Business

जेजे हॉस्पिटलच्या क्रिकेटपटूंचे डीन डॉ. भंडारवार यांनी केले कौतुक     

रुग्णालयीन सेवा निष्ठेने करीत क्रिकेट खेळात जेजे हॉस्पिटलचे नाव रोशन केल्याबद्दल डीन डॉ. अजय भंडारवार अभिनंदन केले.

POSTED BY : MRUNALI SAKPAL DATED  00/04/2026 📞 8850212023

मुंबई NHI24.COM(M) :  ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटलने यंदाच्या क्रिकेट हंगामातील पहिले विजेतेपद पटकाविल्याबद्दल जेजे हॉस्पिटलचे डीन डॉ. अजय भंडारवार यांनी विशेष कौतुक केले. रुग्णालयीन सेवा निष्ठेने करीत क्रिकेट खेळात जेजे हॉस्पिटलचे नाव रोशन केल्याबद्दल डीन डॉ. अजय भंडारवार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे, डॉ.अरुण पाटील, डॉ.अरुण राठोड यांनी जेजे हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान नरेश शिवतरकर व टीमचे अभिनंदन केले. यावेळी जेजे हॉस्पिटल कबड्डी संघाचे कप्तान राजेश शिवतरकर, क्रिकेटपटू सुभाष शिवगण, प्रकाश सोळंकी, अक्षय सावंत, जगदीश वाघेला, शैलेश वाघेला, अमोल वरेकर, रोहित सोळंकी, प्रवीण सोळंकी, हेमंत चाचीया, साभर मारू आदी उपस्थित होते.

आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकादमीतर्फे नुकत्याच झालेल्या रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील नामवंत १४ रुग्णालयीन संघांनी शिवाजी पार्क मैदानात दर्जेदार खेळ केला. अंतिम सामन्यात ६ बाद ५७ धावांच्या डळमळीत प्रारंभानंतर बलाढ्य ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुध्द जेजे हॉस्पिटलने १५२ धावांचे विजयी लक्ष्य साकारताना शेवटच्या चेंडूवर कप्तान नरेश शिवतरकरने चौकार ठोकला आणि जेजे हॉस्पिटल संघाने अजिंक्यपदाला गवसणी घातली. स्पर्धेमधील अंतिम उपवेजेते ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल; उपांत्य उपविजेते लीलावती हॉस्पिटल व रहेजा हॉस्पिटल; उपांत्यपूर्व उपविजेते केईएम हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल-अंधेरी, सोमैया हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल तर उत्तेजनार्थ पुरस्कार कस्तुरबा हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, किम्स हॉस्पिटल-ठाणे, केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई, सायन हॉस्पिटल आदींनी पटकाविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!