइलमध्ये साजरे करण्यासाठी आमंत्रित करत आहे. चिरंतन कारागिरी आणि समकालीन डिझाइनचे संयोजन करत हे नवीन रिटेल ठिकाण मुंबईच्या सुजाण नवरदेवांच्या वैयक्तिक शैली आणि बदलत्या गरजांनुसार स्वागतार्ह आणि प्रेरणादायी जागा उपलब्ध करून देते.
स्टोअरचा पत्ता: तळमजला, “हाय टाइड” बिल्डिंग, सी.टी.एस. १०४०, जुहू तारा रोड, मुंबई, महाराष्ट्र – ४०००४९



